आज सकाळी सकाळी मराठी विकिपीडियावरील एका चर्चा पानावर एकाचर्चेस खालील प्रमाणे प्रतिसाद अंश वाचण्यात आला तो असा:
"अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुंबईतील आर.एम. भट शाळा. या शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या अनेक (बहुधा तमाम) विद्यार्थ्यांना आणि त्या शाळेच्या शिक्षकांनाही शाळेचे पूर्ण नाव सांगता आले नाही. कुणी शोधू शकत असेल, तर ते नाव या यादीत घालता येईल.
डी.वाय.पाटील नावाच्या शिक्षणसंस्थांतील बहुसंख्य (कदाचित कोणत्याही) विद्यार्थ्याला आपल्या संस्थेचे पूर्ण नाव सांगता येण्याची शक्यता कमीच आहे.
पुण्यातील एस.पी. कॉलेजला सर परशुरामभाऊ कॉलेज म्हणाणारे बावळट समजले जातात.
महाराष्ट्रात नाशिकमधील आणि दक्षिणी भारतातील अनेक शहरांमधल्या संस्थांच्या नावांचे पूर्ण रूप कागदोपत्रीही बघायला मिळत नाही.
महाराष्ट्रात जेव्हा १०वी निकाल जाहीर होतो, तेव्हा शाळांची नावे वाचावीत, ती सर्व नावे संक्षिप्त रूपातच असतात.
नाट्यस्पर्धेत भाग घेणार्या शाळा-कॉलेजांची खरी नावे अभावानेच वाचायला मिळतात. ..... "
*****************************************************************************************
मागच्या (सप्टेंबर-२०१४) मध्ये मराठी विकिपीडियाच्या साइट नोटीसवरून उल्लेखनीय (पुरस्कार प्राप्त वगैरे) शिक्षक आणि शक्यतर कोणत्याही/प्रत्येक शिक्षण संस्थेची माहिती मागवली. मिपा धाग्यावरूनही "सोबतच तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील शिक्षकांबद्दल काही प्रसंग माहिती आठवली किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले तर त्या बद्दलही वाचण्यास आवडेल." असे आवाहन केले. मनोरंजन क्षेत्रातील शिक्षक या भूमिकेबद्दल माहिती मिळाली पण खर्या खुर्या शिक्षकाबद्दलच्या आणि शिक्षण संस्थांबद्दलच्या माहितीची मोठीच वानवा आहे.
आदर्श शिक्षकांचे पुरस्कार प्राप्त होणार्या शिक्षकांची संख्या वार्षीक हजारोंच्या वर असावी महाराष्ट्राची साक्षरताही कमी नाही शिक्षण संस्थांची कमतरता नाही. मान्य आहे की शिक्षक आणि शिक्षण संस्था संस्थाचालकांमध्ये स्खलनशीलता असेल पण प्रत्येक काळ्याकुट्ट धगालाही चंदेरी कडा असते असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात दोन एक डझन शिक्षकांचा सामना तरी होतो त्यातील काही शिक्षक काही प्रसंग तरी उल्लेखनीय असू शकतात त्याची पुरेशी नोंद घेण्यात आंतरजालीय मराठी माणूस कमी पडतो आहे की शिक्षकगण आणि शिक्षणसंस्था स्वतःच्या इनीशियलचे पूर्ण नाव विद्यार्थ्यांपैकी कुणासच ठाऊक असू नयेत एवढ्या कमी महत्वाचे झाले आहेत ? माहिती देण्याचे माझे आवाहन पुरेसे रोचक पद्धतीने बनवले नाही हि माझीही त्रुटी असू शकेल. धागालेखाने शतक गाठावे अशी आशा नाही परंतु डझन नाही तर अर्धा डझन तरी प्रतिसाद मिळावेत अशी अपेक्षा धरून असतो.
एनी वे माझ काम पुन्हा एकदा आवाहन करण्याचे आहे ते करतो.
तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील (कोणत्याही) शिक्षकांबद्दल काही प्रसंग माहिती आठवली किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले तर त्या बद्दल माहिती द्यावी असे आवाहन आहे.
*ह्या धाग्यावरील आपले पुरस्कार प्राप्त शिक्षक आदर्श शिक्षक अथवा मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका या संदर्भाने येणारे प्रतिसाद विकिप्रकल्पातूनही वापरले जाऊ शकतात म्हणून नित्या प्रमाणे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
*अनुषंगिका शिवाय इतर विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2801
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप्रे.. एकही प्रतिसाद नाही?
पुण्यातील एस.पी. कॉलेजला सर
आर.एम. भट म्हणजे रामचंद्र
आदर्श शिक्षक पुरस्कार . हे हे
आता डी वाय पाटील
ज्ञानदेव यशवंतराव पाटील
In reply to आता डी वाय पाटील by आदूबाळ
२०१४-१५च्या राज्य शिक्षक पुरस्काराकरिता ९७ शिक्षकांची निवड