Skip to main content

भूतभगिनी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 02/09/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

भूतभगिनी                              

--------------------------------------------------------------------------------------------------------

‘आपण भूत भूत खेळूया ! ‘ नेहा म्हणाली.

‘ चालेल  ! मज्जा  ! ‘ रिया म्हणाली.

 खरं तर यात नवीन काहीच नव्हतंहा त्यांचा नेहमीचा खेळ होतानेहाच्या आईला तो अजिबात आवडत नसेमुळीच आवडत नसे. ‘ हा कसला घाणेरडा खेळशी बाई !’ असं ती वैतागाने नेहमीच म्हणायचीआणि या दोघी तरीही  तो खेळ नेहमीच खेळायच्या. लहानांचे खेळ  मोठ्या मंडळींना  बऱ्याचदा आवडतच नाहीत.

रिया नेहाच्या शेजारी रहायचीती एक रो हाऊसेसची कॉलनी होतीरो हाऊस म्हणजे एका रांगेतलीएकसारखी घरंत्यांची घरं तीन मजली होती

नुकताच अंधार पडला होता. आईचं  काही काम चालू होतं. रिया  आणि नेहा सगळ्यात वरच्या मजल्यावर गेल्यातिथल्या खोल्या मोठ्या होत्याभरपूर खिडक्यातेवढेच पडदे आणि भरपूर फर्निचर तिथे होतं. म्हणजे खेळायला आणि लपायला एकदम मस्त मस्त जागाआणि दुसऱ्याला घाबरवायलासुद्धा ! 

खिडक्यालावायच्यापडदे लावायचेअंधार करायचाजितका अंधार जास्त तितकी मजा जास्तमग पडद्यामागे किंवा कपाटाच्या आडोशाला लपायचंहालचाल  करायची नाहीएकदम शांतअंगावर एखादी चादर घ्यायचीअन समोरच्याला जाम घाबरवायचंअंधारात चित्रविचित्र आवाज काढले की भीती ही वाटतेचअसाच तर त्यांचा खेळ होता.

 रिया कुठे लपली कुणास ठाऊक ?

नेहा तिला शोधू लागलीबापरेती सापडेचनाआता ती केव्हाही धप्पकन  तिच्यासमोर येणार होती … भूत- भूत म्हणून ओरडत !  नेहा घाबरली

 त्याच वेळी खालच्या मजल्यावरून आईचा आवाज आला ,’नेहा, खाली ये. तुझ्या आवडीची चॉकलेट्स आणली आहेत.’  झालं ! चॉकलेट्स म्हणल्यावरनेहा खेळ सोडून पळाली खाली. ती दुसऱ्या मजल्यावर आली आणि कोणीतरी तिचं तोंड  दाबलं. एकदम घट्ट !

हा काय प्रकार रियाचा ? ती ओरडली,' रिया सोड सोड '. पण नाही. ती पकड तशीच राहिली. 

बापरे !  हे काहीतरी भयंकर होतंकोणीतरी तिचं तोंड असं दाबलं होतं की ते हलवणं शक्य नव्हतं की ओरडणं. मग ते होतं तरी कोण?  एखादं भूत की रिया? पण  ती बारकुडी तर वर होतीअन तिच्या अंगात तेवढी शक्तीच  नव्हती. नेहाने धडपड करण्याचा खूप प्रयत्न केला, ओरडण्याचा खूप प्रयत्न केला.  पण नाहीकाहीच उपयोग झाला नाही.  मग मात्र ती खरंच घाबरली.

 त्याच वेळी तिला आवाज ऐकू आलाअगदी जवळून.

‘मुळीच  खाली जाऊ नकोस !  तो आईचा आवाज मीही ऐकलाय.’ 

 ही तर आई  बोलत होती कानापाशीआणि तीच सांगतीयेखाली जाऊ नकोसतो आईचा आवाज मीही ऐकलाय म्हणूनभयंकरफारच धोकादायक होतं हे सगळंम्हणजे तोंड  आईने धरलं होतं तरती आपल्या शेजारीच आहे. तिने तो आवाज ऐकलाय, तर मगतर मग खाली कोण आहेआईच्या आवाजात बोलणारं  भूतती घाबरलीपण घाबरायचं कशालाआई होती ना शेजारी.  पण आईने तोंड असं का दाबलंअन तेही एवढ्या जोरातशेजारी असलेली आई तरी खरी आहे का ?...

म्हणजे भूत आहे हे नक्कीपण ते तळमजल्यावर आहे की आपल्या शेजारी ?  आता मात्र तिची भीतीने पूर्णच गाळण उडाली. तिच्या छातीतली धडधड वाढली. 

रिया एका भल्या मोठ्या फुलदाणीमागे लपली होती. तिला नेहा खाली गेल्याचं जाणवलं.ती तिला शोधत वरून खाली आली. नेहाच्या आईने तिला दबक्या आवाजात हाक मारली , ‘ रिया रिया ‘…

आणि त्या बोलण्यात नेहाच्या तोंडावरचा हात बाजूला झाला. तिने झटकन वळून मागे पाहिलंतिची आईच तर  होती मागे.  पांढऱ्या रंगाच्या कोऑर्ड ड्रेसमध्येपण तोपर्यंत  वेडी रिया,  खालच्या मजल्यावर पळाली होती. आता ती नक्कीच खाली असलेल्या भुताच्या तावडीत सापडणार  होती.

‘आई -रिया रिया-‘ धपापत्या आवाजात ती आईला म्हणाली.

 तेवढ्यात खालून आवाज आला,’ अरे नेहा बेबी …’ आईचा आवाजपुन्हा आईचा आवाज  !

 मग तिच्या शेजारची आई ओरडली, ‘ए,  सोड तिलानेहाला तर मी धरलंय !’  हादेखील आईचाच आवाज. 

खालचं भूत रियाला नेहा समजलं होतं तरआणिआणि मग  खाली एक अन वर दुसरं अशी दोन दोन भुतं होती की कायतसं  असेल तर मग वाटच लागलीअरे देवा ! ... दोन भुतं दोन गरीब बिचाऱ्या मुलींना धरणार होतीअन आई ? ... ती कुठे गेली ? ... फुल भुताटकी !

आणि मग शेजारची आई हसू लागली. जोरजोरात हसू लागली. नेहाला तर काही कळेच नानक्की चाललंय तरी कायमग आईने नेहाला तळमजल्यावर  नेलंतिथे हॉलमध्ये एक अनोळखी बाई बसलेली होतीमग ती बाई म्हणाली , ‘ नेहाबेबी कम माय डियर !’ 

बाब्बा  ! हे भूत तर पार इंग्लिशमध्ये  बोलतंय अन मुलांना फसवायला वर चॉकलेटची लालूच दाखवतंय की काय ? ... नेहा डोळे विस्फारून, घाबरून तिच्याकडे नुसती पाहतच राहिली. साहजिकच आहे ना

पण एक होतंती बाई दिसायला अजिबात म्हणजे अजिबातच डेंजर नव्हतीडोळेबिळे वटारलेले नव्हतेकेसही पिंजारलेले नव्हतेपांढरी साडी वगैरे असं काहीच नाहीउलट ती दिसायला एकदम गोंडसगब्दुल बाई होतीतिच्या सारखाच बॉब कट असलेलीचक्क निळ्याजांभळ्या फुलांचा फ्रॉक घातलेली.

भलतंच भूत होतं तेतिला वाटलं होतं तसं डेंजर काहीच नव्हतं.

मग आईने सांगितलं,’ अगं, ही माझी  सख्खी चुलतबहीण शमा. अमेरिकेत असतेपहिल्यांदाच आली आहे आपल्या घरीतुला भेटायलातुला तिने याआधी कधी पाहिलेलं नाही ना.

आणि त्या मावशीबाई म्हणाल्या , ‘ बरं का नेहाबेबी, गंमत अशी आहे  की आमच्या दोघींचा आवाज अगदी सेम टू सेम आहे ! ‘

आणि ते अगदी खरंही होतं कारण हे सगळं ती आईच्याच आवाजात बोलत  होतीदोघी बहिणी दिसायला अगदीच वेगळ्यापण दोघींचा आवाज मात्र - ! देव पण ना गंमतीच करतो.

मावशीबाई  पुढे म्हणाल्या ,‘ मग तुझी आई म्हणाली की या पोरी ना  भुताचा खेळ खेळताततिला ते  अजिबात आवडत नाहीमग मी तिला म्हणालेआपण या दोघींची मजा करू या अन त्यांना भीती दाखवू या. त्यांच्याच पद्धतीने,  भूत बनून.’  

अशा रीतीने सगळा उलगडा झालादोन्ही छोट्या पोरी हसू लागल्या.  त्यांनी मावशीने आणलेली भारी चॉकलेट्स खाल्ली.

त्यावेळी नेहा म्हणाली,' आई, किती जोरात तोंड आवळलंस गं माझं. ' 

त्यावर आई म्हणाली,' चुकून गं राणी. ' आणि तिने पोरीला लाडाने जवळ घेतलं. तेव्हा नेहाला कित्ती बरं वाटलं.

रियाला वाटलं की वरच्या मजल्यावर पडद्यामागे ही मावशी आली ना अंधारात तर - तिच्या तोंडावर चादर टाकून तिला चांगली भीती दाखवली असती ! आम्हाला अशी छळते काय ? पण ती काही बोलली नाही. चॉकलेट खात ती गप्प बसली. 

तेव्हानेहा म्हणाली , ‘आई,  ही आयडिया भारी आहे हं  ! लोकांना घाबरवण्याचीआपण हीच ट्रिक वापरूया आणि बाबा आले की त्यांना घाबरवू या.’

त्यावरआई आणि मावशी दोघी हसू लागल्या.

‘ नको गं बाई ते नाही फसणार.  त्यांना हे सगळं माहिती आहेआमच्या आवाजाची गंमत.  उलट ते आमच्या दोघींना नेहमीच चिडवतात भूतभगिनी म्हणून. बाबांनी  हा शब्द तुझ्या आजोबांचा ढापलाय ‘. आणि त्यांना एकदम त्यांच्या लहानपणीची आठवण आली.

त्यावेळी आई अन मावशी, दोघी  एकदमच  लहान मुलींसारख्या ओरडल्याएकाच आवाजात - भूतभगिनी !

मोठ्यांनी कायकाहीही केलं तरी चालतं.

--------------------------------------------------------

लेखनविषय:

वाचने 388
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

दुसर्‍या मजल्यावर खरोखर भिती वाटली  आणी आता नेहाचे काही खरे नाही असे वाटले. 

शेवटी गर्रकन घेतलेले वळण  अनपेक्षित होते.

 

दिवाळी अंकात भारी गोष्ट येवू द्यात. 


In reply to by अनिशासूत

बिपीनदा आहेत ते. वावगं लिहीणार नाहीत. 

लहानग्यांना मानवेल असच लिहीतील.


कर्नलजी 
आपली प्रतिक्रिया पहिलीच .
आणि उत्तम 
दिवाळी अंकासाठी लिहायचा प्रयत्न करतो 
आपल्या कविता आणि काव्यप्रेम याबद्दल आदर आहे

 

सर्व वाचक आणि प्रतिसाद्क - नवे - जुने 
खूप आभार 
विशेषतः माझा वावर आणि प्रतिसाद कमी असताना

 

@पाषाणभेद

बिपीनदा आहेत ते. वावगं लिहीणार नाहीत. 
लहानग्यांना मानवेल असच लिहीतील.

कोई तो  है समझनेवाला - आभार