Skip to main content

वाडा (भाग 2)

लेखक जयंत माळी यांनी शुक्रवार, 06/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्या दिवशी सकाळी रामरावांचे लक्ष त्या खोलीकडे गेले तर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी ती खोली उघडली आहे. ते चौकशी करायला विकासकडे गेले असता त्यांना सर्व समजले. दुसरीकडे पोलिसांची चोकशी चालु होती. रामरावांनी लगेचच त्या मांत्रिकाला बोलावून ती खोली बंद केली पण त्याचा आता काहीच उपयोग झाला नाही. त्या मांत्रिकाने सांगितले की तुमच्या वाड्यात पहिली घटना घडली ती पोर्णिमेदिवशी घडली होती आणि या दुष्टचक्राचा शेवट येणार्या अमावस्येला होईल सचिनला मांत्रिकाचे बोलणे पटले त्याने मांत्रिकाला मदत मागितली पण मांत्रिकाने त्या वाड्यात क्षणभरसुद्धा थांबण्यास नकार दिला. तो गेला पण त्याच रात्री त्या मांत्रिकाचा पण त्या आत्म्याने बळी घेतला होता. त्या मुलीप्रमाणेच आता तो मांत्रिक मेला होता पण त्याचा मृत्यु त्याच्या घराला आग लागुन झाला होता पण त्या मृतदेह त्या वाड्यातील खोलीबाहेरच आढळला. आता मात्र सचिनला चिंता वाटू लागली कारण अमावस्येला फक्त दोनच दिवस शिल्लक होते. इकडे रामरावांना संशयित म्हणून अटक झाली होती. सचिनने लगेच त्या भावाला म्हणजे विनायकला फोन लावला व ताबडतोब करेवाडीला यायला सांगितले आणि येताना PARANORMAL चे संपुर्ण साहित्य घेऊन यायला सांगितले. विनायक लगेचच दुसर्या दिवशी हजर झाला. विनायक आणि सचिन यांनी ती खोली उघडली आणि ते दोघे आत जाताच एक आकृती त्या दोघांच्या दिशेने आली पण त्या दोघांनी त्या आकृतीला चकवले पण आता मात्र सर्व वाड्याच्या वातावरणात फरक पडू लागला होता रात्रीचे अकरा वाजले होते कि अचानक त्या वाड्यातील LIGHTS बंद चालु होऊ लागल्या. विकासला सुखदा जवळ बसवुन ती खोली त्यांनी पँक केली पण ती आत्मा आता संपुर्ण वाड्यावर राज्य करु पाहत होती तिला काहीही करुन वाड्याला वारस मिळू द्यायचा नव्हता ती आत्मा जोरात चित्कार करत संपुर्ण वाड्याभर फिरत होती पण सचिन आणि विनायक यांना फक्त तिचे अस्तित्व जाणवत होते. इतक्यात सचिनच्या पायावर जोरदार वार झाला सचिन जागेवर पडला. सचिन पुर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. सचिवर ताबोडतोब उपचार केले गेले. अमावस्येचा दिवस उजाडला विनायक ने एक ग्रंथात वाचून पुर्णपणे आत्माशांती पुजेचा बंदोबस्त केला. तो पर्यंत सचिन आणि विकासने संपुर्ण वाड्यात TALCUM POWDER पसरली की जेणे करुन आत्मच्या पावलांची त्यांना खुण दिसावी. नंतर त्यांनी सर्व वाड्यात EVP ( प्रेत आत्म्याच्या दिसण्यासाठी खास किरण सोडणारे मशिन ) बसवली लगेचच VIDEO CAMERA पण बसवला. आज तो आत्मा पुर्ण शक्तीने वार करणार होता पण कितीही झाले तरी त्या आत्म्याचा शाप खरा ठरल्याशिवाय अथवा त्या आत्माच्या हत्यार्याला शिक्षा झाल्या शिवाय त्या आत्म्याला मुक्ति मिळणार नव्हती. इकडे विनायकने आत्माशांती पुजेची तयारी केली होती. चारी बाजूने त्याने एक विशिष्ट आकाराचे रिंगण काढले होते व त्याच्या बाहेर एक रिंगण काढले होते. त्या बाहेरच्या रिंगणात तो आत्मा आणायचा होता. इकडे रामरावांना घेऊन पोलीस वाड्यात आले होते. वाड्यातील त्या आत्म्याच्या बाबतीतील घटनांची चौकशी करण्यासाठी. रात्रीचे आठ वाजले होते रामराव आणि पोलिस खास विकासच्या आग्रहास्तव थांबले होते. 10 वाजता पुजेला प्रारंभ झाला. पुजेला प्रारंभ होताच वाड्यातील वातावरण बदलु लागले. विनायकने सुखदा आणि विकासला पहिल्या रिंगणात बसवले व तो त्या दोघांपुढे बसुन मंत्र म्हणु लागला. 10:30 वाजता तो आत्मा बाहेर आला त्या आता आक्राळ असे रुप धारण केले होते आता मात्र ते सर्व पाहणार्या पोलिसांची खात्री पटली खरा गुन्हेगार तो आत्माच आहे. वाड्यातील सर्व LIGHTS गेल्या होत्या बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता एरवी शांत वाटणार्या वाड्याचे रुप आता मात्र भयंकर झाले. इकडे विनायकचे मंत्रोच्चार चालूच होते तर सचिन LAPTOP वर त्या आत्म्याच्या हालचाली टिपत होते. ते सर्वच RECORD होत होते. पण जे काही LAPTOP वर दिसत होते त्यावरुन तर सचिन गडबडूनच गेला कारण तो जिथे होता त्याच्यावरच तो आत्मा वार करायला येत होता त्याने लगेच त्याच्या जवळचा चाबुक काढला तो त्या आत्म्यावर उगारला तो आत्मा LAPTOP वर जाऊन आदळला. संपुर्ण LAPTOP चा चक्काचुर झाला होता. आता मात्र तो आत्मा पुर्ण पणे स्पष्ट दिसु लागला होता. आता मात्र विनायकने सर्वानांच आत येण्यास सांगितले पण आत जाता-जाता त्या स्त्रीने तिसरा बळी घेतला तो पोलिसाचा. त्या पोलिसाचे मुंडके कापले गेले होते. एखाद्याचा इतका भयानक मृत्यु पाहून सुखदा बेशुध्दच पडली. त्या आत्म्याचा प्रवेश त्या पोलिसाच्या शरीरात होण्याआधीच त्या आत्म्याला शांत करावे लागणार होते. विनायकचा विधी पुर्ण झाला आणि तो आत्मा नियोजित रिंगणाकडे खेचला जाऊ लागला . तेथे पोहचताच त्या आत्म्याने खरे रुप धारण केले. एक 28 वर्षाची रुपवान जिला पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल अशी ती स्त्री होती. आता मात्र खरी परिक्षा होती. विनायकने प्रश्न केला " का त्रास देत आहेस या सगळ्यांना ? काय पाहिजे तुला ? " ती बोलली मला या पाटलांच्या वाड्याला वारस मिळू दयायचा नाहीये. तेवढ्यात सचिन बोलला " त्यावेळी जे काही झाले त्यात विकासची किंवा सुखदाची काहीच चुक नव्हती मग तु त्यांना का त्रास देत आहेस ? " ती बोलली " एक तर रामरावाचा बळी घेईन किंवा सुखदाचा " हे ऐकताच रामराव जागेवरुन उठले व त्या स्त्रीच्या रिंगणाकडे जाऊ लागले हे सगळेजण पाहत होते पण त्यांना अडवणे आता शक्यच नव्हते कारण ते विनायकच्या रिंगणाबाहेर गेले होते. त्या सगळ्यांच्या समोर रामरावांचा अत्यंत घृणास्पद मृत्यु झाला त्यांचे संपुर्ण शरीर जळूण खाक झाले. आता मात्र वाड्याचे वातावरण बदलले संपुर्ण वाडा आता शापमुक्त झाला होता. दुसर्या दिवशी विनायक ने त्याचे एक गुढ सांगितले की रामराव जसे मरण पावले ते होणार हे त्याला माहीत होते पण त्याने आणि सचिनने फक्त रामरावांना त्यांच्या कृत्याची जाणीव आणि योग्य ति शिक्षा मिळावी यासाठी हे सर्व केले. पण त्यांनी एक नव्हे तर दोन जीव वाचवले होते. समाप्त :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2567
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

महाशय, कुठे होतात इतके दिवस... :-/

जबरदस्त भिती वाटली वाचत असताना. तळहाताला पण घाम फुटलाय. डिस्क्लेमर टाका ओ पुढच्या वेळेस. एखादा हार्ट पेशंट जायचा पाटलांच्या मागं.