मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोन्साय

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
.. ती मॉडर्न सावित्री होती वडा च्या फांदीची पूजा तिला मान्य नव्हती - तीन वडा च बोन्साय विकत आणलं व यथासांग पूजा केली - दारावर टकटक झालं तीन दार उघडलं - दरवाज्यात एक तीन फुटी माणूस उभा होता - अरे तू कोण ? - सावित्री मी सत्यवान तुझा पती - अर्रे तू तर चागला पाच फूट आकरा इंच उंच होता तुज असं कस झालं ? - तू वडा च बोन्साय पूजला वडा न मला बोन्साय केलं - तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली

वाचने 3357 वाचनखूण प्रतिक्रिया 7

आनन्दा 18/06/2019 - 21:24
. तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली
हा म्हणजे क्लायमॅक्स आहे. क ह र
नवीन संपूर्ण चातुर्मासातल्या खऱ्या कथा. --- उतला मातला घेतला वसा टाकू नये. ज्येष्ठी पुनवेस आख्ख्या वडाची पुजा करावी, फांदी आणू नये.
नवीन संपूर्ण चातुर्मासातल्या खऱ्या कथा. --- उतला मातला घेतला वसा टाकू नये. ज्येष्ठी पुनवेस आख्ख्या वडाची पुजा करावी, फांदी आणू नये.

खिलजि 21/06/2019 - 14:21
जबराट लिवलंय अक्कुकाका .. एव्हढं जबराट कि मेंदूचे बोन्साय करून टाकलेत ... विचारांच्या पारंब्या लोम्बुन लोम्बुन डोक्याचा पार भुगा झाला चला आजचा वाचनाचा दिवस बोन्साय झाला..

डॉ सुहास म्हात्रे 21/06/2019 - 14:31
=))

Rajesh188 24/06/2019 - 10:14
शीर्षक वाचून मला वाटलं होत की बोन्साय विषयी विस्तृत माहिती असेल . म्हणून कथा वाचली तर भलतच वाचायला मिळाला . लब्बाड आहे लेखक pkt Che cover वेगळे आणि आतमध्ये सामान वेगळेच