यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे.
मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी.
मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला.
पार मगोगत, उपक्रम करून मी पण इथेच पडीक व्हायचे ठरवले आहे.आपली आपली पथारी पसरायची.चार टोळकी जमवून गप्पांचा फड जमवायचा.बाकी ते काऊ-चिऊचे राजकारण आणि इतर न पटणार्या गोष्टी गेल्या खड्ड्यात.
इथे परस्परांत वाद-विवाद होणारच आणि ते व्हायलाच पाहिजेत.पण ते वाद जर संवादाकडे जाणार असतील तर फारच उत्तम.इतर आंतर-जालांचे माहीत नाही पण निदान मिपावर तरी वाद-विवाद, संवादाकडे वळतील ह्याची काळजी संपादक घेत असतात. एक-दोन वेळा काही वेडे-वाकडे लिहील्यामुळे मला पण कानकोंडे झाले होते.पण संपादकांनी आणि त्याहीपेक्षा खर्या मिपाकरांनी (खरे मिपाकर हे एकच जन्म घेतात, चिकाटीवाल्या मिपाकरांची आम्ही गणना करत नाही.) वेळो-वेळी समजून घेतले.
जास्त लिहायची सवय नसल्याने, सुरुवातीला थोडा त्रास पण झाला.त्यावेळी आलेल्या प्रतिसादांनी मन पण थोडे नाराज झाले होते.अशावेळी प्रशांत आणि गणपा ह्यांनी धीर दिला.योग्य शब्दांत चुका सांगीतल्या. पण हळूहळू इथे मित्र मिळाले.किंबहूना ज्यांनी सर्वात जास्त टर उडवली ते तर अधिकच जवळ झाले.
एक उदाहरण देतो.
माझ्या ह्या लेखात (http://www.misalpav.com/node/20742)माझ्या लेखाची टर खेचणारा यकू पण होता.
पुढे तो साल्ला भिXXXट यकू, कधी जिवलग व्यनि मित्र झाला ते समजले पण नाही.पुढे ह्याच यकूने मला हवे असलेले अजुन एक पुस्तक पाठवले.(भेंडी परत एकदा त्या "यकू"च्या आठवणीने अक्षरे धुसर झाली.)
त्यानंतर तर मला मिपावर मदत मागायची सवयच लागली.
दुबईला जातोय? काढा धागा.आहेत कुंदन शेठ.पहिला कट्टा केला तो ह्या कुंदन बरोबर.कोण कुठला मी....ना ओळख ना पाळख.कुंदन स्वतः घ्यायला आला.माझ्या आग्रहाखातर मुद्दाम माझ्यासाठी मेट्रोतून फिरला.
यानबूला जातोय? काढा धागा.आहेत अजय इंगळे.इथे आल्या नंतर दुसर्या दिवशी स्वतः गाडी घेवून आले.मला आवश्यक असलेली खरेदी करायला मदत केली.कधी फोन केला तर वेळात-वेळ काढून मला भेटायला येतात.
मुलाने आकुर्डीच्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश घेतला आणि आता जागा शोधतोय? काढा धागा.मिपाकर येतातच मदतीला.बरे येतात ते फक्त सल्ले द्यायला.मी सांगतो तेच कर.हीच जागा उत्तम.असे कुणीही म्हणाले नाहीत.
मुलाला बाइक हवी आहे? काढला धागा.खुप सल्ले मिळाले.माहिती मिळाली.धर्मराज मुटके ह्यांचे म्हणणे पण पटले.(जाताजाता, बहूदा मुटके साहेबांचेच म्हणणे खरे ठरणार.)
मिपाने खरोखर मला काय दिले असेल तर ते माझी मित्र-मंडळींची हौस भागवली.आपला पण एक सुंदर ग्रूप हवा.थोडी चेष्टा-मस्करी, थोडे वाद-विवाद आणि भरपूर खाणे-पिणे करता करता आपले ज्ञान अधिक सम्रुद्ध व्हावे, अशी मनापासून इच्छा होती.पथारी घेवून फिरलो बराच पण स्थिरावलो, स्थिरावलो म्हणण्यापेक्षा पसरली ती इथेच.
आपण सगळीच माणसे, पण प्रत्येकजण देवास्वरूप काहीतरी द्यायचा विचार करत असतो.
कधी कधी उत्तम विचार मिळतात, तर कधी चविष्ट पाकक्रुती, कधी सुंदर फोटोग्राफी, तर कधी फोटोग्राफी म्हणजे नक्की काय? ते शिकवणारी स्वॅप्स ह्यांची लेखमाल देखील..(अर्थात इतकी सुंदर लेखमाला आमच्या कॅमेराला वाचता येत नसल्याने आम्ही काढलेले फोटो यथातथाच येतात, तो दोष आमचा आहे.सध्या स्वॅप्स आमच्यावर नाराज आहेत.पण भेटलो की मला नक्कीच माफ करतील.प्रायश्र्चित्त म्हणून चिंचेची चटणी आणि बटाटेवडे (चिंचबव) खायला पण तयार आहे.बायकोसाठी दाबेली खाऊ शकतो तर मित्रापुढे "चिंचबव" काय चीज़?)
फोटोग्राफी सारखीच, आम्हाला अजिबात न जमणारी, आणखी एक कला म्हणजे चित्रकला.इथे भले-भले चित्रकार (चित्रगुप्त, बबन ताम्बे, ही पटकन आठवलेली नावे)लीलया चित्र काढतात. ते बघून जळजळ न होता, उलट त्यांच्या कलेचे कौतूकच करावेसे वाटते.
कधी कंटाळा आलाच तर वाचायला पर्यटन विभाग आहे.त्यात घुसायचे आणि विना तिकीट आणि विना पासपोर्ट सगळीकडे भटकून यायचे.
अद्याप माझी नर्मदा परीक्रमा सुरुच आहे, जसे जसे उत्तम अनुभव येतील तसे नक्कीच सांगीन.आमच्या मनांत उत्तम अनुभवच राहतात.वाईट अनुभवांना आम्ही मनांत शिरूच देत नाही.
तुर्तास जय मिपा आणि जय खरे मिपाकर......
वाचने
10105
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुसते तसेच नाही...
In reply to मिपा म्हणजे वाहतं पाणी आहे... by असंका