मग पुन्हा सामसूम...!
लेखनप्रकार
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती?
एकाकीपणा.. अगदी तासंतास...!
आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं..
विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. !
नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं?
ती द्योतक आहेत.. रागाची, लोभाची, उत्साहाची, प्रेमाची, मायेची, कर्तव्याची, निराशेची, आशा-आकांक्षांची, जिद्दीची, उमेदीची...!
त्या विश्वात जराही वेळ नाही कुणाजवळ.. त्यातलं कुणीही उतरून साधी चौकशी, साधी विचारपूसही नाही करणार त्या एकाकी रेल्वेलायनींची..!
जगाचा नियम आहे हा.. धावत्या विश्वाचा नियम आहे.. तिथे कुणालाही वेळ नाही, उसंत नाही..
आहे ती फक्त गती.. आहे ती फक्त जिद्द. पुढे जाण्याची, कुरघोडी करण्याची, जग जिंकण्याची..!
हेच सगळं सांगतो आहे त्या इंजिनाचा तो कर्कश्श भोंगा आणि डब्यांची ती थडथड...!
आणि मग निघून जातं ते धावतं विश्व त्या रेल्वेलायनींना लाथाडून..!
उत्साहाचा, रगेलतेचा, रंगेलतेचा, रागालोभाचा, मस्तीचा, चैतन्याचा क्षणिक धुराळा उडतो..
आणि मग पुन्हा तीच सामसूम.. तोच निवांतपणा.. तोच एकाकीपणा..
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
9926
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
आप्पा साहेबांचे एक वाक्य ऊधार घेतो.
ईंजान लै
रुळ आपल्या जागी पक्के असले
मुक्तक आवडले
छान
झक्कास. तात्यांची गाडी भोंगा
सुंदर
In reply to सुंदर by आजानुकर्ण
मंजूर रे कर्णा. सदर मुक्तक
In reply to सुंदर by आजानुकर्ण
छान प्रतिक्रिया आहे..
In reply to छान प्रतिक्रिया आहे.. by मैत्र
धन्यवाद मैत्र साहेब..
स्मशान शांतता
In reply to स्मशान शांतता by पप्पु अंकल
ओह्ह
सर्व प्रतिसादांना 'Like' करतो
सलाम..
छान
हल्ली ललितलेखनाला वेळ मिळू लागलेला दिसतोय!
तात्यांचे लेखन पुन्हा एकदा.