Skip to main content

फिशिंग अलर्ट माझा अनुभव डॉ. स्पर्शिका जोशी

लेखक श्वेता२४ यांनी मंगळवार, 14/08/2018 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपावर फिशिंग अलर्ट संदेश वाचला आणि खूप दिवसापासून चुटपुट लागून राहिलेल्या भावनांना वाट मिळाली आणि जी माहिती किंवा लेख सगा सरांनी दाखवला(हा लेख कोणीतरी मायबोलीवर लिहिला आहे) तो पाहून मी उडालेच. कारण मी पण अगदी याच अनुभवातून गेले आहे. सबब समस्त मिपाकरांना सावध करण्यासाठी खासकरून महिला सदस्यांसाठी हा लेख. डॉ. स्पर्शिका जोशी यांनी मला 7 जुलै च्या आसपास व्यनि केला की त्यांना माझ्या काही पाककृती आवडल्या. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी टिचकी मारली पण एक अशा आशयाचा संदेश झळकला कि त्यांना कुणीही प्रति संदेश पाठवू शकत नाही. मला हे विचित्र वाटलं. पण अशी काही सेटिंग करता येत असेल व मला माहित नसेल असं वाटलं. त्यानंतर लगेचच मला मेल आला की आपण बोलू शकतो का ? मला तुमची मदत हवी आहे. त्यावर मी त्यांना मला जमेल तशी करेन असा मेल पाठवला. त्यावर त्यांनी आपण चॅट वर बोलू असं सांगितलं. मी त्यांना शक्य नसल्याचे कळवले. त्यावर दुसरे दिवशी त्यांनी विंडो ओपन करून त्याचा पासवर्ड दिला पण मी त्यांना मला जमणार नाही आपण मेल वर बोलू असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी स्त्रीरोगतद्न्य असून वेदना न होणारे जेल शोधून काढले आहे जेणेकरून इंजेक्शन दिल्यावर वेदना जाणवत नाही असे सांगितले. मी या जेलचे काय घटक आहेत व याची काय साईड इफेक्ट आहेत ते विचारले . त्यांनी त्याचे नीट स्पष्टीकरण दिले. त्यांनी मला इंजेक्शन बाबतचे अनुभव विचारले मीही त्याची प्रामाणिकपणे उत्तरे दिली. हे तीन चार दिवस चालू होते कारण मला जमेल तसे मी मेल वर मराठी टाईप करून उत्तरे देत होते. मला त्यांनी कोल्हापुरात त्यांची मावशी राहते व त्यांचे क्लिनिक बांद्रा वेस्ट ला असल्याचे सांगितले. एव्हाना आम्ही बऱ्यापैकी सरावले होतो एकमेकींना. टाइपिंग चा कंटाळा असल्याने व मेल वरचेवर पाहण्याची सवय नसल्याने मी त्यांना माझा मोबाइल नं देऊन त्यावर वॉट्स अँप करा असे सांगितल्यावर माझा फोन मी केवळ imergency ला वापरते असं सांगितलं. मी जरा दुखावले गेले होते . त्यांचं असं वागणं अपेक्षित नव्हतं. कदाचित त्यांनाही हे जाणवलं असेल. त्यानंतर आजतागायत माझा त्यांच्याशी संपर्क नाही. पण खरा धक्का अजून मला बसायचा होता...... आज मी मिपावरचा संदेश वाचताच क्षणात मला स्पर्शिका आठवली. मी सरपंच ना संदेश पाठवला. खफ वर सगा सरानी त्यांचा उल्लेख केल्यावर त्यांनी माबो वरचा लेख जोडलेला वाचला आणि लक्षात आलं की मी पण हेच अनुभवलंय. पण खरं धक्का पुढे आहे..... हा लेख लिहायचा म्हणून gmail वरचे तिचे reply इथे पेस्टवण्यासाठी शोधले तर आमचे सर्व संभाषण उडवले गेले आहे......... मी अगदी trash फोल्डर हि तपासले. आमचे संभाषण झालयाचा एकही पुरावा शिल्लक नाही...... केवळ एक draft आहे पण त्यात काहीही लिहिलेले नाही. फक्त तिचा gmail address सापडला sparshika@ gmail.com ...........
लेखनविषय:

वाचने 26817
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

त्यानंतर आजपर्यंत हॅकिंग वगैरे इतर काहीही नुकसान झालेलं नाहीये. त्यामुळे "एका विचित्र मनोवृत्तीच्या माणसाशी झालेलं संभाषण" असं समजून आता विषय सोडून दिलाय.

गुगलने जी-मेल साठी ऑटो-डिलीट सुविधा आणलेली दिसते, त्याचा वापर स्पर्शिका जोशी यांनी केला असावा असे वाट्ते. जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल

जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल -- हे फिचर फक्त मोबाईलसाठी आहे का ? कारण पीसीतून जीमेल ओपन केल्यास ते "Confidential" ऑप्शन, COMPOSE मेल मध्ये दिसत नाही.

लोकहो, इथला मिपावरचा व माबोवरचा असे दोन्ही लेख व प्रतिक्रिया वाचल्या. एकंदरीत हा पुरुष दिसतोय. याला टोचनोद्दीपनाचा ( = इंजेक्शन फेटीश ) विकार जडलेला वाटतो हे इथलं निरीक्षण बरोबर दिसतंय. विकार अशासाठी की केवळ कामोद्दीपन साधणं निरुपद्रवी असतं. पण त्याचा इतरांना किंवा स्व:ला त्रास होऊ लागला की त्याचा विकार होतो. माझ्या मते तो अनेक बायकांशी बोलून घेऊन नंतर सावकाश स्वत:स उद्दीपित करीत असावा. २०१२ साली बायकांचा 'स्टॉक' करून ठेवला असावा. तो संपल्यावर परत साठा भरण्यासाठी सक्रीय झालेला आहे. ज्याअर्थी तो गूगल हँगाऊट वर बिनदिक्कीत बोलावतोय त्याअर्थी त्याच्याकडे पुरुषी आवाज स्त्रैण बनवण्याचं सॉफ्टवेअर असावं. आ.न., -गा.पै.