आधुनिक भारतातले सावकार
छगन तसा एक सरळमार्गी व्यावसायिक आहे. त्याचा धंद्याचे गणित एकदम साधे आहे, आपल्या कामामुळेच लोक आपला संदर्भ पुढे पाठवतात, त्यामुळे प्रत्येक काम जीव ओतून केले पाहिजे हा त्याचा भ्रम आहे. असेच एके दिवशी तो त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित गेला असता त्याला तेथे मगन भेटतो. मगन त्याचा लहानपणीचा मित्र, दोघे एकाच शाळेत होते. १० वी नंतर छगन सायन्सला तर मगन कॉमर्सला गेल्याने त्या दोघांचा तसा काहीच संबंध नव्हता. मगन आता एक आर्थिक सल्लागार आहे. तो छगनला सांगतो कि आता त्याला धंदा वाढवायचा असेल तर तो त्याला आर्थिकदृष्ट्या मदत उपलब्ध करून देऊ शकतो कारण नवनवीन सरकारी उपक्रमांद्वारे सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध आहेत. सुरुवातीला छगन त्याच्याकडे कानाडोळा करत असतो, पण असच एक दिवस त्याच्याकडे एक खूप मोठी ऑर्डर येते आणि त्याला आर्थिक मदतीची गरज निर्माण होते, त्यावेळी तो आपली गरज सहजच मगनकडे बोलतो, मग काय मगन त्याच्या कामाला लागतो आणि छगनचे काम करून देतो. पुढे छगनचे काम प्रचंड वाढते. छगन त्याच्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी व्यवस्थितपणे फेडत असतो, अगदी कोरोनाच्या काळात ज्यावेळी प्रत्येकजण मुदतवाढीच्या मागे होता त्या वेळी देखील छगनचे हप्ते एकदम नियमितपणे जात असतात.
पुढे छगनच्या आई – वडीलांचे अचानक निधन होते, आणि सुरु होते छगनची परवड. कशी ? कारण छगनच्या धंद्यासाठी भांडवलासाठी छगनने आपल्या पालकांचे घर बँकेकडे गहाण ठेवलेले असते. आता आई वडील ह्यात नाहीत म्हटल्यावर ते घर छगनच्या नावावर होणे आले, तसे ते होते छगन त्याच्या संस्थेचा अधिकृत सभासददेखील होतो. पण त्याच्या सोसायटीचे अभिहस्तांतरण नाही, सबब बँक ते मान्य करत नाही, आणि बँक त्याचे चालते - बोलते खाते बंद करते. आता बँक बंदच झाली म्हटल्यावर पुढे काय ? तरी बँकेच्या हातापाया पडून छगन त्याचे “चालू खाते” चालू करून घेतो. आणि आपल्या सगळ्या अशिलांना तेथे रक्कम वळवायला सांगतो, पण ह्यात त्याचे हप्ते फुटायला लागतात, आणि सुरु होतो एक भयानक काळाकुट्ट प्रवास:
१. मगनने केलेला एक पराक्रम छगनला आयुष्यभराची शिकवण देऊन जातो. कारण मित्राच्या भरोश्यावर बबनने आपली चड्डी दुसऱ्यांना काढायला अलगद मगनच्या हातात दिलेली असते. कशी?
a. मगनने कर्ज मंजुरीसाठी केलेल्या SLA मधली एक हि अट पाळलेली नसते. सांगताना एक आणि करताना एक अस करून त्याने छगनचे एक मित्र म्हणून छान चित्र काढलेले असते. उदाहरणार्थ पहिल्या अटीप्रमाणे कर्जाऊ रक्कम एकाच ठिकाणाहून उपलब्ध करून देणे अनिवार्य असताना त्याने १० लोकांकडून कर्ज उभारून दिले असते.
b. कर्ज मंजूर झाल्यावरही त्याने त्याचा कोणताच दस्तावेज छगनला दिला नाही, आणि वर छगनच्या बायकोला त्यात गोवलेले असते. दस्तावेज बनताना त्याची शहानिशा न करता मित्रावरचा आंधळा विश्वास छगनला आता चांगलाच तापवणार असतो.
c. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कर्जाचे व्याज, SLA मधली हि अट देखील मगनने खुंटीला टांगून चांगले २२% ते २७% अशा घसघशीत दराने कर्ज पुरवलेले असते.
२. जो पर्यंत बँक खाते आणि धंदा चालू असतो तसेच जो पर्यंत सगळे हप्ते व्यवस्थितपणे कापले जात असतात तो पर्यंत Recovery नामक जमातीच्या लोकांशी छगनचा कधीच संबंध आलेला नसतो. जेव्हा हि गोष्ट त्या जमातीच्या लक्षात येते तेव्हा ते बिनधास्तपणे त्याच्या कार्यालयात घुसून दिवसभर तिथे बसून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याची एक हि संधी सोडत नाहीत. तसेच धंद्याच्या दृष्टीने छगनने दुकान – मकान जवळपास ठेवले असल्याचा गैरफायदा या जमातीने न घेतला तर नवलच. सक्काळी घराच्या दारात जाऊन तमाशा घालायचा मग त्याच्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून त्याचे संभाषण ऐकत राहणे आणि जर पैसे येणार असतील तर आपापल्या सवंगड्यांना सांगून NACH द्वारे आधी ते पैसे काढून घेणे असले प्रकार त्यांनी सुरु केले. यात छगनने मूर्खपणे आपले स्त्रीधन पणाला लावले, पण त्यामुळे त्याची सुटका काही झाली नाही, पण आयुष्यभराचे विकार मात्र मागे लागले.
३. पुढे परिस्थिती अजून चिघळली आणि छगनचे काम पूर्णपणे थांबते. आता हे आधुनिक सावकार बबनने दिलेले धनादेश पटापट बँकेत टाकून त्यांना उडवण्याचा सपाटा लावतात, आणि १३८ कलमाच्या नोटिशी टाकतात वर Arbitration चा निःपक्षपाती (?) पर्याय देखील मागे लावतात. आणि वसुलीकारांचा वसुलीसाठीचा तगादा सुरूच असतो, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा प्रत्येक विभाग आपले काम चोख करत असतो.
४. अशात एक दिवस छगनला कोर्टाचे समन्स येतात ते पण कलकत्त्याहून, आणि छगनकडे तिकडे जायचे पैसे नसतात त्यामुळे छगनतिथे जाऊ शकत नाही. इकडे छगनला वाटत असते कि कोर्ट त्याला अजून एक संधी देईल, पण कसच काय पहिल्याच तारखेला छगनच्या नावाचे अटक-पत्र निघते. आता छगनचा कॉलेजातला मित्र सौरभ त्याच्या मदतीला धावून येतो. तो त्याला कलकत्यामधला एक वकील उपलब्ध करून देतो. पण इकडे वसुलीकारांमुळे कातावलेला छगन जामिनाचे पैसे उभे करता करता अक्षरशः मेटाकुटीला येतो. त्यात अटक-पत्र घेऊन आलेले पोलीस त्याची अगदी आस्थेने चौकशी करतात, आणि अटक–पत्र रद्द झालेले असून देखील आपली मलई अगदी हक्काने प्रेमाने ओरबाडून घेतात.
अशा रीतीने स्वतंत्र भारतातील आधुनिक सावकार छगनला आपल्या पाशात अलगदपणे टिपतात, आणि छगन.................
वाचने
7601
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
बापरे!!
शेर भाई ,,,
In reply to शेर भाई ,,, by अमर विश्वास
बेसिक मधेच लोचा आहे
बेसिक मधेच लोचा आहे
तर्कात हे सगळे अजिबात बसत
दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
In reply to दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत by शेर भाई
शेर भाई काय गोंधळ घालताय !
अभिहस्तांतरण न झालेली आहे हे
कॅश क्रेडीट आहे
छगन, छगनच आहे आणि लिहणारा एक नंबरचा सत्या.........
छगन, छगनच आहेआणि बाकी मिपाकरांनी गगनात जावे !
छगन छगनच आहे
हे भाई काय म्हणत आहेत हे कोणी
हेच तर हवे आहे आणि याच बरोबर हे पण
In reply to हेच तर हवे आहे आणि याच बरोबर हे पण by शेर भाई
शेर भाई ...
लोचाच आहे सगळा
हा कल्पनाविलास नाही.?
शेर भाई
In reply to शेर भाई by राजेंद्र मेहेंदळे
क्रिमिनल लॉयर्=फौजदारी वकील
Arbitration चे सुगम प्रकार
In reply to Arbitration चे सुगम प्रकार by शेर भाई
If I am understanding right,
In reply to If I am understanding right, by गवि
सगळेच अतर्क्य, गूढ आहे.
अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ही
In reply to अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ही by गवि
हे नाही समजले
In reply to हे नाही समजले by शेर भाई
काल्पनिक नव्हे.
पकडा गया वो चोर
In reply to पकडा गया वो चोर by शेर भाई
Territorial Jurisdiction
In reply to Territorial Jurisdiction by अमर विश्वास
तुमची व्याख्या पुस्तकातील आहे
In reply to Territorial Jurisdiction by अमर विश्वास
Territorial Jurisdiction?
In reply to Territorial Jurisdiction? by शेर भाई
अहो भाई
In reply to अहो भाई by राजेंद्र मेहेंदळे
थोडी सुधारणा