विरंगुळा

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
17 Jul 2021 - 2:48 am

Howdy मिपाकर्स

आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन?

येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.

तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.

आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया!

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलउखाणेम्हणीव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनआईस्क्रीमइंदुरीउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकैरीचे पदार्थपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमायक्रोवेव्हमेक्सिकनभूगोलदेशांतरवन डिश मीलव्यक्तिचित्रणसिंधी पाककृतीज्योतिषकृष्णमुर्तीस्थिरचित्रप्रकटनसद्भावनालेखअनुभवशिफारससंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेवादआरोग्यविरंगुळा

दोसतार - पुस्तक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Jul 2021 - 11:13 pm

Dosataar

मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.

वावरविरंगुळा

दोसतार - पुस्तक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Jul 2021 - 11:13 pm

Dosataar

मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.

वावरविरंगुळा

अरिस्टोफेन्सने सांगितलेलं प्रेम

एस.बी's picture
एस.बी in जनातलं, मनातलं
25 Jun 2021 - 2:33 am

आज वटपौर्णिमा सण,फेरे,पातिव्रत्य ,जीवनसाथी वैग्रे वैग्रे वर्ती खूपच चर्वितचर्वण सुरू असणार! आज ह्या भारतीय सणाच्या निमित्ताने मला एक कथा वाचण्यात आलेली होती ती तुम्हा सगळ्यांसमोर मांडावी असं मला वाटतं.
आपली ती तुम्ही नेमी नेमी ऐकता ती सत्यवान सावित्रीची कथा नाहीये ही ! ही कथा आहे प्राचीन ग्रीस देशातली ,त्यांच्या इथल्या कल्पने नुसार देव, मानव, या दोहोंच्या संघर्षाची!

कथाजीवनमानविचारमतविरंगुळा

सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
19 Jun 2021 - 11:16 pm

जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा...

कलाचित्रपटप्रकटनअनुभवविरंगुळा

तेव्हापासून..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
16 Jun 2021 - 1:38 pm

'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..!
उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..! हे बरं नाही..

हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय..
म्हणजे समजा पुस्तकं घ्यायला गेल्यावर नेहमीच्या सवयीनं एखादं पान उघडून अधलामधला पॅराग्राफ चाळला आणि असलं एखादं टुकार वाक्य दिसलं की अर्ध्या सेकंदात पुस्तक मिटून जागच्या जागी जातं आणि मानसिक प्रतिक्रिया, शेरेबाजी चालू होते...शिवाय कुजकं हसू येतं ते वेगळंच...

विनोदशिक्षणप्रकटनविरंगुळा

शेर अफगाण- कथेनंतर, संदर्भ आणि नोंदी

विश्वनिर्माता's picture
विश्वनिर्माता in जनातलं, मनातलं
22 May 2021 - 9:25 pm

अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश. नुरुद्दीन मुहम्मदची पत्नी- नुर जहाँ.

इतिहासकथाविरंगुळा