सर्व प्रथम आपण पाहुया की आपल्या केसांना काळा रंग कसा प्राप्त होतो. तर आपल्या केसांचा रंग हा केसातील रंगकाणांवर म्हणजे मेलेनिन मुळे ठरतो. ज्या रंगाचे मेलेनिन त्याच रंगाचे केस असतात म्हणजे मेलेनिन काळे तर केस ही काळे आणि मेलेनिन जर तांबुस असतील तर केसही तांबुस असतात. ब्लाँड , ग्रे, ब्राउन या नैसर्गिक छटांच्या मेलेनिनची रचना वेगळी असते. जेव्हा या नैसर्गिक मेलेनिन चे प्रमाण अत्यंत कमी होते तेव्हा केस पांढरे होतात. शरीरात होणारे हार्मोनियल बदल, रक्तातील प्राणवायु, शरीरात असणारे लोह, तांबे, इतर जीवन सत्वे , क्षार यांची कमतरता अशा काही मुख्य कारणांमु़ळे केसांचा रंग बदलुन पांढरा होतो आणि एकदा का केसांचा रंग पांढरा झाला की तो नैसर्गिक रीत्या बदलत नाही. असे अकाली पांढरे झालेले केस बहुतकरुन कुणाला आवडत नाहीत.आजकाल हेअरकलर म्हणजे फक्त पांढरे केस काळे करणे इतकच नव्हे तर फॅशनचा एक अविभाज्य भाग बनुन गेले आहे. काळा , चॉकलेटी , मरुन , बरगंडी, पिंगट अशा वेगवेगळ्या छटा याला आजकाल सगळीकडे पसंती आहे. त्यात चाळीशी आली की डोक्यावर रुळणारे रुपेरी केस आपल्याला आपल्या वार्धक्याची जाणीव करुन देतात. सण-समारंभ , लग्न , मंगल कार्य यात सगळेजण आपल्या रुपेरी केसांवर एक मुलामा देउन वावरत असतात. आजकाल केस रंगवण्याचे बरेच प्रकार बाजारात उपलव्ब्ध आहेत पण पुर्वी मेंदी आणि तत्सम नैसर्गिक वस्तुंचा केस रंगवण्यासाठी वापर केला जात असे. चला तर पाहुया केस रंगवण्याचे आधुनिक प्रकार आणि छटा. आपल्या भारतात केसांच्या रंगांबद्दल जास्त जागरुकता दिसुन येत नाही. बर्याचदा डोळ्यांंची जी छटा असते त्या छटेचे केस त्या व्यक्ति ला शोभुन दिसतात पण आपल्याकडे काळा, चॉकलेटी हे रंग जास्त प्रमाणात वापरले जातात.
कलप किंवा डाय करण्याचे प्रकार -
मेंदी - मेंदी हे नैसर्गिक कलप आहे. त्याबरोबर ते कंडीश्नर हि आहे.इजिप्शियन राणी "सेसा" हिने मेंदीचा वापर केल्याचे माहीत आहेच. पुर्वापारापासुन आपल्याकडे मेंदी चा वापर केस रंगवण्यासाठी केला जातो.यामधे रंग निर्माण करणारे लॉसन असते. मेंदी चा इतर केमिकल डाय प्रमाणे कुठलाही दुष्परीणाम नसतो काळ्या हेअर डाय ने केस खुपच काळेभोर झाले तर मेंदी लावुन तो कलर जरा कमी करु शकतो. मेंदी मुळे केसांना नैसर्गिक चमक येते. पण जर केस खुपच पांढरे असतील तर मेंदी मुळे केसांना शेंदरी पिवळट छटा येते जी अज्जिब्बात चांगली दिसत नाही. मुळचे केस काळे असतील आणि बरेचसे पांढरे झाले असतील तर मेहेंदी मुळे पांढरे केस लालसर आणि काळे केस भुरकट दिसतात असा कलर चेहर्याला शोभुन दिसतो. मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावले असेल तर केस धुवुन घ्यावेत. साधारण लोखंडाच्या भांड्यात किंवा कढईत मेंदी २-३ तास चहा किंवा कॉफी उकळुन त्यात भिजत घालावी. मेंदी हे नैसर्गिक कलर कलप असल्याने रंग ये ण्यासाठी दुसरे काही घालण्याची गरज नाही पण केसांसाठी पोषक असे आवळा पावडर , नागर मोथा ,वाळा याचा वापर करु शकता. त्या नंतर केसाला मेदी लावुन २ तासाने धुवुन टाकावी. मेंदी केसाला लावायची पद्धत पुढच्या भागात देतेच आहे.
मेंदीमधे दुसरा मिसळला जाणारा वनस्पति जन्य रंगप्रकार म्हणजे "नीळ". या पानांची भुकटी जर मेंदीत मिसळली तर निळसर पासुन गडद काळ्यापर्यंत कोणत्याही रंगछटा केसांवर चढवता येतात. परंतु आजकाल याचा वापर कमी होतो. या शिवाय, कॅमोमिल, ब्राझिल वुड , अक्रोडाची हिरवी वाले याचा उपयोग करुन केसांसाठी निरनिराळे रंग बनवता येतात.
केमिकल डाय :— अलिकडे केमिकल डायने केस रंगविण्याचे प्रमाण वाढले आहे. यात गोदरेज हेअर डाय, गार्नियर, लॉरीयल , वेला , नुपुर मेंदीडाय अशा बर्याच नावाजलेल्या कंपन्यांची चलती आहे, स्वस्त आणि मस्त या वा क्याला अनुसरुन गोदरेज हेअरडाय च्या डाईला सगळ्यात जास्त मागणी आहे. पण जितके स्वस्त कलप तितके त्याचे दुष्परीणामही जास्त. हलक्या दर्जाच्या डाईने केस जास्त पांढरे होतात मग याचा वापर सतत करावा लागतो. केस गळणे अॅलर्जी , कोंड्याचे प्रमाण वाढणे हे प्रकार वाढतात. त्यातल्या त्यात वेला , लॉरीयल आणि नावाजलेल्या कंपन्यांची उत्पादने वापरणे बरे. पण तरीही केमिकल डाय वापरणे अपायकारकच. केमिकल डाय मधे आजकाल मेंदी डाय हा प्रकार हि खुप वापरला जातो. त्यातल्या त्यात मेंदी म्हंटल म्हणजे हर्बल आणि म्हणुन ते सेफ असणार असे बर्याच जणांचे मत असते पण हे साफ चुकीचे आहे. कारण यात काळा , बरगंडी या छटा असतात आणि त्या केमिकल डाय असल्याशिवाय मिळु शकत नाही. दुसरा प्रकार म्हणजे शाम्पु बेस डाय. उदा. वॅसमॉल केश काला. या प्रकारात डाय हा शॅम्पु प्रकारात असतो. केसांवर काही वेळ ठेवुन धुवुन टाकल्यावर हवा तो कलर केसांना येतो.
पर्मनंट हेअर डाय हा प्रकार हि फॅशन जगतात खुप फेमस आहे. यात हेअर कलर केसांना पर्मनंट लागतो पण आपल्या केसांची सतात वाढ होत असते , जस जसे केसांची वाढ होते नवीन आलेल केस हे नैसर्गिक रंगाचेच येतात त्यामूळे आपल्याला नवीन केसांना डाय करावेच लागते. आपल्या चेहफ्याच्या कलर ला सुट होईल असे कलर वापरणे योग्य ठरते. जसे गोर्यापान वर्ण असलेल्या करड्या रंगांचे डोळे असणार्या व्यक्तिंना ग्रे कलरचा हेअरकलर जास्त सुट होतो . तसेच चॉकलेटी यात डार्क , मिडीयम , लाईट हे शेड , बरगंडी या शेडस ही खुप सुट होतात. सावळया वर्णाच्या व्यक्तिंना चॉकलेटी यात डार्क , मिडीयम , लाईट हे शेड ही सुट होतात. बर्याच दा केसांचे थोडे थोडे भाग घेउन ब्लाँड , बरगंडी , पिंक अशा शेडसने रंगवले जातात.
तर पुढच्या भागात आपण हेअर डाय करण्याचि पद्धत तसेच मेंदी डोक्याला लावायची पद्धत पाहु.
वाचने
9003
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण लेख.पुभाप्र
चांगली माहिती कविता .
मस्त माहिती
काळी मेहेंदी लावणे कितपत
काळी मेंदी ही केमिकल युक्तच
In reply to काळी मेहेंदी लावणे कितपत by वटवट
एक विशेष सूचना -- नैसर्गिक
बर.. मग घरगुती काळी मेहेंदी
In reply to एक विशेष सूचना -- नैसर्गिक by सुबोध खरे
काळी मेंदी असा काही प्रकार
In reply to बर.. मग घरगुती काळी मेहेंदी by वटवट
अच्छा म्हणजे घरच्या घरी केस
In reply to काळी मेंदी असा काही प्रकार by कविता१९७८
घरच्या घरी म्हणजे ? घरच्या
In reply to अच्छा म्हणजे घरच्या घरी केस by वटवट
अहो... मी तसेच केस काळे करतो.
In reply to घरच्या घरी म्हणजे ? घरच्या by कविता१९७८
छान
वयाच्या चौदाव्या वर्षांपासून
डांगे अण्णा
In reply to वयाच्या चौदाव्या वर्षांपासून by संदीप डांगे
=)) धन्यवाद खरेसाहेब!
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
तुम्ही भेटलात तेव्हा केस डाय केले होते असं अजिबात जाणवलं नाही.
In reply to =)) धन्यवाद खरेसाहेब! by संदीप डांगे
आमचं सगळंच डिफ्रंट! ;) =))
In reply to तुम्ही भेटलात तेव्हा केस डाय केले होते असं अजिबात जाणवलं नाही. by बोका-ए-आझम
सेम स्टोरी हिअर
In reply to वयाच्या चौदाव्या वर्षांपासून by संदीप डांगे
;)
In reply to सेम स्टोरी हिअर by धर्मराजमुटके
मुसलमानी छाप केस
In reply to वयाच्या चौदाव्या वर्षांपासून by संदीप डांगे
नका हो नका असं करू... धागा
In reply to मुसलमानी छाप केस by कपिलमुनी
छान लिहिलयस
बायको...अहो माझे केस पांढरे
छान माहिती, अगदी व्यवस्थित
छान उपयोगी माहिती.
चांगली माहिती
गो वुइथ नेचर....
माझा आजपर्यंत एकही केस पांढरा
समजलं नाही, नक्की काय झालं
In reply to माझा आजपर्यंत एकही केस पांढरा by खटपट्या
या वयात संपूर्ण केस काळे असणे
In reply to समजलं नाही, नक्की काय झालं by संदीप डांगे
चालायचंच!
In reply to या वयात संपूर्ण केस काळे असणे by खटपट्या
माझे एकाच बटेचे केस मधेच