काही ही हां ... उभाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , कंडोम परिधान केलेल्यांनाच् डान्सबारमध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश मिळणार , उभाकर घालतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , कंडोमसक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक व्यवहार कसा समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही घालते साहेब ???
मुळातच कंडोम अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि कंडोमही पूर्णपणे सुरक्षित आहे का , कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण.
कंडोमपेक्षाही महत्वाचे आहे आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक!
हे राहिले बाजूला आणि कंडोम सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी कंडोम सक्ती.
(या लेखात अनेक ठिकाणी शुद्धलेखन दुरुस्त करणं, योग्य ठिकाणी प्रश्नचिन्हं किंवा उद्गारचिन्हं घालणं वगैरेचा मोह झाला होता. कितीतरी ठिकाणी स्वल्पविरामाअलिकडची स्पेस काढावीही वाटलं होतं. पण विडंबन करायचं म्हटल्यावर मूळ लेख अनाघ्रात ठेवावा लागतो. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)
वाचने
16931
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजेश घासकडवी,