मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक कोडं (पाहा जमतंय का सोडवायला)!

एस.बी · · जनातलं, मनातलं
बघा सुटते का सोडवून!!!!!!!!! कोर्टाची अडचण... कोण्या एका काळी एका देशात एक खूप नावाजलेला प्रसिद्ध वकील होता...युक्तिवाद करण्यात त्याचा हातखंडा होता...त्याच्याकडे शिकायला म्हणून खूप लोक वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार होते...पण त्याला एकच विद्यार्थी हवा होता जो त्याचा वारसा समर्थ पणे चालवू शकेल... एक दिवशी एका गरीब विद्यार्थ्याने त्या वकिलाला विनंती केली की त्याने त्याला शिकवावे तो पुढे जाऊन त्याच्या हुन मोठा वकील बनेल आणि पहिली केस जिंकल्यास त्याचे मानधन गुरुदक्षिणा म्हणून देईल . वकिलाला त्याचा आत्मविश्वास आवडला त्याने त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारून एकदम तरबेज केले. आणि साऱ्या देशात ही गुरु शिष्याची जोडी नावारूपास आली.. लवकरच हा वकील निवृत्त होऊन आपला सर्व कारभार या तरुणाच्या हातात द्यायचा विचार करत होता. पण एक दिवशी या तरुणाने घोषणा केली...की या पुढे तो वकिली पेशा करणार नाही तर तो वकिली पेशाचे शिक्षण देणारे संस्थान उभे करून सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देईल .. हा निर्णय त्या वकिलाला आपल्यासोबत झालेला धोका वाटला आणि त्याने त्या तरुणाला न्यायालयात खेचले..आणि तिथे वकिलाने युक्तिवाद केला की तरुणाने त्याला फसवले आणि सर्व वकिली शिक्षण घेऊन आता तो वकील न बनता शिक्षक बनत आहे..त्यामुळे त्याने आपली शिक्षण घेतल्याची फी द्यावी यावर तरुणाने युक्तिवाद केला की मी गुरुजींना मी वकील बनेलच असे कोणते ही वचन दिले नव्हते मी फक्त माझ्या आयुष्यातील पहिली न्यायालयीन केस मी जिंकलो तर फी देईल असे म्हणलो होतो ... पण मी आता वकील नाही शिक्षक आहे त्यामुळे मी केस लढणार नाही आणि त्यामुळे मी गुरुजींना पैसे देणार नाही.. या वर गुरु वकिलाने युक्तिवाद केला की त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहे पण सध्या तो स्वतः ची बाजू मांडायला न्यायालयात वकील म्हणून आला आहे आणि जर त्याचे म्हणणे आपणास मान्य असेल तर मी केस हरलो आहे आणि तो केस जिंकला आहे त्या मुळे वकील म्हणून तो पहिली केस जिंकला आहे त्यामुळे त्याने मला पैसे द्यावेत.... तरुण यावर असे म्हणतो की...गुरुजींचे म्हणणे एकदम योग्य आहे परंतु मला न्यायालयात कोणत्या कारणास्तव खेचले आहे हे लक्षात घ्या! मी गुरुजींना पैसे देणं लागतो की नाही या मुद्द्यावर माझे म्हणणे आहे की मी पैसे देणं लागत नाही ...मग जर मी केस जिंकलो तर मी पैसे देणं लागत नाही आणि जर मी केस हरलो तर माझ्या आयुष्यातील पहिली केस मी हरल्यामुळे मी गुरुजींना पैसे देणे लागत नाही... गुरुजी वकील यावर म्हणतात की ह्याच हिशोबाने जर केस पैसे देण्याच्या* *बंधनबद्दल असेल तर मी केस जिंकलो तर* *मला पैसे मिळायला हवेत आणि मी केस हरलो म्हणजे तो केस जिंकला मग पहिली केस जिंकल्यामुळे मला पैसे मिळाले पाहिजेत. काय करायचं काय ह्या निकालात .??????

वाचन 18824 प्रतिक्रिया 0