शिक्षणाचे मानसशास्त्र - प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप
लेखनप्रकार
To लिही, or not to लिही! That is the प्रश्न!
'प्रश्न' या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का - प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड. (टीप: सावधान! लेख मोठा आहे.)
प्रश्नाबद्दल प्रश्न मी का विचारतो आहे?
त्यासाठी हे दोन उदाहरण पहा.
- अथर्ववेदा मधे प्रश्नोपनिषद नावाचे उपनिषद ज्याचे स्वरूप प्रश्नोत्तर असे आहे. या उपनिषदाचे स्वरूप शिष्यांनी पिप्पलादांना विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं असे आहे. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान मांडले आहे.
- विख्यात तत्त्ववेत्ता सॉक्रेट्स आपल्या शिष्याना एक प्रश्न विचारायचे. विचार करून शिष्य उत्तर द्यायचे की ते त्यांचाच उत्तरातून उद्भवलेला प्रश्न विचारायांचा. असे करून त्यांनी सखोल आणि सर्वांगीण विचार करून प्रश्नांचे उत्तर शोधण्यास शिकवले. महान तत्त्ववेत्ता प्लेटो हा यांच्या शिष्य.
- खुले (Open ended) प्रश्न (वर्णनात्मक किंवा मुक्त अभिव्यक्ती प्रश्न) असे प्रश्न उत्तर देणाऱ्याला आपला विचार मांडण्यास संपूर्ण स्वातंत्र्य देतात. उत्तराचा विशिष्ट साचा, दिशा, परिपूर्णता असावी ई. कुठल्याही अटी नसतात. हे प्रश्न उत्तर देणाऱ्याशी संवाद साधण्यासाठी, त्याचे विचार, समज-उमज जाणण्यासाठी उपयुक्त असतात. उत्तराचा आधार घेऊन संवाद पुढे नेण्यासाठी वाव असतो. उदा: दिवाळीत फटाके उडवण्यावर तुमचे काय मत आहे? (पूर्णपणे मुक्त विचार) दिवाळी मध्ये फटाक्यांचा वापर करणे कितपत योग्य आहे? (विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न दिसतो, तरीही खुला प्रश्न.)
- बंद (Close ended) प्रश्न या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आणि स्वच्छ असते. त्यावर एकच प्रतिक्रिया असू शकतो चूक किंवा बरोबर. चर्चा, संवाद, किंवा विस्तार नसतो. ऊत्तर बरोबर किंवा चूक का आहे हा पुढचा प्रश्न किंवा प्रतिक्रिया होते. प्रश्नाप्रमाणेच शैक्षणिक उपयोगही रोखठोक आहे. ज्ञात आहे का नाही, येतं का नाही असा सरळ स्पष्ट निष्कर्ष मिळतो. यात व्यक्ती किंवा स्थिती विशिष्ट असे काही नसते. सब्जेक्टिव्हिटी नाही, असल्यास प्रश्न सदोष होतो. पक्षपात होत नाही. उदा: पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा प्रवेग किती? (एकाच उत्तर बरोबर आणि त्यावर चर्चा नाही.) भारतात विविध संस्थांना मतदानाचा हक्क कोणाला मिळतो? (अनेक उत्तर आहेत, पण तरीही बंद प्रश्न.)
- शोधक प्रश्न. (Probing) हा प्रकार खोलात जाण्याचा प्रयत्न करतो. आधी दिलेल्या उत्तराच्या किंवा कथनाच्या अनुषंगाने विचारले जातात. उदा: विक्रमादित्य वेताळ गोष्टीमधे विक्रमादित्याला वेताळ कुठे भेटला? उदा: विक्रमादित्य जंगलात का गेला होता? विक्रमादित्याने मौन का सोडले? वेताळाच्या अटी काय होत्या?
- सूचक प्रश्न. (Leading) प्रश्नच उत्तराची सुचना देतो. सर्वतोपरी वर्ज्य प्रकार मानला जातो. चित्रपटातले वकील अशा प्रश्नांना ऑब्जेकॅशन म्हणत हरकत घेतात आणि न्यायाधीश सस्टेंन्ड ओवर रूल्ड म्हणताना आपण पहिलेच आहे. उदा: राखी पौर्णिमा हा शुभ दिन आहे हे हिंदू म्हणून तुम्हाला मान्य आहे ना?
- गृहिताग्रही प्रश्न. (Loaded) या प्रश्नात पूर्व गृहितांचा किंवा हेतूंचा आग्रह. उदा. मूक प्राण्यास दगड मारणे कधी थांबवलेत? (इथे उत्तर देणारा दोषी आहे हा पूर्वगृह दिसतो.)
- भावनात्मक उद्गार दर्शक. (Rhetorical) उत्तराचे अपेक्षा नाही, केवळ भावना व्यक्त करण्यासाठी उपयुक्त. उदा: टू बी ऑर नॉट टू बी? दैव जाणिले कुणी?
- फसवा प्रश्न (Trick) हा प्रश्न दिशाभूल करणारे शब्दांकन वापरतो. करमणुकीसाठी उत्तम. उदा: एका मुंगीच्या मागे दोन आणि पुढे दोन मुंग्या उभ्या आहेत. एकूण किती मुंग्या आहेत?
- ज्ञानदान --- ज्ञान मिळवणे / देणे (Delivery) =====>
- सक्रिय संवाद --- पूर्व ज्ञान, ई. वापरून विचार प्रक्रिया जागृत करणे (Interaction) =====>
- अनुभूती --- आत्मसात करणे, अनुभव, वापर प्रयोग, स्मृती (Internalisation) =====>
- सिद्धी --- कौशल्य, कसब, स्मृती, संज्ञान, पूर्व ज्ञान कोशात ज्ञान समाविष्ट करणे unknown to known (Assimilation & Integration) =====>(पुन्हा 1. ज्ञानदानाकडे ...)
वाचने
4990
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा!
हे वाक्य सर्वाधिक आवडलं.
:) गंमत हो!
प्रश्न विचारणं खरंच अवघड असतं.
शाळेत, कॉलेजात मास्तर्स म्हणतात, अनी क्वेश्चन्स? कुणाला प्रश्न पडले नाहीत तर, त्याचे दोन अर्थ - एकतर सगळ्ं समजलंय, किंवा काहीच कळलं नाही.
पण बर्यापैकी कळून प्रश्न न पडण्यात चूक काय आहे?
शिवाय आपल्याकडे प्रश्न पडू न देण्याची संस्कृती आहेच.
लहानपणापासून अर्ध्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे 'गप, तुला काय करायचंय?' , 'गप, शहाणपणा करू नको' अशी असतात. मग तो प्रश्न तयार होणारा मनाचा/मेंदूचा भाग हळूहळू निष्क्रीय होतो. आणि मग प्रश्नच पडत नाहीत.
In reply to इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा! by तुषार काळभोर
काही वेळेस प्रश्न पडतात, पण व्यक्तिगत मला तरी असे प्रश्न कोणाला तरी विचारण्यापेक्षा स्वतः उत्तरे शोधण्यात जास्त आनंद मिळतो.. त्यामुळे माझी ख्याती *प्रश्न न विचारणारा* म्हणून झाली आहे.
बाकी, *प्रश्न विचारणारे* किंवा प्रश्नांचे प्रकार यात अजून देखील एक विभाग आहे..
त्यामध्ये
1. विचारायचे म्हणून विचारले जाणारे प्रश्न
2. ज्ञानप्राप्तीसाठी विचारले जाणारे प्रश्न
आणि
3. ज्ञानाच्या प्रदर्शनासाठी विचारले जाणारे प्रश्न
असे प्रकार आहेत..
यावर पण थोडे लिहा असे सुचवेन.. विशेषतः प्रश्नसंस्कृतीचा विकास, विकासाच्या आडून आलेली सूज आणि gunpoint innovation सारखे gunpoint questions हा पण एक वेगळा विषय आहे.
In reply to काही वेळेस प्रश्न पडतात, पण by आनन्दा
धन्यवाद. आपल्या सूचना मी जरूर विचारात घेईन - हा लेख उपडेट कसा करायचा हे मला माहित नाही - सापडेल कधीतरी. "gunpoint innovation सारखे gunpoint questions" ह्या संकल्पना मला नवींन आहे. कृपया थोडेसे त्याबद्दल सांगा.
In reply to इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा! by तुषार काळभोर
धन्यवाद. आपला लेख वाचला गेला आणि त्यावर छान प्रतिक्रिया आली के बारा वाटत. any questions हे औपचारीक पणे विचारतात. खरे प्रश्न विचार केल्यावरच येतात नव्हे विचारांची जी काही क्रिया असेल ती प्रश्नानीच सुरु होते असं मला वाटतं.
छान माहिती.
In reply to छान माहिती. by हेमंतकुमार
धन्यवाद
फार महत्वाचा विषय आहे हा.
एक नेमका प्रश्न मोठ्या ज्ञानभंडाराची गुरुकिल्ली असु शकते.
किंबहुना योग्य प्रश्न पडले तरच कुठल्याही विषयात प्रगती संभवते.
In reply to उत्तम लेख. लेखनशैली तर खासच :) by अर्धवटराव
धान्यवाद. प्रश्नांचे शब्दांकन करणे अवघड असते आणि हे जाणवते. लोभ असावा. "By defining exactly what the researcher is trying to find out, questions influence most of the rest of the steps taken to conduct the research. That’s true even if the research is not for academic purposes but for other areas of our lives." https://guides.osu.edu/ld.php?content_id=41926909
To आस्क, or not to आस्क ! That is the डिलेमा !
छान.
आता या विषयावर एक प्रश्नोपनिषद होऊन जाऊ दे.
इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा!