Skip to main content

काळ, काम आणि पेग

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 22/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या काळ, काम आणि वेग ह्यांच्या गणितातले वाद रंगात आहेत. गणित शास्त्रींना ते सोडवू देत. कोणी "पेग" असे देखील वाचले होते. त्यावरून काही कोडी आठवली. त्यांची उत्तरे कोणाला देता आली तर पहा.... १) काम आणि पेग ह्यांची काळवेळ कोणती? २) काल, काम आणि पेगसाठी गमावला, तर आज आणि उद्याचे काय? ३) किती काळ पेग घेतले तर काम पूर्ण होते?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1887
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

काम काहीही असो किंवा नसो. पेग घ्यायच्या वेगावर सगळ अवलंबून असत !! १) काम बार मधल्या वेटर चे असेल (बर्तेन्दर) तर पेग (मोजणे) सदा सर्वकाळ चालू राहते. बाकी चालुद्या -

१) काम आणि पेग ह्यांची काळवेळ कोणती? काम दिवसा आणी पेग रात्री २) काल, काम आणि पेगसाठी गमावला, तर आज आणि उद्याचे काय? आपण फक्त पेग रीचवण्याचे काम करायचे,उद्याची चिंता कशाला ३) किती काळ पेग घेतले तर काम पूर्ण होते? परीस्थीतीचे भान हरपले की काम पुर्ण होते चला तर मग कधी घेताय दो घुंट

आम्ही थिअरीपेक्षा प्रॅक्टीकल वर भर देतो. आपण झामानुमा केल्यास प्रयोगातून वैज्ञानिक उकल अर्थात अनुभूतीचा अनुभव देता येईल.

१) काम आणि पेग ह्यांची काळवेळ कोणती? - कधिही. 'पेगातुराणां न काळं न वेळः' असं कुणितरी म्हटलच आहे. नसेल तर मी म्हणून टाक्तो. २) काल, काम आणि पेगसाठी गमावला, तर आज आणि उद्याचे काय? - हा प्रश्न परवावर ढकलून द्यावा! ३) किती काळ पेग घेतले तर काम पूर्ण होते? - कामाआधी पेग घेउ नयेत असं जाणकार सांगतात. -(चावट) दादा