Skip to main content

बाइक्स घेताना - भाग २

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 22/12/2014 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाइक्स घेताना - भाग २ भाग - १ … तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १००-११० cc १. दमड्या - सगळ्यांत कमी २. मायलेज … "कितना देती है" - सगळ्यांत जास्त ३. दिसणे - काकूबाई / वरणभात ४. ताकद (power) - ७५+ पळवली की धापा टाकणार ५. आराम - अगदीच टुकार ६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - सगळ्यांत कमी ७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - फक्त महिंद्र कडून हिरो स्प्लेंडर hero splendor पॅशन प्रो hero passion pro स्प्लेंडर प्रो क्लासिक (नवीन) hero splendor pro classic होंडा ड्रीम निओ / युगा “honda ट्विस्टर “honda बजाज डिस्कव्हर “bajaj टिव्हिएस स्टार सिटी सुझुकी स्लिंग शॉट महिंद्र सेंच्युरो पंटेरो “mahindra हा सगळ्यांत जास्त खप होणार्या बाइक्सचा विभाग … सगळ्या कंपन्यांच्या नफ्यातला मोठा हिस्सा या दुचाकींच्या विक्रीतून येतो खपाच्या बाबतीत हिरो अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवते इथे … हिरोच्या स्प्लेंडर आणि पॅशन यांच्याबद्दल काही लिहायलाच नको … tried, tested and proven themselves मोडेल्स आहेत ती … हिरो अजून पर्यंत तरी होंडाचीच इंजिन्स वापरत आहे पण लवकरच ती EBR च्या इंजिनाने बदलण्यात येतील … पण हिरोला २ खूप मोठे फायदे आहेत …. खूप मोठे service network आणि स्वस्त सुट्टे भाग … बाइकची किंमतसुध्धा वाजवी आहे आणि ५ वर्षे हमी … मायलेज भरपूर …. दिसण्याच्या बाबतीत या ठिकठाक … या विभागातली अलका कुबल :) नुकतीच हिरोने स्प्लेण्डर प्रो क्लासिक आणली आहे … ती या विभागातली सगळ्यात हटके बाइक आहे \m/ … साधी पण स्टाईलिश … old wine in new bottle … रेशम टिपणीस सारखी :)
सध्ध्या होंडाने ड्रीम निओ / युगा आणुन हिरोला समर्थ पर्याय उभा केला आहे … होंडाच्या इंजिनची गुणवत्ता ही सर्वोत्तम आहे … आणि शहरे व आसपासच्या परिसरात service center असतातच … ही स्मिता पाटील आणि होण्डाचीच ट्विस्टर मात्र या विभागातली वर्षा उसगावकर ;)
बजाजची डिस्कव्हर सिरीज सगळ्या विभागांत आहे … बजाजचा सर्वांत मोठा प्लस पोइण्ट म्हणजे सगळ्यात कमी किंमत, सगळ्यात जास्त मायलेज … खूप स्वस्त सुट्टे भाग … नुस्ते बघून कळतच नाही की १०० वाली का १२५ वाली का १३५ वाली 8) … परंतु इंजिन refinement मध्ये हिरो आणि होंडाच्या मागे पडते… डिस्कव्हर सिरीज थोडक्यात jack of all trades master of none अशी आहे … या विभागातली निशिगंधा वाड :P
टिव्हिएस आणि सुझुकी सध्यातरी खपाच्या बाबतीत वरच्यापैकी कोणाच्याच जवळपास सुध्धा नाहीत… service network कमी आहे
महिंद्राने सेन्च्युरो / पटेरो असे २ पर्याय दिले आहेत … यांनासुध्धा ५ वर्षे हमी … त्यांच्यात मात्र काही first in class वैशिष्ठ्ये आहेत …जसे इंजिन immobilizer, find me parking lights, remote flip key … comes with freshness but not sure about potential इथली सुप्रिया पिळगावकर :D
अवांतर - जुन्या मराठी नायिका निवडण्याचे कारण … looks plain based on what we get to see :D उपमा हुकल्या असतील तर पर्याय सुचवावेत ;) क्रमश:

वाचने 47965
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by गवि

ल्युनाला अस्मादिकांनीही लिखाणात मानाचं पान दिलंय. आठवलं असेलच.. खरं सांगु... इसरलो हाय बघा. जरा दुवा ध्या की... बाकी टीव्हीएस सुझिकीची फोर स्ट्रोक स्पेक्ट्रा ही १५० सीसीची माझी पहिली दुचाकी होती. Spectra

In reply to by मदनबाण

एक शंका नेहमी मनात डोकवते. या आर एक्स १०० गाड्या नेहमी चकाचक नव्या कोर्‍या कशा काय दिसतात? एक पण जुनी कशी काय दिसत नाही?

In reply to by टवाळ कार्टा

नै म्हणजे साफ्सूफ म्हणत नाही मी. एकदम नवीन फॅक्टरी मॉडेल टाईप दिसतात. चकचकीत कलर. वापरून वापरून जुन्या दिसायला हव्यात ना. आमची बाईक काही वर्षातच जुनाट दिसायला लागते.

In reply to by काळा पहाड

सर्व बाईक रिस्टोर करतात. बफिंग आणि क्रोम पॉलिश करून घेतला की बाईक चकचकीत दिसते

In reply to by मदनबाण

कोणी काहीही म्हणो..."झालेत बहु...होतील बहु...परंतू यासम हिच" => RD-350 अजूनही सेकंड हँण्ड घ्यायला गेलात तर १ पेटी लागतात...आणि पर्फॉर्मन्स बोले तो...मधुबाला :) \m/

In reply to by कपिलमुनी

मला भरपूर अनुभव आहे. या येxxx मधे किक मारुन झाल्यावर तीच उलट दिशेत (समोर) खाली पाडून त्याचा गियर लिव्हर म्हणून वापर करावा लागतो. मागच्या बाजूला गियर उतरवण्यासाठी काही नसल्याने टाचेचा उपयोग करता येत नाही. त्याऐवजी लीव्हरच्या खाली पायाची बोटे नेऊन उलटी वरती ढकलून गियर खाली आणायचे. स्टार्ट करताना लांब पाऊल असलेल्यांचा अंगठा पुढच्या फुटरेस्टवर आपटून नख उचकटण्याचा धोका. मुळासकट नख उखडणे आणि अनेक महिने ठसठसणारी वेदना अनुभवास आली आहे. बादवे या फोटोतल्या येझदीला आडवी जादा स्टेपनी दिसत नाही. बाईकमधे सहसा नसणारं ते फीचर होतं तिच्यात.

०/गवि\० अजून या गाड्या चालवत असाल तर गाडीसह मालकाच्या फोटोचे स्वागत फोटूशिवाय मजा नाही ९०च्या अगोदरचे फोटो टाकाच मिपा विंटेज का काय ते .

In reply to by कंजूस

अजिबात संबंध उरला नाहीये दुचाकीशी. :-( पूर्वी बाईक हेच पाय होते इतके सदैव त्यावरुनच भ्रमण असायचे अन आता आठेक वर्षं दुचाकीला हातच लावला नाही. आता नीट चालवता येईल का अशी एक शंका मनात खोलवर आहे. चारचाकीच्या अतिरेकामुळे हे असं वाटतंय. मोठी गॅप झाली तर परत बाईक चालवताना प्रोब्लेम येऊ शकतो का ? कोणाचा काही अनुभव ?

In reply to by गवि

मोठी गॅप झाली तर परत बाईक चालवताना प्रोब्लेम येऊ शकतो का ? कोणाचा काही अनुभव ? तितका प्रॉब्लेम येत नाही पण चार-चाकी चालवताना जो स्वतःवर विश्वास असतो तो रहात नाही आणि थोडीफार भिती वाटते की पाठीमागून कोणी चारचाकीवाला उडवेल म्हणून...

In reply to by योगी९००

_/\_ काय सुरेख निरीक्षण!! चारचाकीची सवय नसली तरीही; चारचाकीतून उतरल्या उतरल्या दुचाकीवर बसलो तरी हे असंच होतं....

एकदा लोणावळा अॅम्बिवैली रस्त्यावर पक्षी बघायला फिरत होतो. इतक्यात प्रचंड मोठा आवाज झाला म्हणून कडेला उभे राहिलो तर आठ दहा बाईकस्वार खूप वेगात गेले. अशा तीनचार फेऱ्या झाल्या. १०००cc च्या असाव्यात का त्या बाइक्स?

In reply to by कंजूस

हो. अशी वीसतीस बाईक्सची ती ग्यांग नाशिक, इगतपुरी,लवासा,लोणावळा अश्या भागांत अनेकदा भडभडून जाताना दिसते. फास्ट असतात पण वेडेवाकडे झिगझॅग पॅटर्न , कसरती किंवा तत्सम धोकादायक आचरटपणा नसतो. कंट्रोल चांगला असावा त्यांचा. बाकी युनिफार्मसारखे संपूर्ण लेदर कव्हर्ड कपडे आणि हेल्मेट वगैरे बरोबर नियमित घालतात असे दिसले.

In reply to by टवाळ कार्टा

असावे तसेच असे दिसते. कारण एका बाईकवर एकच स्वार असतो मोस्ट केसेसमधे. म्हणजे पोरी भापण्याचाही उद्देश नसावा. शुद्ध बाईकिंगच असावे.

हे भुंगे पोरी कशाला भापवतील म्हणा. त्यांची कमळे वेगळी असतात. एकदा केरळला जातांना शेजारचा पोरगा एक चकाचक मलयाळम (असले मराठीत येईल का ?)कार आणि बाईकचे मैगझिन चाळत होता. त्याला खुणेनेच कोणती बाईक आवडते विचारल्यावर त्याची कळी खुलली आणि त्याने एक तसल्या बाईकचा फोटो दाखवला (मुवि वाचताय ना ?)मग आमची गट्टी जमली हे सांगायला नको.

In reply to by कंजूस

अग्गागा...मराठीत बाइकचे मासीक निघाले तर ते मासीक काढणारा डूबेल की ओ मराठी माणसाला भांडणे पहाण्यात्/करण्यात जास्त रस असतो...त्यात दोन्ही पार्टी मराठीच असतील तर जास्तच चेव येतो...आणि तो जास्तीचा चेव मिंधीत(मराठी + हिंदी) मधे बाहेर पडतो

In reply to by टवाळ कार्टा

ये मराठी माणूस का अपमान है. हम तुमको माफी मागो करके बोल देता है. नही तो जर मराठी माणूस भडका ना तो इतना आदळ आपट करेगा ना की तुम्हारी पाचके उपर धारण बैठेगा. मराठी माणूस को कमी लेखके देशका राजकारण नही करनेका ये लक्षात लो बाबा.

In reply to by काळा पहाड

अगर तुम करेगा मराठी माणुस का अपमान... अगर तुम करेगा मराठी माणुस का अपमान... हाम आके पिळेगा तुम्हारा कान थोर कवीवर्ज (होय वर्जचं) नावं काही "आठवतं" नाहीये. आठवले की सांगेन.

अगोदरच १०००cc (फटफटी)चा आवाज मोठा आणि त्यात साइलेन्सर कशाकरता काढून टाकता हो भाऊ ?हेल्मेट घालून लेख वाचावा लागेल.

माझी पहिली बाईक, फर्स्ट जनरेशन सीबीझी. अप्रतिम डिझाईन, सुंदर हँडलिंग या कारणांमुळं खूपच आवडायची. पण हीरो आणि होंडाच्या स्प्लिटनंतर पार वाट लावली डिझाईनची ... :(

In reply to by गुंड्या

Hero Honda CBZ हिच ती...जीने भारतातल्या बाइक इंडस्ट्रीमधे बदलाचा ट्रिगर दाबला \m/ रच्याकने तीच्या डिझाईनची वाट हिरो आणि होंडाच्या स्प्लिटच्या आधीच लावलेली...डिझाईन चांगले ठेवले असते तर पल्सरचे यश थोडेफार तरी नक्कीच कमी झाले असते

In reply to by टवाळ कार्टा

सीबीझी स्टार जेव्हा बाजारात आली तेव्हापासूनच सेल कमी झाला होता... पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि आताही नाहीच!

In reply to by गुंड्या

पल्सर तेव्हाही आवडली नाही आणि आताही नाहीच!
तुमची आवड काय?? Royal Enfield च्या पंथातले असाल तर हार्ले सोडून बाकी काहीच आवडणार नाही

In reply to by टवाळ कार्टा

हो.. अर्थात यापूर्वी पाहिला नसाल तर पहा असं लिहितालिहीता तसंलिहिण्यात काही अर्थ नाही हे कळलं.. म्हणून तसाच डकवला.

In reply to by टवाळ कार्टा

पल्सरला उगा नाव ठेवतात बाँ... मी जेव्हा स्लेंडर प्लस वरुन {हिरो होंडा} वरुन पल्सरवर {बजाज} वर शिफ्ट व्हायचे ठरवले त्यावेळी असेच अनेक ऐकलेली आणि वाचलेली मते विचारात घेतल्यावर खरचं पल्सर घ्यावी का ? असा विचार केला होता... शिवाय याची गियर सिस्टम सुद्धा हिरो होंडा पेक्षा वेगळी आहे, पण जेव्हा वेगवेगळे रिव्हू वाचले आणि प्रत्यक्ष जाउन एकदा बघीतल्यावर फायनल केली. गियर टाकणे म्हणजे अगदी मख्खन काम आहे ! ट्वीन स्पार्क प्लगचे ४ व्हॉल्व इंजिन हे बहुधा पल्सर १३५ एलएस मधे प्रथमच आणले गेले आहे. आत्ता पर्यंतचा १ वर्षाचा ड्राइव्ह फिल मस्तच आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant

In reply to by मुक्त विहारि

पल्सर २०० एन एस पेक्षा त्याला केटीएम २०० ची ऑफर द्या . होउ दे खर्च :) पण गाडी नाद खुळा !

In reply to by टवाळ कार्टा

बाईकच्या बाबतीत मी तसा फारसा कल्ट फॉलोअर नाही...यामाहाच्या बाईक्स बर्‍या वाटतात. प्रचंड आवडणारी म्हणाल तर होंडा गोल्डविंग :)

In reply to by गुंड्या

ओ भौ...मी इथे फक्त सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना खिशाला झेपणार्या बाइकबद्दलच लिहिणार आहे...आवडायला काय पेनेलोपे क्रूझ पण आवडते हो :(

In reply to by टवाळ कार्टा

स्वारी हां..जरा वाहवत गेलो. आपण दिलेली यादी पाहता ट्विस्टर उत्तम वाटते.

In reply to by गुंड्या

ह्म्म्म ट्विस्टरला पल्सरपेक्षा प्राधान्य दिलेले पाहून अंमळ ड्वाळे पाणावले...पण पसंद अपनी अपनी...सो ठिकाय

In reply to by टवाळ कार्टा

तसेच असते रे... कुणाला कुठली बाइक आवडेल, ते काही सांगता यायचे नाही...

आमच्या के बी १०० बद्दल कुणीच काही लिहले नाही ? बजाज चे पहिली वहीली बाईक ... भन्नाट ! बजाज मध्येच काम करत असल्याने स्व्तः च्या हाताने असेम्ब्ले केली होती,, तब्बल १५ वर्षे वापरली... खतरनाक बाईक ! गाडी घेतल्याच्या ( १२ जुलै १९९० ) दुसर्‍याच आठवड्यात जुलै च्या पडत्या पावसात औरन्गाबाद ते विटा -४८० किलोमिटर बिना हेल्मेट / बिना गॉगल / बिना विंड्चिटर ! आठ तासात पोहोचलो होतो. आई अवाक झाली .. १५ मिनिटे कानात आवाज येत होते नुस्ते ! ( बाकी ही गाडी माझा पाय ओळखायची...इतरांनी कुतुन कुतुन लाथा घातल्या तरी ढीम्म न हलणारी माझ्यासाठी हाप किक स्टार्ट होती )

In reply to by टवाळ कार्टा

अरे लै खतरनाक मॉडेल होते. त्यात आरटीझेड पण मॉडेल होते. केबी फायरिंग जवळपास आरेक्स १०० सारखेच होते. टाकी लांब असल्याने मस्त फील यायचा हात स्ट्रेट ठेवायचा. पिकप बिकप जबरा. सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे त्या काळात इतर बाइक्सना नसलेल्या बर्‍याच फॅसिलिटीज होत्या. सेंट्रल लॉक, पार्किंग लाईट, हेल्मेट लॉक, इंजिन स्विच ह्या गोष्टी नंतर सुरु झाल्या. पण केबीला पहिल्यापासून होत्या. त्यांची 'राईड द चिता' ही कॅम्पेन गाजलेली भरपूर. तेच २ स्ट्रोक इंजिन वापरुन बजाज ने इंपल्स सारखे एंड्युरो मॉडेल काढलेले. त्याची पण अ‍ॅड भारी होती. बजाजने त्या सिरिज मध्ये ४एस चॅम्पन नंतर कोल्ट, बॉक्सर(स्प्लिट सीटवाली), एआर अशी लो कॉस्ट मॉडेल काढलेली. चालली नाहीत. बजाजची हवा हुडीबाबा (कॅलिबर११५) ने सुरु केली. ती विंग्ज आणि पल्सरपासून उचलली गेली.

In reply to by सुधीर जी

एक्स्प्रो आनि नुसती प्रो ह्यामध्ये एक्स्प्रो का निवडावी वाटली तुम्हाला? मिनिमम दोन कारणे दिलात तर एकदम परफेक्ट माहीती देतो. ;)

In reply to by सुधीर जी

ओके. ११० सीसी इंजिन नॉर्मल पॅशन प्रो ला पण आलेय. लुक्स चांगलेत. एक्सप्रो चे लूक्स भारी आहेत पण इंजिन टाइम प्रुव्हन पॅशनचे हॉरिझॉन्टल सिलिंडर नाही. व्हर्टिकल आहे. हे इंजिन हिरोच्या दुसर्‍या कोणत्याही १५०सीसी खालच्या गाडीला वापरीत नाहीत. अ‍ॅव्हरेज प्रो पेक्षा ५ कीमी ने कमी आहे. पॉवर जाणवत नाही. वजन जरा कमी केलेय गाडीचे. हायवेवर शेजारुन मोठी गाडी गेल्यास हलते. ऑलोव्हर एक्सप्रो फक्त लूक साठीच घ्या. बाकी कोणताही फायदा नाही. मायलेज, बरे सस्पेन्शन आणि मज्बूती हवी असेल तर पॅशन प्रो उत्तम.

In reply to by सुधीर जी

कदाचित तुमच्यासह गाडीचे वजन जास्त झाले असावे. (ह.घ्या) एनिवे. अभिनंदन.