प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .
वरकी = बटर
डबरा= खड्डा
डोस्क = डोके
इस्कुट = खेळ खंडोबा
बाउ = मटण
वज्ज = ओझे
शिप्पारस = शहाणपणा
गबस = गप्प बस
लांबड = साप
कानुला = करंजी
आदुगर = आधी
आडग = वेडा
निवद = नैवैद्य
गुलमाट = गोड
हाणबडिव = मार
धाम्पी = फांदी
शिस्तात = हळु
कड कडन सुट = परत जा
बारडी =बादली
दाम्ब = खांब
गुडघ्यात मेंदू = अर्धवट
रिक्स = रिस्क
काय टाटाय लागलैस = माज दाखवायला लागला आहेस
लज्गरि = आराम बस
ताम्यातु = टोमेटो
हरकने = आनंदी होणे
हरकुन टूम = खूप आनंदात
टक्कुर = डोके
साळूता = झाडू
वळक बगु = ओळख पाहु
डोस्क्यात यीना = आठवत नाही
घुमीव = फिरव
रगात = रक्त
गप गार = अगदी शांत
लय रागु वानी बोलू नगस = जास्त मस्का मारू नकोस
बुंडू कला = अगदी छोटा
हेंगाड = वेडपट
भसका =भगदाड
हुडक = शोध
सावधगिरीची सूचना : काही शंका असल्यास ब्याट मन साहेब परस्पर उत्तर देतील .
मी मिपा वरील सगळे धागे वाचलेले नसल्यामुळे जर पुनरावृत्ती झाली असेल तर आधीच क्षमस्व . आणि टंकायला जी मेल वापरली असल्याने काही चुका असतील तर समजून घ्या .
वाचने
31992
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही नाही
In reply to मी सांगली मध्ये जन्म झाला by सूड
यग्जाक्टली हेच.
In reply to नाही नाही by स्वधर्म
तिने अांबा खाल्ला, त्याने
In reply to नाही नाही by स्वधर्म
सूड उर्फ शामचा काका
In reply to तिने अांबा खाल्ला, त्याने by सूड
ओह आय सी!! गलतीसे मिष्टेक.
In reply to सूड उर्फ शामचा काका by स्वधर्म
ओळख
मी (मय) अमिताभ बच्चन.
In reply to ओळख by सुयशतात्या
विजय दिनानाथ चौहान … पुरा नाम
In reply to ओळख by सुयशतात्या
अनुकूल गुहा.
In reply to ओळख by सुयशतात्या
मी श्यामचा काका!!
In reply to ओळख by सुयशतात्या
ठीक आहे
In reply to मी श्यामचा काका!! by सूड
कोकणात मेस्त्री आणि इकडे
विषय हा शब्द तिकडे खूपदा ऐकू
वाटंला लागा.
In reply to विषय हा शब्द तिकडे खूपदा ऐकू by घाटावरचे भट
असेच काही ऐकलेले शब्द प्रयोग
भुरटं. भुरट्यागत.
साखर नाही साखऱ्या..
तसं न्है ते.
In reply to साखर नाही साखऱ्या.. by दिपस्तंभ
आणखी..