छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे.
आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे १० फेब्रुवारी. प्रवेशिकेबरोबर फुलाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.
या विषयाबद्दल सर्वसाक्षी यांचे मत -
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला स्पर्धेसाठी 'फूल' हा विषय द्यायला आवडेल. म्हटलं तर अतिशय सोपा आणि सर्वत्र आढळणारा साधासुधा विषय. वॉसपची सकाळ उजाडते ती सपुष्प सदिच्छांनी. आपल्या शुभेच्छांमध्ये फूल हे असतच. समारंभात सजावटीला, उत्सवाला, कार्यक्रमाला, पूजेला फुलं हवीतच. अगदी मेजावर साध्याशा पात्रात रचलेली फुलं सुद्धा चित्तवृत्ती उल्हसित करतात. पुष्परचना ही तर एक कला आणि मोठा व्यवसायही आहे. निसर्गाचं वैविध्य फुलांमध्ये पाहायला मिळतं. एखादं चांगलं फुल दिसल्यावर ते टिपायचा मोह आवरत नाही, अर्थात अनेकांकडे अशी चित्रे असतीलच, शिवाय विषय सर्वत्र सहजपणे उपलब्ध असल्याने नव्याने चित्रित करणे सहज शक्य आहे.
विषय जरी फूल असा एकवचनी असला तरी फूल, फुलांचा ताटवा/ गुच्छ, बहरलेली डहाळी/ वेल, मळा हे सर्व काही समाविष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मिपाकरांनी टिपलेली सुरेख चित्रे पाहायला मिळतील. फूल सुरेख, वैशिष्ट्यपूर्ण असण्यापेक्षा फुलाचे प्रभावी चित्रण स्पर्धेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे कारण स्पर्धा फुलांची नसून फुलांच्या चित्रणाची आहे. इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत, चित्र खर्या फुलाचे/फुलांचे असावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~





मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी कृपया चित्रांवर क्लिक करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे
~ सर्वसाक्षी यांनी काढलेली फुलांची चित्रे ~





मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी कृपया चित्रांवर क्लिक करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतु ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक
व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय
व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
वाचने
46436
वाचनखूण
प्रतिक्रिया
121
वा वा ! सर्वाधीक प्रवेशिका या
In reply to वा वा ! सर्वाधीक प्रवेशिका या by मोहन
+1
विषय मस्त...
भाग घेतलाय.सर्वसाक्षींची
अवांतर
In reply to अवांतर by कंजूस
तो गुच्छ कोणी कोणाला दिला
अवांतर - २
नियम वर क्लिक केलं की 'पगे
In reply to नियम वर क्लिक केलं की 'पगे by सूड
धन्यवाद
प्रवेशिका
In reply to प्रवेशिका by साहित्य संपादक
स्वतःच प्रव्शिका टाकल्यावर
In reply to स्वतःच प्रव्शिका टाकल्यावर by अभ्या..
=))
In reply to =)) by प्रचेतस
बाकी त्या फुलाच्या मागे अजून
In reply to बाकी त्या फुलाच्या मागे अजून by प्रचेतस
फुलामागे सगळेच फूल.
In reply to फुलामागे सगळेच फूल. by अभ्या..
एक फूल दो माली.
In reply to बाकी त्या फुलाच्या मागे अजून by प्रचेतस
फुल तो फुल है आंखो से घिरे
In reply to फुल तो फुल है आंखो से घिरे by शब्दबम्बाळ
फुल तो फुल है आंखो से घिरे
In reply to फुल तो फुल है आंखो से घिरे by नूतन सावंत
नक्कीच लक्ष देईन! एक डाव माफी
In reply to नक्कीच लक्ष देईन! एक डाव माफी by शब्दबम्बाळ
धन्स.
In reply to स्वतःच प्रव्शिका टाकल्यावर by अभ्या..
स्पर्धकांचे नाव
In reply to स्पर्धकांचे नाव by साहित्य संपादक
ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण
In reply to ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण by प्रचेतस
आणि मूळातच इतर स्पर्धांसाठीही
In reply to आणि मूळातच इतर स्पर्धांसाठीही by प्रचेतस
हम्म तोच मुद्दा होता. असो.
In reply to ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण by प्रचेतस
दोन कारणे
- स्पर्धापद्धतींमध्ये सातत्य असणे
- बरेच स्पर्धक तांत्रिक कारणांमुळे योग्य प्रकारे प्रवेशिका प्रकाशित करू शकत नाहीत. या पद्धतीमुळे अशा समस्यांचे निराकरण प्रवेशिका प्रकाशित होण्यापूर्वीच होऊ शकते.
ही पद्धत मिपाकरांकडून वेळोवेळी मिळालेल्या सुचवण्यांनुसारच अवलंबिली गेली आहे.In reply to दोन कारणे by साहित्य संपादक
कारणे पटली नाहित त्यामुळे असो
In reply to कारणे पटली नाहित त्यामुळे असो by प्रचेतस
स्पर्धकांची नावे
In reply to स्पर्धकांची नावे by साहित्य संपादक
बैल गेला आणि झोपा केला असे
In reply to बैल गेला आणि झोपा केला असे by प्रचेतस
वल्ली शी सहमत
In reply to ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण by प्रचेतस
हे प्रचेतसचं म्हणणं पटलंय.
In reply to प्रवेशिका by साहित्य संपादक
(No subject)
In reply to प्रवेशिका by साहित्य संपादक
इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत
In reply to इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत by चांदणे संदीप
धन्यवाद
स्पर्धेसाठी नाही
In reply to स्पर्धेसाठी नाही by मयुरMK
का हो?
In reply to का हो? by चांदणे संदीप
ह्या आधी मी इथे हे चित्र
स्पर्धेसाठी नाही...
In reply to स्पर्धेसाठी नाही... by संदीप डांगे
"गुलमोहर"
(No subject)
In reply to (No subject) by संदीप डांगे
वाह
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
:)
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
धन्यवाद रंगाण्णा!
In reply to (No subject) by संदीप डांगे
छान फोटो काढले आहेत
In reply to छान फोटो काढले आहेत by मयुरMK
कॅनन १०००डी. लेन्स १८-५५
In reply to कॅनन १०००डी. लेन्स १८-५५ by संदीप डांगे
मी पण कॅमेरा घेण्याचा विचार
पांढरी फुले आवडतात कारण ती
(No subject)
स्पर्धेसाठी नाही
In reply to स्पर्धेसाठी नाही by नन्दादीप
छान फोटो आहे सर्व त्यातल्या
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
In reply to स्पर्धेसाठी नाही by स्पा
सर्वच फोटो सुंदर एकापेक्षा एक
स्पर्धेसाठी नाही
In reply to स्पर्धेसाठी नाही by पद्मावति
एक नंबर आहेत फुलं
हेदवी गणेश मंदिरातील एक फुल : स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही.
फुल
छान आहेत सर्व फुलं.
phul
fort jadhavgadh
In reply to fort jadhavgadh by अबोली२१५
:) मनमोहून टाकणारे छायाचित्र
ही स्पर्धा लई म्हन्जे लईच्च हुच्च होनारे असं दिसतंय.
In reply to ही स्पर्धा लई म्हन्जे लईच्च हुच्च होनारे असं दिसतंय. by तुषार काळभोर
पण मिपाकर मत कुठे देणारेत?
In reply to पण मिपाकर मत कुठे देणारेत? by यशोधरा
त्यांनापण नको ना कळायला की
In reply to त्यांनापण नको ना कळायला की by संदीप डांगे
यग्झॅक्टली!!
In reply to यग्झॅक्टली!! by तुषार काळभोर
आणि कळलं तरीही फरक पडणार नाही
In reply to आणि कळलं तरीही फरक पडणार नाही by यशोधरा
गुलदस्ता
In reply to गुलदस्ता by नंदन
=))
फुलं
In reply to फुलं by जे.जे.
क्लास!!!!
अवांतर
In reply to अवांतर by कंजूस
अहाहा
In reply to अवांतर by कंजूस
इकडे बेंगलोर मध्ये जास्वंदाच फूल च दिसत नाही :(
In reply to इकडे बेंगलोर मध्ये जास्वंदाच फूल च दिसत नाही :( by मयुरMK
कर्नाटकात( आणि तमिळनाडूत)
In reply to कर्नाटकात( आणि तमिळनाडूत) by कंजूस
कोकणातही.
In reply to कोकणातही. by यशोधरा
बाकी इथे दर २६ जानेवारी ला
In reply to बाकी इथे दर २६ जानेवारी ला by मयुरMK
आणि १५ ,१६,१७ ओगस्ट (August)
खालील फुले स्पर्धेसाठी नाहीत.
स्पर्धेसाठी नाही...
In reply to स्पर्धेसाठी नाही... by डॉ सुहास म्हात्रे
अजून काही....
स्पर्धेसाठी नाही
कहर...
माझीही फुलं
अजुन काही ...
In reply to अजुन काही ... by वैदेहीजी
१,३ बेगोनिया आहे का?
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
संगीतखुर्ची स्पर्धा: येताना स्पर्धकांनी स्वतः खुर्ची घेवून येणे
In reply to संगीतखुर्ची स्पर्धा: येताना स्पर्धकांनी स्वतः खुर्ची घेवून येणे by मराठी कथालेखक
तुमचं मत नक्की समजलं नाही.