चारोळ्या

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
11 May 2014 - 11:43 am

प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का! तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद

___________________________________________________________________

सुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.

a

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनसुभाषितेविनोदऔषधोपचारशिक्षणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीविरंगुळा

पाप आणि पुण्य

sunrise's picture
sunrise in जे न देखे रवी...
12 Apr 2014 - 11:12 am

पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात
पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात
पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल
अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल

चारोळ्या

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
23 Mar 2014 - 6:32 pm

कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)

वाङ्मयकविताचारोळ्याप्रेमकाव्यविडंबनगझलसाहित्यिकसमाजबातमीविरंगुळा

ओळख पाहू -होळीमय चारोळ्या

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
17 Mar 2014 - 9:15 am

(१)

गुरूलाच दाखविला
धोबीपछाड तयाने
घालूनी टोपी गुरुची
युद्धात उतरला सत्यवीर(?)

(२)

जनसमुद्र दिसत होता
डोळ्यांसमोर तयाचा

की नजर अधू जाहली
की कबूतरे उडुनी गेली?

(३)

भीष्मासम वृद्ध
हा सेनानी महान
एक पदाती सम आज
का उतरला रणांगणात?

(४)

आधी लगीन गादीशी
मग राजकन्येशी
विच्छा त्याची आज
पूर्ण होणार का?

(५)

चारोळ्या

द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
29 Jan 2014 - 7:06 pm

(१) चश्मा

डोळे झाले माझे अधू
दिखती नहीं है दिल्ली.

मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दिखाए मुझे जो लालकिला.

(२) उम्मीद

झाले शरीर जरी म्हातारे
दिल अभी जवान है.

वरेल का मला ती षोडसी
उम्मीद अभी कायम है.

चारोळ्या

चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
14 Jan 2014 - 10:47 am

विचारांची जुळणी गुळाची असावी..
शब्दांत पेरणी साखरेची असावी..
विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी..
तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी..
संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥

शांतरसचारोळ्या

एक चारोळी ... !

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
31 Dec 2013 - 10:08 am

शम्पेनच्या बाटल्या फोडण्यात आनंद नसतो,
आपण गोड सण करून संस्कृती जपतो,
'इंग्रजी डे' चं हास्य क्षणभंगुर ठरून जातं
अन 'जानेवारी' नव्हे 'पाडव्याला' आपलं नवीन वर्ष सुरु होतं !
- साजीद पठाण

चारोळ्या

शीळा घास

वैभवकुमारन's picture
वैभवकुमारन in जे न देखे रवी...
30 Nov 2013 - 2:46 pm

शीळा घास

भीक मागत दारापुढे भिकारीण आली
फाटके पोलके अन जिरलेली चोळी
सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी
ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी

भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1

कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली
'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी
उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली
शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी

भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2

माय -माय करतच अनवाणी आली
भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली
आली आली अशी एक भिकारीण आली
शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली

चारोळ्या

ओढ

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जे न देखे रवी...
23 Oct 2013 - 2:35 pm

निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे
न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे,
भावनेस शब्दांची जोड का हवी
कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...

शृंगारचारोळ्या

चारोळ्या - २

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
9 Oct 2013 - 3:52 pm

चारोळ्या - १

या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्‍यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.

११
कुठल्याही नात्याची खोली
प्रसंग आल्यावरच कळते
नेहमीची पायाखालची वाटही
कधी आडवाटेला वळते

१२
अस्वस्थता ही मनाची मी
सांगू कशी अन् कुणाला
असून गजबज भोवताली
आतून मात्र मी एकला

करुणचारोळ्या