मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मलाला ( परकीय प्रसारमाध्यमांचा बळी )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मला एक गोष्ट कळत नाही आपण प्रसार माध्यमांच्या एवढे अधीन का आहोत. मलाला विषयी परकीय प्रसारमाध्यमांनी वृत्त जगभर प्रसिद्ध केले. आणि अचानक भारतीयांना ती अन्यायाचे विरोध करणारे एक प्रतिक दिसली ( काही दिवसांपूर्वी त्यांना आण्णा हजारे आणि केजारीवाल सुद्धा वाटायचे ) सोशल मिडिया वर तिच्यासाठी इंग्रजी व मराठीतून प्रेम उतू जाऊ लागले. मला तिचे कौतुक वाटते , मात्र प्रसार माध्यम आपल्याला सांगतील ती पूर्व दिशा समजून त्यांच्या पाठी खुळ्यासारखे वाहत जाणे कितपत योग्य आहे. मात्र ह्या प्रसारमाध्यमांनी नाण्याची एक बाजू मांडली आहे. तिची दुसरी बाजू समोर आणण्यासाठी हा लेखप्रपंच त्या १४ वर्षाच्या पाकिस्तानी मुलीवर तालिबान ने हल्ला केला येथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे तालिबान मुल्ला ओमर चे नाही तर पाकिस्तान मधील तालिबान आहेत जे अमेरिकेलाच मदत करणाऱ्या पाकिस्तानी लष्कर व आय एस आय च्या लोकांना गेली ५ वर्ष टिपून मारत आहेत. तेहेरीके तालिबान ही पाकिस्तानच्या सीमेलगत ची संघटना आहे. ती तालिबान पासून फुटून वेगळी झाली. त्यांचे प्रमुख लक्ष्य हे पाकिस्तानी सैन्य , व आय इस आय आहे. ते अमेरिकन बाहुले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्यांना पाकिस्तानी मीडियातील अनेक जण सी आय ए व रॉ चे हस्तक म्हटले जाते. मात्र एक तालिबान मारण्यासाठी गेली काही वर्ष अमेरीका द्रोण हल्ला करतो तेव्हा त्याच्यासोबत अनेक निरपराध लहान म्हणजे काही महिन्यांची बाळ. वृद्ध , महिला पाकिस्तानी व अफगाणी लोक मारले जातात. तरीही अमेरीका द्रोण हल्ल्यांचे समर्थन करते कारण समोर समोर त्यांचे सैन्य तालिबान ला अफगाणिस्तान व पाकिस्तान मध्ये भिडले तर अमेरिकन सैनिकांचे बळी जातील व त्यामुळे व्हिएतनाम सारखे त्यांना माघारी यावे लागेल. अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्या द्रोण विमाने जगभर विकण्यासाठी आतुर झाली आहेत. ह्यासाठी वैमानिक रहित विमाने किती फायदेशीर व स्वस्त आहेत म्हणजे मानवी जीवन धोक्यात न घालता आपला कार्यभाग साधने किती उपयुक्त आहे हे दाखविण्याची नामी संधी त्यांना अफगाण युद्धात मिळाली म्हणून हे हल्ले सुरु झाले. मात्र त्यांना यश मिळाले पण त्याचबरोबर टीकेला सुध्धा सामोरे जावे लागले कारण द्रोण हल्ल्यांचे बिनचूक व अचूक नव्हते. आज अमेरिके विरुद्ध ह्या प्रदेशात प्रचंड व प्रचंड विरोध असून इम्रान खान ने ह्या भागात नुकतीच एक सभा घेऊन अमेरिकेतला लाखोल्या वाहिल्या तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याने सभेत एक १३ वर्षाचा मुलगा आणला. त्याला जनतेला दाखवून इम्रान म्हणाला " ह्या मुलांचा घरावर द्रोण हल्ला झाला. अर्थात हा हल्ला विमानाचा नेम चुकल्याने त्याच्या घरावर झाला." ह्यात ह्याचे आईवडील व लहान बहीण मारल्या गेली. थोडक्यात ह्याची भरपाई कोण देणार?, पाकिस्तानी सरकार ह्याला न्याय देत नाही, उद्या हा तालिबान मध्ये दाखल झाला तर ह्यात नवल ते काय जनतेने अमेरिकेच्या विरोध ात नारे दिले. थोडक्यात एक द्रोण हल्ला जर दोन तालिबान मारत असेल तर एक निर्माण होण्यास मदत करत आहे. म्हणूनच आज तालिबान ची तेथे ताकद वाढत आहे.व त्यांना स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळत आहे. ह्या भागातील एक १४ वर्षाची महिला जिला बी बी सी ने डायरी लिहायला सांगितली , ज्यात तिला शिकता न येण्यापासून अनेक गोष्टींना वंचित राहावे लागत असल्याचा उल्लेख आहे. अर्थात तिचा वापर करून परकीय प्रसार माध्यमांनी तालिबान वर आपला निशाणा साधला . अश्या वातावरणात अमेरीका व इंग्लंड च्या प्रसार माध्यमांनी मलाला ला एक बाहुले बनवून तालिबान विरोधी वातावरण आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करत होते, आता हे तालिबान म्हणजे मध्य युगीन काळात जगणारे ,त्यांनी मलाला ला लक्ष्य केले. पण जर तील शिक्षणाचा जसा हक्क आहे तसा तेथील पाकिस्तानी जनतेला जगण्याचा हक्क आहे हे परकीय प्रसार माध्यम समजून घेत नाहीत. आज १५००० ( नीट आकडा वाचा ) निरपराध लोक मारल्या गेली ह्या द्रोण हल्ल्यात ( कुर्बान मध्ये विवेक ओबेराय व सैफ अली खान मधील हा प्रसंग खूपच बोलका आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग झोपा काढत होता व काश्मीर मध्ये भारतीय सैन्यावर टिपणी करतांना त्यांना बरी जाग येते. मात्र बलुचिस्तान मध्ये अनेक बेपत्ता झालेले नागरिक दिसत नाहीत,व त्या मागील आय एस आय दिसत नाही. बलुची जनता व त्यांच्या नेत्यांचा आक्रोश दिसत नाही. ती मुलगी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी ठरली आहे. इतकेच मी म्हणेन. तिच्या परिसरातील अनेक नागरिक जर्मनीत निर्वासित आहेत , त्यांच्या कहाण्या ऐकल्या की मलाला प्रकरण काहीच वाटत नाही. येथे मी जेव्हा पाकिस्तानी जनता असा उल्लेख केला तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे दक्षिण व उत्तर वझिरीस्तान मधील लोक कधीही पाकिस्तानला आपले सरकार किंवा राष्ट्र मानत नाही, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याचा समूह , कबिला व ह्या काबिल्याचा सरदार न्याय व्यवस्था बनवितो. तेथे जिर्गा म्हणजे सर्व सरदार व जनतेचे संमेलन भरले जाते व एखाद्या गोष्टीवर चर्चा होऊन निर्णय होतो. ह्या लोकांचे जीवन मध्य युगीन आहे. व त्यांचे कायदे व परंपरा सुद्धा तश्याच आहे. मागे सौदी अरेबिया जेव्हा अश्याच कायद्या नुसार एका इंडोनेशियन महिलेला शिक्षा दिली तेव्हा ही कोणी बोंबा बोंब केली नाही, परकीय प्रसार मध्यम वृत्त देण्याचे काम करत नसून वृत्त बनविण्याचे काम करतात. ते आपापल्या देशाचा परराष्ट्र धोरणाचे कार्य करत असतात त्यांच्याकडून निरपेक्ष बातमी देणे कधीही होत नाही. शीत युद्धात पाकिस्तानची तळी उचलून भारताला कमी लेखणारे व आता अचानक भारत एक फार मोठ्ठी बाजार पेठ आहे हे कळल्यावर अचानक त्यांना भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही व भविष्यातील महासत्ता दिसते ह्यातही चीन च्या पुढे भारताला एक प्यादे म्हणून वापरण्याची त्याची कुल्प्ती असते. गंमत अशी आहे की मलाला प्रकरण वेस्टर्न मिडीया प्रकाश झोतात आणते मात्र स्वतःच्या देशाची झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवते. आपण उगीच ते म्हणतील ती पूर्व दिशा समजून मत बनवत आहोत. मुल्ला ओमरच्या तालिबान समवेत अमेरिका अफगाण मध्ये चर्चा करत आहे. हक्कानी नेटवर्क व तेहेरीके तालिबान मात्र आधी अमेरिकन आर्मी आमच्या भूमी वरून जाऊ द्या मग चर्चा करू असा पवित्रा घेतात. म्हणून त्याच्यावर द्रोण हल्ले होतात येथे एक भारतीय म्हणून एक लक्षात घेतले पाहिजे. आपल्या सरकारची व परराष्ट्र नीती अफगाण मध्ये विकास कामे करते पण सैनिकी कारवाई करत नाही व सगळ्यात महत्त्वाचे अमेरिकेने निर्माण केलेले तालिबान व अमेरीका ह्यांच्या संघर्षात स्वतःला गुंतवून घेत नाही. कोन कुठली मलाला अचानक भारतात तिचा सगळ्यांना पुळका येतो. मात्र बिहार मध्ये एका तरुणींचे बेपत्ता होणे व तिच्या आईवडिलांनी तिचा शोध न लागले अश्या घटना असो किंवा खुद्द मुंबईत परकीय तरुणीवर बलात्कार असो , किंवा पुण्यात , मुंबईत तरुणीची बलात्कार होऊन हत्या असो अश्या गोष्टींवर काहीही लिहले जात नाही. आज अमेरीका विरोध पाकिस्तानात कमी करून तालिबान ला पाकिस्तानी जनतेच्या मनातून उतरविण्याचे मनसुबे परकीय प्रसारमाध्यमांचे आहेत. थोडक्यात डर्टी गेम अमेरीका व तालिबान ह्यांच्यात सुरु आहे. कोणालाही मानवी जीवांची चाड नाही आहे. आज ह्या अमेरिकेने आता मोदी व गुजरातवर बहिष्कार टाकला का तर तेथे म्हणे मानवी मुल्यांची पायमल्ली झाली. त्यांचा कित्त्त्ता त्यांचे पित्ते युरोपियन देशांनी गिरवला तरीही गुजरात ने प्रगती गेली. आता आपल पूर्वीचा निर्णय बासनात बांधून निर्लज्ज पणाने ब्रिटीश गुजरात मध्ये नुकतेच जाऊन आले. आता अमेरीका सुद्धा ह्याच विचारात आहे. थोडक्यात काय ह्या परकीय प्रसारमाध्यम व त्यांची सरकार हे पलटी मारणारे मोकाफर्स्त आहेत. तेव्हा त्यांच्या ज्यादा आहारी जाऊन जाऊन उगाच मलाला ,मलाला करण्यात काहीही अर्थ नाही ( ह्याच तेहेरीके तालिबान ने पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी अगदी ब्रिगेडीयर व आय एस आय चे वरिष्ठ ह्यंना जेव्हा मारल्याच्या बातम्या येतात तेव्हा मला मनातून आसुरी आनंद होतो , कारगील चा बदला भारतीय जवानांचे रक्त न सांडता घेतला जातो कधी नव्हे ते ह्या घटनांनी पाकिस्तानी लष्कर व आय एस आय दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. एक प्रो अमेरिकन तर दुसरे प्रो तालिबान जाहिद हमीद सारखा कट्टरवादी व भारताला पाण्यात लेखणारे जेव्हा तेहेरीके तालिबान ला नावे ठेवतो. तेव्हा ह्या संघटनेने त्यांच्या लष्कराची व आय एस आय ची किती हानी केली आहे हे दिसून येते,रशिया विरुद्ध आपल्याला वापरले गेल्याची भावना तेथील जनतेत आहे. व सगळ्यात जास्त राग त्यांचा पाकिस्तानी सरकारवर व सैन्यावर आहे, त्यांना ते पेशावर कातील म्हणतात. अमेरिकन पैशांत आपल्या लोकांना मारणारे कातील. ह्यामुळे पुरेशी कारवाई करत नाही म्हणून अमेरिका पाकिस्तानी सैन्यावर दबाव आणते, व कारवाई केली तर अमेरिकन भाडोत्री म्हणून त्यांच्यावर हल्ले होतात. ह्यामुळे कधी नव्हे पाकिस्तानी सरकार व लष्कर ह्यांची बाजू पाकिस्तानी जनतेपुढे लंगडी पडली आहे. म्हणून शीत युद्धातील पाकिस्तानचे समर्थक तेहेरीके तालिबान आता त्यांचा जीव घेत आहेत. त्यांच्या नेव्ही तळावर दोनदा हल्ले करून करोडो डॉलर चे लढाऊ विमाने नष्ट करत आहे. . आज आय एस आय व पाकिस्तानी लष्करी अधिकारी हेच गाणे रडक्या आवाजात म्हणत असतील. ह्या भागातील १४ वर्षाचा मुलगा आत्मघाती हल्लेखोर बनतो त्याला फिदाइन म्हणतात. येथे अमेरिकेला पाठिंबा देणारे इस्लामचे शत्रू अशी विचार धारणा जनतेत आहे, ह्यामुळे मलाला ला तिच्या स्थानिक भागातून सहानुभूती असली तरी ह्यामुळे तेहेरीके तालिबान च्या लोकप्रियतेस अजिबात धक्का लागला नाही आहे. अगदी मनापासून सांगायचे ९० च्या दशकात तर काश्मीर की आझादी तक जंग रहेगी ,जंग रेहेगी असे नारे पाकिस्तानी लहान मुलांपासून आबाल वृद्ध देत काश्मीर च्या जिहाद साठी चंदा गोळा करत होते त्यातून जिहादी गट पोसले जात होते. हे गट मुंबईत ,दिल्लीत , काश्मिरात भारतीय जनतेवर बॉंब हल्ले करत होते. तेव्हा पाकिस्तानी जनता जिहादी उन्मादात मग्न होती.. मात्र तेहेरीके तालिबान ने लाहोर , कराची मध्ये असेच जिहादी बॉंब हल्ले करून प्रत्यक्ष जिहाद काय चीज असतो हे संदर्भासहित स्पष्ट करून दाखवले. आणि अचानक पाकिस्तानात तेथील मंत्र्यांना भारत नाही तर अंतर्गत दहशतवाद हा पाकिस्तानचा क्रमांक १ चा शत्रू असल्याचे कळले. दहशतवादाने युद्ध जिंकता येत नाही व तो सापासारखा उलटा डसतो ही जाणीव तेथील जनतेला होत आहे. म्हणूनच आता काश्मीर मध्ये जिहादसाठी चंदे गोळा करायला तेथील जनता रस्त्यावर येत नाही. भारताने स्वतःला अफगाणिस्तान मधील सैनिकी कारवायांमुळे जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. म्हणून अलका यदा किंवा तालिबान ह्यांनी भारतात कोणतेही हल्ले केले नाही. भारतातील हल्ले पाकिस्तानी काश्मीर केंद्रित संघटना लष्करे तय्यबा करते. त्याला रसद तेथील सैन्य , आय एस आय पुरवते. ह्या पैकी बलुचिस्तान मधील लिबरेशन आर्मी आणि तेहेरीके तालिबान जर पाकिस्तानी सैन्य , आय एस आय ला टार्गेट करते तेव्हा एक भारतीय म्हणून मला खूप आनंद होतो.

वाचने 15485 वाचनखूण प्रतिक्रिया 65

श्रीरंग_जोशी 21/11/2012 - 01:37
निनाद - फारच अभ्यासपूर्ण लेख. या लेखातला चाकोरीबाहेरचा दृष्टिकोन विचार करायला लावणारा आहे. नुकताच परवेझ मुशर्रफ यांची भारतीय वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत पाहिली त्यांनी म्हंटले जोवर आय एस आय भारतात व रॉ पाकिस्तानात प्रॉक्सी वॉर खेळत आहेत तोवर दोन देशांचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही. आय एस आय च्या भारतातील कारवायांबद्दल भारत वेळोवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर व पुराव्यांसकट इंटरपोलकडे पाठपुरावा करत असतो. मग मुशर्रफ सत्तेत असताना त्यांनी हेच रॉ विरुद्ध का करून दाखवले नाही? की केवळ बागुलबुवा उभा करून आपला मतलब साधायचा हि त्यांची नीती असावी... मोकाफर्स्त - या विशेषणाचा वापर आवडला.

आबा 21/11/2012 - 02:02
ड्रोन हल्ल्याचं समर्थन न करणे, ही मलालाची दुसरी बाजू कशी काय होउ शकते? अहो १४ - १५ वर्षाची लहान मुलगी ती.. साधा शिक्षणाचा हक्क द्या असं म्हणतेय, आणि कसली अमेरिकेची हस्तक अन कसली काय ! तिच्या डायरीचे अर्थ कोणी कसे का काढेनात, मला तर त्यात फक्त शिक्षणाविशयीची कळकळ दिसली

In reply to by आबा

आनन्दा 22/11/2012 - 18:13
तिच्या डायरीतील लिखाण पाहता ते १४-१५ वर्षांच्या मुलीचे वाटत नाही.. (आठवा आपण तिच्याएव्हढे असताना आपल्याला किती अक्कल होती, किंवा आपली मुले तिच्याएव्हढी असतील तर तुलना करा. its beyond extra ordinary. मला तर ही खरेच तिची डायरी आहे का याबद्दलपण शंका आहे.

In reply to by आनन्दा

आबा 22/11/2012 - 20:09
मला तर नाही वाटलं बुवा.. असो हा मतमतांतराचा मुद्दा झाला मी १४ - १५ वर्षांचा असताना मला मारून टाकायची भिती दाखवून माझी शाळा बंद केली नव्हती, हा एक फरक आहेच म्हणा !

राघवेंद्र 21/11/2012 - 02:46
खुप माहितीपुर्ण लेख. अश्या लेखामुळे मिपा मला विकीपिडीयापे़क्शा सरस वाटते.

निनाद मुक्काम … 21/11/2012 - 02:59
तिच्या शिक्षणाची कळकळ तुमच्यापर्यंत पोहोचवणारे त्या भागातील निरपराध लोकांचा जगण्याचा हक्क आणि त्यांची कळकळ एवढ्याच हिरिरीने का नाही मांडत? दुसरी बाजू ही आहे की ती लोक ज्या काळात जगतात ज्या चालीरीती व संस्कृतीचा त्यांच्यावर पगडा आहे उदा खून का बदला खून ( त्यांनी इंग्रजांची न्याय व्यवस्था कधीच स्वीकारली नाही ) हे लक्षात घ्या- दुसरे महत्त्वाचे उदाहरण तेथील जनतेत अमेरिकेविरुद्ध प्रचंड म्हणजे विचार करण्यापलीकडे असंतोष आहे. आपल्याकडे हिरव्या दहशतवादाविरुद्ध सुद्धा त्रीव भावना आहेत. एक उदाहरण देतो. लाल दहशतवादात २० बळी व हिरव्या दहशतवादात १० बळी अश्या दोन बातम्या जर भारतात प्रसारित झाल्या तर लोक त्या १० बळी असलेल्या घटनेवर जास्त राग व्यक्त करतात. कारण त्यामागे अनेक वर्षांची पार्श्वभूमी ,इतिहास , धर्म आणि इतर बरेच मुद्दे येतात. तसेच तेथे अमेरिकेला मदत करणारा म्हणून एकदा बदनाम झाला तर त्याला शिक्षा त्यांच्या कायद्यानुसार देतात. आता भारतात देखील अशी मानसिकता व असे कायदे अजूनही खेड्यांमध्ये आहे. तामिळनाडू मधील ताजे उदाहरण किंवा एखाद्या गावात एखाद्या महिलेला चेटकीण समजून दगडाने ठेसून ठार मारणे ह्या गोष्टी होतात. हे तुम्ही आणी मी सरकार थांबवू शकत नाही त्यासाठी लोक प्रबोधन आवश्यक आहे. प्रसारमाध्यम एकाला हिरो बनवितात तर एकाला झिरो त्यांनी चढवले म्हणून एका दिवस व आठवड्यासाठी गांधी टोपी घालावी ह्याला अर्थ नाही. अमेरिका सम दंड भेद वापरून हे युद्ध जिंकण्यासाठी तेथे सर्वकाही डावपेच करत आहे. मलाला प्रकरणाचे थोडक्यात सार सांगायचे तर अमेरिका पाकिस्तानला उत्तर , दक्षिण वझिरीस्तान जेथे हक्कानी नेटवर्क, तेहेरीके तालिबान चा तळ आहे व नाटो सैन्यावर जास्त हल्ले तेथून होतात तेथे सैनिकी कारवाई करायला सांगत आहे. मात्र पाकिस्तानी लष्कर व आय एस आय चे हक्कानी नेटवर्क शी हितसंबंध असल्याने ते काही केल्या कारवाई करत नाही आहे. म्हणून पाकिस्तानी शहरी भागात ह्या संघटने विरुद्ध जनमत गोळा करणे व आंतराष्ट्रीय पातळीवरून ह्या कारवाई साठी दबाव वाढवणे ह्यासाठी मलाला चा वापर केला गेला ह्यात त्यांना यश मिळाले तरीही मला नाही वाटत पाकिस्तान ही कारवाई करेल ज्या दिवशी ही सैनिकी कारवाई होईल त्या दिवशी कराची व लाहोर ह्या शहरांना बगदाद पेक्षा जास्त भयानक आत्मघाती हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल. जो पर्यंत ही सैनिकी कारवाई पाकिस्तानी लष्कर किंवा अमेरिकी सैन्य करत नाही अफगाणिस्तान मधून ओबामा आपले सर्व सैन्य परत आणू शकत नाही. तेव्हा पाकिस्तान व अमेरिका ह्यांच्या राड्यात आपण उगाच का पडायचे आपले प्रमुख लक्ष्य तेथील भारत केंद्रित दहशतवादी संघटना आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

आबा 21/11/2012 - 03:30
म्हणजे मलालाचा उपयोग करुन घेतला जातोय (शिक्षणासारखे योग्य मुद्दे मांडून) ही "मलालाची" दुसरी बाजू.. इंट्रेस्टिंग !

इष्टुर फाकडा 21/11/2012 - 03:06
ह्या पैकी बलुचिस्तान मधील लिबरेशन आर्मी आणि तेहेरीके तालिबान जर पाकिस्तानी सैन्य , आय एस आय ला टार्गेट करते तेव्हा एक भारतीय म्हणून मला खूप आनंद होतो.
:) हा आनंद क्षणिक असू शकतो निनाद राव. ज्याप्रमाणे त्यांचा जिहाद त्यांच्यावर उलटतो आहे तसंच तेहेरीके तालिबान आपल्या गळ्यातलं गाढव होवू शकतं. शिवाय मलाला तिथल्या एकूण परिस्थितीची एक प्रतिनिधी आहे. आणि माध्यमांमार्फत आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण करून मग अमेरिका पाकिस्तान, अफगाण मधील कारवाई करतेय किंवा ती करण्यासाठी त्यांना जागतिक समर्थन मिळवण्याची गरज आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे. एकमेकांना मारून हि लोकंच अमेरिकेचं काम हलकं करताहेत असंच चित्र आहे. आणि या दुर्दैवी जीवांची कहाणी जर त्या मुलीच्या माध्यमातून जगासमोर येत असेल तर यातून फायदा जर काही झालाच तर तो अमेरिकेला कसा होईल हे लक्षात पूर्णतः आले नाही. अमेरिकेचं दुट्टपी हस्तक्षेप निषेधार्ह आहेच आहे पण तो करू देणारेही तेच आहेत.

निनाद मुक्काम … 21/11/2012 - 22:18
@ हा आनंद क्षणिक असू शकतो निनाद राव. ज्याप्रमाणे त्यांचा जिहाद त्यांच्यावर उलटतो आहे तसंच तेहेरीके तालिबान आपल्या गळ्यातलं गाढव होवू शकतं. कस आहे आपल्याकडे पूर्वी देशात काही अघटीत घडले तर प्रसारमाध्यम, नेते सर्व प्रथम म्हणायचे की ह्यात परकीय शक्तींचा हात आहे. पाकिस्तान मध्ये मागच्या काही वर्षात पूर आले त्यामागे रॉ असल्याचे अजब मत मी त्यांच्या वाहिनीवर एका विचार जंता कडून ऐकले आहे. त्यामुळे तेहेरीके तालिबान ला बदनाम करण्यासाठी ते त्यांना रॉ चे हस्तक म्हणतात. पाकिस्तानात कुणालाही बदनाम कार्याचे असेल तर त्याला भारताचा हस्तक घोषित करतात. ह्याचा अर्थ ते खरे असते असे नाही. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो शीत युद्धात तालिबान विरुद्ध लढणारे अफगाणी नॉर्दन अलायन ला भारताचा पाठिंबा होता. आता तो करझाई सरकारला आहे. थोडक्यात कोणाला पाठिंबा किती आणि केव्हा आणि का द्यायचा हे आपल्या देशाच्या गुप्तचर संस्था योग्य रीतीने जाणून आहेत. @शिवाय मलाला तिथल्या एकूण परिस्थितीची एक प्रतिनिधी आहे. आणि माध्यमांमार्फत आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण करून मग अमेरिका पाकिस्तान, अफगाण मधील कारवाई करतेय किंवा ती करण्यासाठी त्यांना जागतिक समर्थन मिळवण्याची गरज आहे हे म्हणणे हास्यास्पद आहे. पाकिस्तानी सैन्य असो किंवा अमेरिकन , नाटो आजतागायत दक्षिण वझिरीस्तान मध्ये गेले नाही आहेत , कारण तेथे गेलात तर हातघाईची लढाई करण्याच्या हेतूने जावे लागेल ह्याची त्यांना कल्पना आहे. त्या भागातील १४ वर्षीय मुलांनी पाकिस्तानी सैनिकाचे डोके चाकूने का चोपर ने कापून वेगळे केले. ही बंदिवान पाकिस्तानी सैनिकांची तेथे हालत केली जाते. तो विडीयो पाहून मी गार पडलो होतो. तेथील कायदे वेगळे आणि जग वेगळे. म्हणून आपले पांढरपेशे निकष तेथील घटनेवर लाऊ नये असे वाटते. मिपाच्या सम ने परवानगी दिली तर ह्या विदियोची क्लीप मी देईन किंवा तुम्हाला व्यनी करेन हवी असेल तर मालाला चे धाडस ? तेथे धाडस ह्या शब्दाची व्याख्या जरा वेगळी असते. दुसरा विडीयो मध्ये काही नागरिकांचे मुंडके बकर्या सारखे कापून त्यांची धडावर ठेवले. १५ पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाचे जवानांची सामूहिक हत्याकांड पहा. हे तेथे गेले एक दशक चालू आहे. ( ह्या दशकात मारले गेलेले जवानांची संख्या भारताने आजपर्यंत युद्धात मारलेल्या जवानांपेक्षा जास्त आहे म्हणून त्यांना आता दुसर्या आघाडीवर म्हणजे भारताच्या शांतता हवी आहे आणि व्यापार. सध्या ही जर्मन वाहिनीने सेन्सोर केलेली विडीयो क्लिप पहा.

In reply to by निनाद मुक्काम …

इष्टुर फाकडा 22/11/2012 - 00:56
कृपया सर्व चित्रफिती व्यनी कराव्यात. तुमचा मुद्दा पूर्णतः कळला नसला तरी एकुणात भापो :)

In reply to by चिंतामणी

निनाद मुक्काम … 22/11/2012 - 00:02
@शेरखान कडून जेव्हा मी ह्या गोष्टी ऐकायचो तेव्हा मला त्या खर्या वाटायच्या नाही. तेव्हा त्याने तू नळीवर व इतर साईट वर मला क्लिप पाहायला सांगितल्या तेव्हा मी पार गार झालो. १४ ते १२ वर्षाची मुले भाज्या कापाव्या तशी सैनिकांची डोकी ,,,,,,,,, अमेरिकेला वाटतय पाकिस्तानी सैन्याला पैसे , शस्त्रे दिली की आपले काम संपले. पण अमेरिका निघून गेल्यावर पाकिस्तानी सैन्याला तेथे राहायचे आहे. १४ वर्षाचा मुलगा त्यांच्या वजनाच्या अर्धे स्फोटके अंगावर चढवून गाडीने अमेरिकन बुलेट प्रुफ गाडीला धडक देतो तेव्हा त्याला थांबविण्याचा व त्या गाडीतील सैनिकांना वाचवायची कोणतीही ठोस योजना अमेरिकेकडे नाही आहे. आणि ह्या लोकांकडे असे अनेक युवक हजारोंच्या संख्येने आहेत. म्हणून २०१४ ला अमेरिकेने सैन्य माघारी घेणे योग्य की अयोग्य ह्या वर चर्चा सुरु असते. इमरान खान ची फार जुनी मुलाखत आठवली तो म्हणाला इतिहास साक्षी आहे , इस्ट इंडिया कंपनीचे सर्वात जास्त अधिकारी ह्या भागांमध्ये मारल्या गेले. शेवटी त्यांनी वाटाघाटी करून प्रश्न सोडवला टिपू ते मराठा साम्राज्य जिंकणारे इंग्रज अफगाण जिंकू शकले नाही. त्यांच्यातील व रशियातील अफगाण जिंकण्यासाठी चाललेल्या स्पर्धेला द गेट गेम म्हणतात. व आता दुसरा ग्रेट गेम ह्या भागात सुरु आहे ,ज्यात जगातील प्रमुख देश सामील आहेत. त्यावर सविस्तर पुन्हा कधीतरी तेथे कबिल्यातील लोक आणि भारताने ह्या लोकांची उगाच एक गोष्ट अजून ह्या संघटने चा इतिहास पाहता ते जे हल्ले करतात त्याची नुसती जबाबदारी घेत नाहीत तर खरे कारण सांगतात. आज ना उद्या द्रोण हल्यात मारायचे आहे हे माहित असल्याने ते कोणाच्या तीर्थ रूपांना घाबरत नाहीत. ह्या लोकांची चर्चा करणे हा एकच मार्ग आहे. एक उदाहरण देतो कट्टर अरब राष्ट्रे जेव्हा तेलाविना दारिद्र्यात , जुन्या चालीरीती स्वीकारत जगत होती. १९६० नंतर तेल निघाले ,मग पैसा ,सुबत्ता आली व त्याच सोबत वेस्टन संस्कृती आली ,ह्यामुळे सौदी ,यु ए इ येथे अरब मुल व स्त्रिया शिकू लागले ह्यामुळे आफ्रिकेतील अरब देशात सुद्धा शिक्षण रुजले . आज जेव्हा पाकिस्तानातील ह्या भागात शांतता नांदेल तेव्हा ह्या भागात नुसते तेल , नैसर्गिक वायू नाही तर इतर खनिजे बाहेर येऊन हा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल, तेव्हा ही लोक सुधारतील काही अंशी आजही सौदी व आखातात महिलांवर बंधने आहेत. इस्लामी कायदा आहे. पण निदान ते शिकलेले तरी आहेत. पाकिस्तानात तालिबान हे परकीय लोकांना आपल्या भूमीतून बाहेर हुसकून लावण्यासाठी स्वातंत्र्य लढा देत आहेत अशी समजूत ,धारणा आहे. पूर्वी रशिया आता अमेरिका हा खनिज संपन्न प्रदेश ओरबाडण्यासाठी येथे लुडबूड करत आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

प्रदीप 22/11/2012 - 18:48
पूर्वी रशिया आता अमेरिका हा खनिज संपन्न प्रदेश ओरबाडण्यासाठी येथे लुडबूड करत आहेत.
अमेरिका अफगाणिस्तानात तेल व खनिजे ह्यांसाठी गेले आहे ही नवीच माहिती समजली. आतापर्यंतच्या त्यांच्या तेथील 'कारवायां'वरून हे कुठेच, कधीही ध्वनित झालेले नाही. आणि आता तर अमेरिका तेथून काढता पाय घेत आहेत. तेव्हा ह्या निषकर्षाबद्दल थोडा खुलासा व्हावा. अन्यथा हे नुसते वाईल्ड कंजेक्चर म्हटले पाहिजे. ह्या संबंधित थोडे अजून सांगतो: २०२० पर्यंत अमेरीकेचे स्वतःचे तेल उत्पादन सौदी अमेरिकेच्याही पुढे जाईल (सौदी अरेबिया जगातील सर्वात अधिक तेल उत्पादन गेली अनेक दशके करीत आहे. ओपेकच्या किंमती व उत्पाद्नाची क्षमता वेळोवेळी सौदीच ठरवते). आणि २०३० पर्यंत अमेरिका तेल व नैसर्गिक वायूंच्या बाबतीत १०० % स्वयंपूर्ण होईल, तेव्हापासून तो ह्या दोन्ही कमोडीटीजचा 'नेट एक्स्पोर्टर' होईल, अशी सध्याची चिन्ही आहेत. वास्तविक तेलाची वाढती गरज अमेरिकेस आहे, त्यापे़क्षा बर्‍याच पटींनी चीनला आहे. लेखात तुम्ही तालिबान्यांच्या दोन विभिन्न टोळ्यांची सविस्तर माहिती चांगली दिलेली आहेत. पण त्यातील अमेरीकेवरील आगपाखड अवाजवी आहे, असे वाटते. एकतर ड्रोन्स जगात मोठ्या संख्येने विकण्यासाठी त्यांचा जगातील एका विशीष्ट भागात वर्षाव करण्याची जरूर काय आहे? त्याचे भरपूर डेमॉन्स्ट्रेशन आतापर्यंत झालेले आहे की ! दुसरे तेथील स्थानिक लोक अमेरिकेविषयी चीड का बाळगून आहेत ह्याचे कारण तुम्ही ड्रोन्स असे देता. पण अमेरिकेने ड्रोन्सचा वापर सुरू करावयाच्या अगोदरपासूनच तेथील जनता त्यांच्या विरूद्ध होतीच ना? ड्रोन्स कितीही 'टोकदार' लक्ष्य ठेऊन मारले तरी स्थानिक जनतेतील लोकसंख्या पहाता त्यामुळे काही collateral damage होण्याचे टाळणे कठीण आहे. सर्वसाधारणपणे कोठेही बाहेरून येऊ पहाणार्‍या entities विषयी तिटकारा असणे साहजिक आहे. अमेरिका सर्वत्रच लुडबूड करते तेव्हा त्यांच्याविषयी प्रेम कुठेच नाही, तसेच ते अफगाणीस्तानात, व पाकिस्तानाच्या वायव्य प्रांतातही नाही. इम्रान खान हे खरे तर एक नवे भूत आता जगावर येऊ पहात आहे, त्याचा अ‍ॅजेंडा नक्की काय आहे, ह्याचाही विचार व्हावा.

In reply to by प्रदीप

निनाद मुक्काम … 23/11/2012 - 01:41
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उद्या सविस्तर ( नेहमी प्रमाणे प्रतिसाद मूळ लेखापेक्षा मोठा न होऊ देता ) मी प्रतिसाद देतो. मान्य आहे काही विधाने संदर्भाचं सहित स्पष्टीकरण अजून द्यायला हवे होते. पण हा विषयाला अनेक कंगोरे आहेत व अनेक शक्यता व पैलू आहेत त्यामुळे आधीच लांबलेल्या लेखात किंवा प्रतिसादात ते भर कट गेले असते म्हणून हात आवरता घेतला जसे प्रदीप ह्यांनी अमेरिका अफगाण मध्ये कशाला आहे ह्यावर एल लेख होऊ शकतो मुळात नव्याने सुरु असलेल्या ग्रेट गेम ह्या लेखात मध्ये त्याचा सविस्तर लिखाण केले असते पण उद्या ओझरते लिहितो .वास्तविक तेलाची वाढती गरज अमेरिकेस आहे, त्यापेक्षा बर्‍याच पटींनी चीनला आहे. ह्या प्रदीप ह्यांच्या वाक्यातच खरी गोम आहे. माझे मत हे अंतिम सत्य आहे हे मी कधीच मानत नाही. कारण आंतरराष्ट्रीय राजकारण हे अकल्पित आहे , ह्यात अनेकांच्या तंगड्या एकमेकात गुंतल्या आहेत. पण सत्याचा जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो.
निनाद, लेख अगदी 'दिल से' लिहिला आहेस. त्यामागची कळकळ जाणवते. कांहीं मतभेद..... माझ्या मते TTP (Tehrik-e-Taliban Pakistan) हा अद्याप मुल्ला ओमारच्या तालीबानचाच भाग आहे. फक्त आता जशी अल कायदा ही एक मध्यवर्ती गाभा उरली आहे व तिच्या शाखा आपल्याला हवे ते करायला स्वतंत्र आहेत तसेच तालीबानचे झाले आहे. (http://online2.esakal.com/esakal/20121030/5051177980960008956.htm). स्वातमध्ये शारिया लागू करायला लोकशाही सरकारने (व लष्करानेसुद्धा) २००८ मध्ये होकार दिला होता पण अमेरिकेने डोळे वटारताच आणि पैका पुरवताच पाकिस्तानी सैन्याने "घूम जाव" करून तालीबान्यांची धुलाई केली. केवळ त्यानंतरच TTP ने लष्करी केंद्रांवर आणि लष्करी शक्तीवर हल्ले सुरू केले. तोवर केले नव्हते. दहशतवाद्यांना तत्वांची बैठक असते पण ती सोयिस्कर तत्वांची असते. पण इथे जिहादी तत्व आहे ते कुणाहीविरुद्ध कुणीही वळवू शकतो. सध्या पाकिस्तानात तेच चालले आहे. http://www.thejakartapost.com/news/2009/12/12/letter-export-surplus039.html हा लेख वाचलास तर थोडा उलगडा होईल. इम्रान हा सैन्याने उभा केलेला माणूस आहे. याच सैन्याने एके काळी IJI या युतीच्या नावाने नवाज शरीफलाही उभा केला होता व त्याने स्वतःला "अमीर" घोषित करून पाकिस्तानात शारिया कायदा लावण्याचा प्रयत्नही केलेला होता! पण नवाजने हमीद गुलला जबरदस्तीने निवृत्त केले व तो मुशर्रफच्या मागे लागला होता पण PIA चा उपयोग करायची त्याची खेळी चुकली व अंगाशी आली. आता एक नवा खरंच शरीफ "नवाज" आपण पहात आहोत. इम्रानही तसाच येईल आणि जाईल. अमेरिकेबद्दलचा माझा (http://www.esakal.com/esakal/20110301/5186804575064434366.htm) हा लेखही तुला आवडेल. मूड असला तर वाच!

सुधीर काळे 22/11/2012 - 08:33
आणखी एक गोष्ट! स्त्रीशिक्षणाला खरेच खूप महत्व आहे. "जिच्या हाती पाळण्याची दोरी....." ही म्हण १०० टक्के मला पटते व पाकिस्तान तेंव्हांच सुधारेल जेंव्हां पाकिस्तानातील माता सुशिक्षित होतील. केवळ याच मुद्द्यावर मी मलालाच्या त्यागाला महत्व देतो. आपल्याकडे महर्षी अण्णा कर्वे व ज्योतीबा फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. यावरचे माझे हे पत्र वाच. हे 'जकार्ता पोस्ट' आणि 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झाले होते! http://www.thejakartapost.com/news/2012/10/23/your-letter-malala-s-courage.html http://dawn.com/2012/10/25/war-on-terror-consensus/ (दुसरे पत्र माझे आहे)

ऋषिकेश 22/11/2012 - 15:43
विषय फारच मोठा + महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम सांगतो लेख आणि विषय आवडला दुसरी बाजु चांगली मांडली आहे मात्र ती मांडायसाठी मलालाचे उदाहरण घेण्यापेक्षा इतर अनेक उदाहरणे घेता आली असती असे वाटते. दुसरे असे काही घाऊक वाक्ये / निष्कर्ष आहेत त्याला अधिक वस्तुनिष्ट करावे लागेल असो. मनातील भावनांना आधी एका रफ लेखात लिहून लेख अधिक मुद्देसुत करून योग्य त्या क्रमाने लिहिल्यास हाच लेख अधिक प्रभावी होईल असे वाटते. मला जरा वेळ मिळाला की मी काय म्हणतोय ते सोदाहरण स्पष्ट करायला व्यनी करतो.

मदनबाण 22/11/2012 - 16:36
अमेरीका द्रोण हल्ल्यांचे समर्थन करते निनादराव.... सर्वात पहिले हे जे द्रोण द्रोण सारखं लिहता, ते ड्रोन असे लिहा. फरक समजण्यासाठी खाली जालावरुन घेतलेले दोन फोटु देतो. द्रोण :--- द्रोण ड्रोन:--- ड्रोन लेखन वाचतो आहे...

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 22/11/2012 - 16:58
अहो मदनबाण साहेब, त्यांना द्रोणाचार्यांप्रमाणे हल्ला असे म्हणायचे असेल, उदा. जसे आपण भाऊगर्दी झाली असे म्हणतो तसे ;) बाकी मीदेखील तेच म्हण्णार होतो, द्रोण हल्ला केला तर तालिबान्यांची कपबशीची काळजी मिटेल.
"कुर्बान मध्ये विवेक ओबेराय व सैफ अली खान मधील हा प्रसंग खूपच बोलका आहे." शेवटचा वाक्या आइकून अंगावर काटा आला... जबरदस्त सीन आहे. चक्क "विवेक ओबेरॉई" ची संवादफेक आवडली. लेख उत्तम लिहिला आहे. multi dimentional situation ची अजुन एक बाजू समोर आणल्याबद्दल थन्क्स

दादा कोंडके 22/11/2012 - 18:47
आपली (सगळीच) प्रसारमाध्यमं लोकांना निव्वळ Xया बनवतात. परवा आमचे साहेब म्हणाले सध्या जे देशात निराशावादी चित्र निर्माण केलं जातय ते लोकशाहीला धोकादायक आहे. म्हणजे इथं काहीच चांगलं होत नाही अशी भावना लोकांमध्ये निर्माण होते आहे ते चुकीचं आहे. अपघात, गुन्हे भ्रष्टाचार थोड्याफार प्रमाणात सगळीकडेच होतो. वगैरे वगैरे... दुसर्‍या दिवशी अचानकच सकाळ मध्ये कुठेतरी अमेरिकेत 'भारतीय वंशाच्या महिलेचे अपहरण' ही बातमी उत्तरप्रदेशात, 'दरीत बस कोसळून २० ठार' च्याच रांगेत होती. आज सुद्धा असल्या एक-दोन बातम्या सापडतीलच. त्या ओबामाचं पण कोण कौतीक! ठिक आहे दुसर्यांदा अध्यक्ष झाला पण त्यामुळे आमच्या जिंदगानीत काय Xट फरक पडणार आहे?

मदनबाण 22/11/2012 - 22:39
तालिबान एक सुन्नी इस्लामिक संघटना जिचा वापर अमेरिकेने हवा तसा केला,परंतु तोच आता त्यांचावर उलटला आहे. तालिबानची खरी ताकद वेगळीच आहे ज्यामुळे अमेरिका त्यांच्या बरोबर लढत असुन सुद्धा त्यांना त्यात यश येत नाही.आजच्या घडीला अमेरिकेचे जवळपास २००० अमेरिकन सैनिक ठार झाले असुन रोज या आकड्यात सातत्याने भर पडत आहे. व्हिएतनाम युद्धानंतर अमेरिकेचे इतके नुकसान कधीच झाले नव्हते !हल्लीच १४ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यात (Camp Bastion- अफगाणिस्तान्)अमेरिकेची ३ AV-8B Harrier jets तालिबान्यांनी फुंकुन टाकली ! जवळपास $200 million चा फटका अमेरिकन मरिन्सला बसला. इतकी ताकद तालिबानकडे आली कुठुन ? त्यांच्या शक्तीचा आणि पैशाचा मुख्य स्त्रोत काय ? उत्तर :--- अफु तालिबानची खरी शक्ती ही अफुच्या शेतीत आहे,त्यांनी या वर्षी (२०१२) जवळपास $200 million पेक्षा जास्त पैसे या अफुच्या व्यापारातुन कमवले आहेत. आता तालिबान आणि पाकड्यांचे मेतकुट अख्या जगाला ठावुक आहे,अफगाणिस्तानात तयार होणारी अफु आणि त्याची इतर उत्पादने ही पाकिस्तानच्या होलसेल मार्केटमधे विकली जातात आणि त्यातुन मिळणार्‍या पैशातुन तालिबान शस्त्रसज्ज होतो. अमेरिकडुन पैसा आणि शस्त्रे मिळवण्यासाठी पाकडे तालिबान विरोधी लुटुपुटुची लढाई खेळते आणि पैसा शस्त्र आपल्या पदरी पाडुन घेते. पाकिस्तान लष्कर, आयएसआय आणि तालिबान यांना एकत्र ठेवण्याची किमया ही अफु करते असे म्हंटले तरी ते वावगे ठरणार नाही. पैसा /शस्त्र / विध्वंस या पलिकडे पाकडे आणि तालिबान विचार करत नाही. ज्याचा परिणाम आता त्यांनाच भोगाव लागतो आहे. एक रिपोर्ट :--- How Opium Profits the Taliban जाता जाता :--- हल्ली रोज संध्यांकाळी (ज्या भागात तालिबानची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता आहे.)६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत मोबाईल नेटवर्क बंद असते... अश्या पद्धतीने तालिबान अमेरिकाला सांगते की आम्ही समोर दिसत नसलो तरी सत्ता आमचीच चालते.अमेरिका असे युद्ध लढते आहे ज्यात त्यांचा आधीच पराभव झाला आहे.

पैसा 25/11/2012 - 15:53
वेगळा दृष्टीकोन मांडणारा लेख तसेच त्या अनुषंगाने झालेली चर्चा अतिशय आवडली आहे. या घटनेचे अनेक पैलू समोर येत आहेत. सर्वांना धन्यवाद!

निनाद मुक्काम … 26/11/2012 - 17:44
सुका ह्यांचा प्रतिसाद पाहून बरे वाटले. मात्र त्यांनी व्यक्त केलेले मतभेद आहेत त्यावर सर्वप्रथम लिहितो ( आज खूप दिवसांनी उसंत मिळाली आहे ) तेहेरीके तालिबान व मुल्ला ओमार ची तालिबान ह्या मधील मुलभूत फरक दाखविण्यासाठी मी ह्या लेखाचा दुवा देतो ( आता त्याचे भाषांतर करून एक संपूर्ण लेख तेहेरीके तालिबान वर लिहू शकतो ,मात्र भाषांतर आपला प्रांत नाही.) हे फक्त एक उदाहरण आहे तुलना नाही हे आधीच स्पष्ट करतो. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे शिवसेना व भाजप समान मुद्दे , विरोधक ह्यांच्या विरुद्ध युती केली आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्य पद्धती त्यांचे कार्य शेत्र जसे भाजप भारतभर तर शिवसेना प्रामुख्याने महाराष्ट्रात आहे. त्याच बरोबर ह्या दोन पक्षांचे राष्ट्रवादी व हात वाल्यांच्या पक्षाची संबंध एकसारखे नाही आहेत एवढे नाही तर ह्या दोन प्रमुख विरोधी पक्षातील प्रमुख नेत्या सोबत शिवसेना व भाजपचे संबंध वेगवेगळे आहेत. उदा राज , नारायण राणे ह्यांच्या विरोधात आक्रमक असलेली शिवसेना व भाजपा तील मोदी व राज व मुंडे व राणे ह्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. असाच प्रकार तालिबानी संघटनांच्या मध्ये आहे. मुल्ला ओमार चे मर्यादित शेत्र अफगाण तर तेहेरीके हे अफगाण व पाकिस्तान मध्ये आहेत. तेहेरीके तालिबान चे प्रमुख लक्ष्य Ideology & Goals Sunni TTP has strong Sunni and Deoband ideological leanings. According to its founding leader Baitullah Mehsud, TTP seeks to "impose Islamic Law in Pakistan and the entire world, to fight imperialist powers fighting against Muslims in Afghanistan and around the world, to fight disbelievers and to wage Jihad against the Pakistani state and Pakistan Army." Name Changes 2007: Pakistan Taliban. Tehreek-e-Taliban Pakistan has retained the same name since its formation. However, in media it has been referred to as Pakistan/Pakistani Taliban. ही बात भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. कारण पाकिस्तान कट्टरपंथी लोकांच्या हाती जाऊ नये म्हणून पाकिस्तानमधील पंजाब मधील जहागिरदार जे नवाब शरीफ च्या पक्षाखाली एकत्र आहेत तर सिंध मधील व्यापारी जे झरदारी ह्यांच्या समवेत आहेत तर कराची मधील मुजाहिदीन जे एकेकाळी भारतातून कराची मध्ये स्थायिक झाले व आता ते कराची मधील उच्च मध्यमवर्गीय आहेत व अल्ताफ हुसेन च्या एम क्यू एम ही त्यांची पार्टी आहे ही लोक विरोध करत आहे ह्यांचे कारण सौदी सारखा कडक इस्लामी कायदा त्यांना पाकिस्तानात नको आहे. आज बुरखा न घालता त्यांची परराष्ट्र मंत्री भारतात येते त्यांच्या प्रसार माध्यमातून मागे मी दाखवले होते की तेथील उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत महिला ह्यांचे विचार आणि आचार केवढे उच्च आहेत , तेव्हा पाकिस्तानी तालिबान व पाकिस्तानी आर्मी व पाकिस्तानी राजकीय पक्ष ह्याच्यात अस्तित्व व प्रभुत्व साठी लढाई चालू आहे . ह्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याने अमेरिका आजपर्यंत त्यांच्या इतिहासातील सर्वात जास्त डोळ्यात येईल इतकी पाकिस्तानात आपली उपस्थिती विविध शेत्रात दाखवत आहे म्हणूनच अमेरिका विरोध हा त्यांचे कट्टरपंथी व लष्कर , हेर संस्था करत आहेत. म्हणजे मलाला हिच्या गावात पाकिस्तानातील वरील उल्लेख केलेल्या तीन प्रमुख संघटना अमेरिका विरोध करत आहेत जरी जगाच्या दृष्टीने कट्टरपंथी व लष्कर व हेर संस्था आपापसात लढत आहेत. तेव्हा तेथील स्थानिक जनता स्वतःच्या जगण्यासाठी अविरत संघर्ष करत आहे , त्यांची अवस्था महाराष्ट्रातील बळीराजा सारखी झाली आहे. निसर्ग कोप तो. व सरकार त्यांच्या पासून लांब पळते. आज पाकिस्तानी आदिवासी भागात अमेरिका व कट्टरपंथीयांच्या युद्धात सामान्य जनता होरपळत आहे व पाकिस्तानी सरकार , लष्कर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जेव्हा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो तेव्हा इतर सर्व मुद्दे म्हणजे शिक्षणासारखाच दुय्यम ठरतात. आबा ह्यांची शाळा भीतीने कोणी बंद नाही केली तसेस त्यांच्या जगण्याच्या मुलभूत हक्कावर देखील कोणी घाला घातला नसणार. तेहेरीके तालिबान आणि मुल्ला ओमार ह्यांच्यात मुलभूत फरक विकी हे सांगतो. The Afghan Taliban and the Tehrik-i-Taliban Pakistan differ greatly in their history, leadership and goals although they share a primarily Deobandi interpretation of Islam and are both predominantly Pashtun.[5][33] The two groups are distinct, though linked, movements.[15][30] An Afghan Taliban spokesman told The New York Times: "We don’t like to be involved with them, as we have rejected all affiliation with Pakistani Taliban fighters ... We have sympathy for them as Muslims, but beside that, there is nothing else between us."[4][65] Peshawar-based security analyst Brigadier (retd) Muhamaad Saad believes the Taliban are not a monolithic entity. "They can be divided into three broad categories: [Afghan] Kandahari Taliban, led by Mullah Omar; [Afghan] Paktia Taliban, led by Jalaluddin Haqqani and his son Sirajuddin Haqqani; and [Pakistani] Salfi Taliban [TTP]," he said. "It’s the Salfi Taliban who pose a real threat to Pakistan. They may not be obeying the Taliban supreme leader Mullah Omar."[66] Some regional experts state that the common name "Taliban" may be more misleading than illuminating. Gilles Dorronsoro of the Carnegie Endowment for International Peace believes that "[t]he fact that they have the same name causes all kinds of confusion."[5] As the Pakistani Army began offensives against the Pakistani Taliban, many unfamiliar with the region mistakenly thought that the assault was against the Afghan Taliban of Mullah Omar.[5] इतर प्रतिसादींना सावकाश उत्तर देतो.

In reply to by निनाद मुक्काम …

तुझ्या लेखातले दुवे दिसत नाहीं आहेत. माझ्या मते TTP नुकतीच (म्हणजे २००९ साली) तालीबान संघटनेपासून विभक्त झाली कारण पाकिस्तानी सरकारने आधी त्यांना चढविले आणी मग एकदम आपटले. त्यानंतरच त्यांनी लष्कर आणि नौदलावर हल्ले सुरू केले. यासाठी माझा 'ई-सकाळ'ने प्रकाशित केलेला हा http://online2.esakal.com/esakal/20121030/5051177980960008956.htm लेख वाच. पण जास्त सविस्तर प्रतिसाद तू दुवे दिल्यास वाचून मग देईन.

In reply to by सुधीर काळे

निनाद मुक्काम … 26/11/2012 - 21:45
अहो काका ते २००९ पासून वेगळे झाले आहेत ह्यांची मला कल्पना आहे म्हणून मूळ लेखात मी तसा स्पष्ट उल्लेख केला . पण तुमच्या पहिल्या प्रतिसादात जेव्हा तुम्ही हे विधान केले. कांहीं मतभेद..... माझ्या मते TTP (Tehrik-e-Taliban Pakistan) हा अद्याप मुल्ला ओमारच्या तालीबानचाच भाग आहे. तेव्हा संदर्भित स्पष्टीकरण देण्यासाठी हा प्रतिसाद होता. ह्या संघटनेने संपूर्ण पाकिस्तानवर आपली मोहीम त्रीव केली आहे. ह्याचा उल्लेख जो तुम्ही आता केला तेच मी मूळ लेखात आधी म्हटले आहे. माझ्या मते TTP नुकतीच (म्हणजे २००९ साली) तालीबान संघटनेपासून विभक्त झाली कारण पाकिस्तानी सरकारने आधी त्यांना चढविले आणी मग एकदम आपटले. त्यानंतरच त्यांनी लष्कर आणि नौदलावर हल्ले सुरू केले. यासाठी माझा 'ई-सकाळ'ने प्रकाशित.. आणि तुम्ही जो तुमच्या लेखाचा जो दुआ दिला आहे त्याचे मूळ लेखकाने अलकायदा ह्या संघटनेवर लेख लिहिला आहे व त्याचे शीर्षक आजची अल कायदा संघटना! त्याचा माझ्या मूळ लेखात मलाला च्या अनुषंगाने चर्चेत असलेल्या तेहेरीके तालिबान चा अजिबात उल्लेख नाही आहे. बहुदा तुम्हाला दुसरा दुआ द्यायचा असेल. व त्यात तेहेरीके तालिबान व पाकिस्तानचा संबंध नाही आहे. कदाचित तुमचा दुआ गंडला आहे.

सुधीर काळे 26/11/2012 - 20:21
मी तर ड्रोन विमानांना 'द्रोणाचार्य'च म्हणत आलेलो आहे!

निनाद मुक्काम … 26/11/2012 - 21:47
हे मान्य करायला हवे की मी द्रोण हल्ले असे लिहिले कारण तुमचे भाषांतरित पुस्तक वाचतांना हा उल्लेख वाचून मी सुद्धा द्रोण हल्ले असेच म्हणायला लागलो होतो.

In reply to by सखारामगटणे

अप्रतिम 28/11/2012 - 12:50
मलाला धाडसी जरूर आहे पण विचारवंत वगैरे जरा अतिच होतय आता. तिला नोबेल पुरस्कार मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही.

निनाद मुक्काम … 28/11/2012 - 23:26
@विमे तू त्या क्लिप पहिल्या वाटत? अरे त्यावेळी ज्या लोकांसोबत काम करत होतो व त्यांच्या संबंधी माहिती हवी , त्यांची मानसिकता ,विचारधारा , ह्याबाबत जाणून घेणे मला गरजेचे वाटले. आणि आंतरराष्ट्रीय राज कारणाविषयी लिहिणे म्हणजे नुसते लेख भाषांत रीत करून किंवा वाचून ह्या विषयांवर लिहिणे मला पटत नाही. म्हणून अश्या क्लिप पाहतो. सुरवातीला अवघड गेले पण आता सवय झाली. एक उदाहरण देतो नुकतेच तामिळनाडू मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघाला प्रवेश दिला नाही. ह्या संबंधी आमच्याकडील तामिळ निर्वासित लोकांनी काही क्लीप तू नळीवर पाहायला सांगितल्या .पाहून खूप वाईट वाटल म्हणून त्यांच्या भावना मी समजू शकतो. . व त्यांना आता जर्मनी मध्ये नव्याने आयुष्याला सुरवात करा असा सल्ला देऊ शकतो. इतर भारतीय आपल्या हिंदू बांधवांवर झालेला अन्याय आणि त्यांचा राग समजू शकणार नाही. ह्यांचे कारण म्हणजे गुजरात दंगली बाबत भारतात व जगभर मुस्लीम j जन संहार झाला त्याला प्रसारमाध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली , मात्र श्रीलंकेत जो तामिळ हिंदूंचा नरसंहार नुकताच झाला ह्या संबंधी सामान्य भारतीय व जग अजूनही अंधारात आहे. पण आता नाही पाहत असल्या क्लिप .कारण अजून काही खतरनाक पाहण्यासाठी उरले आहे असे वाटत नाहीत. पण तालिबानी गोळ्या खाऊन विव्हाणारे पाकिस्तानी सैनिक पहिले व नंतर परत त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झालेला पहिला आणि खूप बरे वाटले. कुठेतरी सौरभ कालिया चा सूड घेतला असे वाटले . आजही आपले अनेक जवान काश्मिरात शहीद होतात. आणि आपल्याला त्याचा पत्ता नसतो . पण जेव्हा पाकडे असे मरतांना पहिले की गुरूची विद्या गुरूला ही म्हण खरी पटते. @इष्टुर फाकडा तेहेरीके तालिबान आणि कसाब ह्या संदर्भात फक्त भारतीय प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्या ,मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या बातमीला दुरोजा मिळालेला पहिला नाही. आपल्याकडे प्रसार माध्यम म्हणजे गंमत आहेत. एकाने बातमी छापली की बाकीच्यांनी त्यांची री ओढायची. एवढे जमते. पाकिस्तानात सध्या तालिबान पासून फुटून ३० तालिबानी वेगवेगळ्या संघटना झाल्या आहेत. तेहेरीके तालिबान ला सातत्याने पाकिस्तानी प्रसार माध्यमे आणि तेथील लष्कर ,राजकारणी हे रॉ आणि सी आय ए चा हस्तक म्हणून हिणवतात. तेथील विचारवंतांच्या मते ह्या संघटनेने एखाद्या जरी पाकिस्तानी बड्या शहरावर कब्जा मिळवला ( हे अजून तरी येत्या १० वर्षात खूप अवघड आहे ) म्हणजे अमेरिका आता पाकिस्तानी अण्वस्त्रे दहशत वाद्यांच्या हातात गेली अशी आवई उठवून पाकिस्तानी अण्वस्त्रे केंद्रे नष्ट करतील व हे सर्व सी आय ए , रॉ , मोसाद ह्यांचे कारस्थान आहे. आता ह्यात बातमीत किती तथ्य आहे हे देवच जाणे पण अण्वस्त्र मुक्त पाकिस्तान हे ह्या अमेरिका व भारताचे सामाईक स्वप्न आहे हे तितकेच खरे. @ सुखी सिनेमाचा शेवट बकवास होता. पण ह्यात किरण खेर जेव्हा करीना ला सांगते की सैफ च्या घरावर ड्रोन हल्ला झाला व त्यात त्याचा सगळा परिवार खलास झाला , व ह्यासाठी सैफ अमेरिकेत दाखल होतो. ह्या सारख्या अनेक घटना तेथे होतात. ह्या ह्या हल्ल्यातून वाचलेले तरुण तालिबान बनतात तर वृद्ध , महिला त्यांचे समर्थक माझ्या मते ड्रोन हल्ले म्हणजे तालिबानी समूहात भरती होण्यासाठी जाहिरात आहे. कारण अन्याय सहन करणे हे पठाणांना जमत नाही , सूड ह्या शब्दाला तेथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिचारे अमेरिकन सैनिक , त्यांना ह्या प्रदेशात स्वतःच्या सावली वर सुद्धा विसंबून चालत नाही. अमेरिका आणि नाटो आपल्या जनतेचा पैसा नाहक फुकट घालत आहे , त्यांना येथे विजयी होणे निव्वळ अशक्य आहे. त्यांनी इस्ट इंडिया कंपनी प्रमाणे समझोता करून येथून निघून जाणे सोयीस्कर आहे. एका अमेरिकन द्रष्ट्या चे विधान आठवले. अफगाणिस्तान मध्ये शांतता निर्माण झाली की सार्‍या आशियात शांतता निर्माण होईल. @ प्रदीप इम्रान खान विषयी तुमच्या मताशी सहमत मी त्याचे उदाहरण माझ्या लेखात व प्रतिसादात दिले कारण सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तो ह्या प्रश्नाकडे गंभीर पणे बोलत आहे. मात्र तो लष्कराचा एक हस्तक आहे हे मान्य आणि अत्यंत धूर्त ,लबाड महत्त्वाकांक्षी तो राजकारणात आल्यापासून मी त्याच्या संबंधी बातम्या , घटना फोलो करत आहे. ह्या विषयी एक वेगळा लेख परत कधी तरी . मी मिपावर पहिला ह्या विषयावर लेख लिहिला तेव्हा सध्याचे झरदारी भारताच्या दृष्टीने सर्वोत्तम असल्या संबंधी लेख लिहिला होता. ते ह्या कारणासाठी त्यावेळी मी स्वतःला पाहिलेल्या बिलावल च्या काही रास लीलांचा उल्लेख केला होता. व नुकतेच आपण त्यांच्याविषयी वृत्त ऐकले रशिया , अमेरिका अफगाण मध्ये का आले ह्या संबंधी नवीन ग्रेट गेम ह्या विषयावर लिहीन, थोडक्यात अनेक कारणांपैकी हे एक आहे बुश प्रशासनाने अमेरिकेवर हल्ला झाल्यावर गल्फ तेलावर आपले अवलंबून राहणे कमी करण्यासाठी योजना आखली व ती लवकर पूर्ण होईल . पण जगातील तेल साठे आणि नैसर्गिक साधन सामग्री कोठे सापडली की अमेरिका पहिले तेथे तडमडते. आज इराण व इराक ने जर अमेरिकन तेल कंपन्यांना आपल्या देशात गालीचा पसरला असता तर ते सौदी पेक्षा कस्त श्रींमत व प्रगत झाले असते ,कारण महिला असो किंवा इतर विषय दगडापेक्षा वीट मऊ ह्या नात्याने ते सौदी पेक्षा कमी कट्टर आहेत. मदनबाण आपण एका चांगल्या विषयाला तोंड फोडले. मला लंडन मध्ये आमच्या पंचतारांकित हॉटेलात काम करतांना आलेला एक अनुभव सांगतो . एक अमेरिकन जो नेहमी आमच्याकडे यायच्या त्यांने एकदा मला विचारले . मला कोक आणून दे ? मी त्याला नम्रपणे मी ह्याबाबतीत काहीही करू शकत नाही असे सांगितले. तो मला पाकिस्तानी समजून म्हणाला अरे तुम्ही लोकांनी तर पूर्ण युरोपात कोलंबियन लोकांचा धंदा बसवला .,कोणी तरी असेल तुझ्या संपर्कात आता अगदी खरे सांगायचे तर लंडन मध्ये मला भेटलेल्या १० अनिवासी भारतीय किंवा पाकिस्तानी किंवा गोरा त्यांच्यापैकी किमान ३ जण हे अमली पदार्थांचे सेवन करतात. एखाद्याच्या खरी पार्टी असेल तर एका फोनवर ह्या गोष्टी मध्यरात्री घरपोच होतात. अफगाणी अमली पदार्थ दर्जा उत्तम व कोलंबियन च्या तुलनेत स्वस्त ( कारण युरोपात आणण्यासाठी त्यांची दळणवळण, संपर्क व्यवस्था चोख दाउद चा इक्बाल मिरची लंडन मधून सारे अमली पदार्थांचे व्यवहार चोख पाहतो. ह्यात आय एस आय चे नेटवर्क दिमतीला ह्या व्यवहारात जिहाद च्या निमित्ताने मिळणारे कुशल , अकुशल मनुष्यबळ ह्यामुळे आपल्याकडे पान पट्टीवर जसे गुटखा मिळतो तेवढ्या सहजतेने येथे अमली पदार्थ मिळतात. जगात सगळ्यात फायदे मंद व्यापार असलेला ह्या जर गोल्डन त्रेंगल वर अमेरिकेने आपले नियंत्रण मिळवले तर अमेरिकन अमली पदार्थांचे मार्केट सांभाळणारे येथे कच्च्या मालासाठी येतील अशी एक थिअरी ह्या निमित्ताने ऐकायला मिळाली.होती. आंतर्राष्ट्रीय राजकारणाची ही तर गंमत आहे. येथे अंतिम म्हणून असे काही सत्य नसते. असतात त्या फक्त अनेक शक्यता ह्यात आपल्याला पचते झेपते ते आपण स्वीकारायचे. @ गटणे , अप्रतिम धन्यवाद ही माहिती शेअर केल्याबद्दल अजून पुढे ह्या प्रसारमाध्यमांची गंमत पाहत रहा म्हणजे माझा मुद्दा पटेल . आपण ह्यांची मानसिक गुलामी का म्हणून स्वीकारायची हे म्हणतील ती पूर्व दिशा का आजही माझ्या कामानिमित्त अनेक अमेरिकन , युरोपियन मला भेटतात , त्यांच्याशी संवाद साधला तर भारता विषयही अनेक गैरसमज असलेले दिसतात ,पूर्वी डोके फिरायचे ,पण आता कळते ह्या मागे त्यांची प्रसारमाध्यमे ह्याच परकीय प्रसारमाध्यमांचा एक गोड गैर प्रचार भारत भविष्यातील महासत्ता

निनाद मुक्काम … 28/11/2012 - 23:38
श्रीरंग जोशी , आबा ,आनंदा राध्व ८२ , पिशी आबोली चिंतामणी , ५० फक्त , स्पा ,बॅटमॅन ,दादा कोंडके, पैसा ताई ह्यांचे मनापासून आभार ह्या विषयावर जमेल तसे लिहित राहीन पण पुढचा लेख ह्या विषयावर लिहित नाही ,नाहीतर अजीर्ण व्हायचे , मी आपला पुन्हा माझ्या आख्यानाकडे वळतो आणि अधुरी दास्तान सुद्धा पूर्ण करायची आहे. @ऋषिकेश - Thu, 22/11/2012 - 11:13 विषय फारच मोठा + महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम सांगतो लेख आणि विषय आवडला दुसरी बाजु चांगली मांडली आहे मात्र ती मांडायसाठी मलालाचे उदाहरण घेण्यापेक्षा इतर अनेक उदाहरणे घेता आली असती असे वाटते. दुसरे असे काही घाऊक वाक्ये / निष्कर्ष आहेत त्याला अधिक वस्तुनिष्ट करावे लागेल सहमत , पुढच्या वेळेला काळजी घेईन , पण मला वाटते मलाला हे योग्य उदाहरण आहे , आज गटणे ने बातमी दिली तश्या प्रकारच्या बातम्या नजीकच्या काळात अजून येतील मलाला महिमा अजून काही काळ रवंथ केला जाईन तेव्हा हे उदहरण मी का निवडले ते कळेल . एखाद्या साध्या शेअर ला मार्केट मधील सट्टेबाज अमाप खरेदी करून अगदी उंचावर नेतात , व मग एकेदिवशी आपला फायदा निघाल्यावर विक्री करून पाडतात तसे ह्या प्रसार माध्यमांचे आहे.

पुण्याचे वटवाघूळ 09/12/2012 - 21:04
एकदा वाजपेयी आणि बुशची चर्चा चालू असते.तिथे कॉलीन पॉवेलही असतात.बोलता बोलता वाजपेयी म्हणतात की दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानातील १७ कोटी लोक आणि एका सायकल रिपेअरमनला कायमचे चंद्रावर पाठवायला हवे.कॉलीन पॉवेल आश्चर्याने म्हणतात-"काय एका सायकल रिपेअरमनला?".त्यावर वाजपेयी बुशना म्हणतात--"बघा मी सांगत होतो १७ कोटी पाकिस्तान्यांविषयी कोणीच काही बोलणार नाही"!! हा जुना विनोद ऐकला होता.ते काहीपण असले तरी निनादराव, इतर कोणीही काहीही म्हणून दे, माझ्यासाठी पाकिस्तान हा एक शत्रूच आहे.फालतूच्या मानवतावादाला माझ्या लेखी महत्व शून्य.जोपर्यंत पाकिस्तान भारतीयांना मारत आहे तोपर्यंत काही पाकिस्तानी परस्पर अमेरिकेने मारले तर मला स्वतःला आनंदच होतो.नाहीतर त्यांच्यातलेच काही उठून भारतीयांना मारायला आले असते तेव्हा मरा लेकांनो. जे काही खड्डे तुम्ही आमच्यासाठी खणले होते त्यात तुम्ही स्वतःच पडा आणि कायमचा कपाळमोक्ष होऊ दे तुमचा.अशांविषयी गळे काढणारा मी नक्कीच नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

निनाद मुक्काम … 10/12/2012 - 18:49
पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार ,हमीद मीर ह्यांच्या गाडीखाली बॉंब सापडल्याची बातमी आपण सर्व मुख्य वृत्तपत्रात वाचली असेल. हा पाकिस्तानातील फार थोड्या विभूतीच्या मध्ये गणला जातो. कारण ह्याने ओसामा बिन लादेन ची अफगाण मध्ये जाऊन मुलाखत घेतली होती. मुल्ला ओमरच्या तालिबान चा कट्टर पाठीराखा म्हणून ओळखला जातो. हिलेरी क्लिंटन ला तिच्यातोंडावर तुम्ही पाकिस्तानच्या सासू आहात,असे एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने सांगितले. होते. म्हणजे अशी सासू जी पाकिस्तानी सुनेकडून कधीही ,कितीही काम केले तरी खुश नसते. म्हणजे अशी सासू जी पाकिस्तानी सुनेकडून कधीही ,कितीही काम केले तरी खुश हिलरी ह्यावर मनमुराद हसली होती. तिचा उल्लेख सर्व पाकिस्तानी सासू म्हणूनच करतात. ती राष्ट्रपती झाली असती तर आज ह्या भागातील चित्र सध्या आहे त्यापेक्षा नक्कीच चांगले दिसले असते. व भारताच्या दृष्टीने अजून फायद्याचे ठरले असते. पुढच्या भेटीत हमीद मीर ने ह्यावर हिलरी ला टोमणा मारला होता. अश्या ह्या जमेल तेव्हा भारताविरुद्ध अमेरिकेविरुद्ध गरळ ओकणारा पत्रकार आज तेहेरीके च्या रडारवर आहे. तेही मलाला च्या कृपेमुळे ह्याबद्दल मला आनंद झाला आहे.

बाबा पाटील 10/12/2012 - 20:55
मलाला हे दहशतवादाला विरोध करणारे प्रतिक आहे,लोकांना वाटते की ही १४ वर्षाचे पिल्लु कस काय दहशत्वाद्यांच्या अन्यायाविरोधात लिहु शकते,पन ते हे का विसरत आहेत्,ब्रिटीशांच्या विरोधातला स्वातंत्र लढा हा अश्याच कोवळ्या पोरांनी लढला होता,शिवरायांनी स्वराज्याची शपथ अश्या कोवळ्या वयातच घेतली होती.त्यामुळे एकदा एखाद्या गोष्टी विरोधात चिड तयार झाली की वय किती आहे त्याचा फार फरक पडत नाही . बाकी आंतरराष्ट्रीय राजकारण हे नेहमीच कुरघोडीच असत्,प्रत्येक राष्ट्र स्वताच्या फायद्याकरिता दुसर्या राष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतो,आपण काय किंवा पाकिस्तान काय जो पर्यंत शेजारी आहोत तर एकमेकांची वाट लावण क्रमप्राप्त आहे.

निनाद मुक्काम … 11/12/2012 - 01:51
पाटील साहेब माझ्या एका प्रश्नांचे उत्तर द्या. जालियानवाला बाग प्रकरणी निर्दोष सुटलेला जनरल डायर तुमच्या लेखी कोण त्याला कोवळ्या वयात पाहणाऱ्या उधम सिंहाने पुढे त्यांचा लंडन मध्ये खून करणे व ब्रिटीश सरकारने त्याला गुन्हेगार समजून फाशी देणे ह्यात उधम सिंह तुमच्या लेखी कोण एका देशाचा दहशतवादी हा दुसर्‍या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. हे मुशरफ ह्यांचे गाजलेले विधान येते पुन्हा एकदा मांडतो. दहशतवाद व त्यांची व्याख्या ही तुम्ही कोणत्या चष्म्यातून पहात आहात किंवा प्रसार माध्यम तुम्हाला कोणत्या चष्म्यातून दाखवत आहेत ह्यावर ते अवलंबून असते. आपली मराठी ह्या संकेत स्थळावर घाशीराम कोतवाल हे नाटक आहे. त्यांच्या मध्यंतरात घाशीराम ही एक प्रवृत्ती असून सद्दाम नावाचा घाशीराम वेस्टन वर्ल्ड ने असाच निर्माण केला होता, अश्या बर्याच उदाहरणाने स्पष्ट म्हटले आहे. आता सद्दाम ची जाग तालिबान ने घेतली इतकेच. त्या भागात तालिबान ला स्वकीय भूमीतून परकीय नाटो व अमेरिकन सैनिकांना बाहेर घालवणारे स्वातंत्र्य सैनिक समजले जाते. जसे एकेकाळी भारतात लोक समजत होते. मग भले जग काहीही समजो. तेथे संयुक्त राष्ट्र संघाने व पर्यायाने जगाने लक्ष घालून शांती निर्माण करणे व तेथील सर्व गटाशी संवाद साधणे गरजेचे आहे. तुम्हाला महाभारतातील युद्धाचा एक प्रसंग सांगतो. पांडवांवर नारायण अस्त्र सोडल्यावर त्यांच्या पुढे भीम उभा ठाकला. तेव्हा ते अस्त्र त्याला माराव्याय निघाले. तेव्हा कृष्णाने त्याला ह्या अस्त्रापुढे नतमस्तक व्हायला सांगितले तेव्हा कुठे ते अस्त्र शांत झाले व पुढे युद्धात पांडव विजयी झाले. असा कृष्णासारखा मार्गदर्शक अमेरिकेकडे नाही त्यांच्याकडे आहे बुश व त्यांच्या प्रशासनातल्या अजूनही आपल्या महासत्तेचा अहं बाळगणारे अनेक उच्च पदस्थ अधिकारी , सनदी अधिकारी व शस्त्रास्त्र कंपन्यांचे दलाल. बिचारा ओबामा २०१४ पर्यंत सैन्य माघारी आणत आहे पण ही लोक त्याला तसे करू देणार नाही हे मी आता येथे सांगतो. युद्ध थांबले व ओबामा ह्याने आधी गेली तशी अमेरिकन लष्करी बजेट मध्ये कपात केली तर ह्यांची शस्त्रे विकत कोण घेणार

निनाद मुक्काम … 12/12/2012 - 02:08
परकीय प्रसारमाध्यम हे त्यांच्या सरकारची धोरण पुढे राबवत असतात. तेव्हा त्यांच्या पत्रकारितेत त्यांच्या सोयीचे तेच सत्य जगावर ते लादत असतात. ह्यासाठी जगभरातील संघटना त्यांच्याशी बाडीस असतात. संयुक्त राष्ट्र संघात ह्या आधी फाशी नसावी ह्या प्रगत राष्ट्रांचे धोरण त्यांनी सर्व जगावर लागण्यासाठी ठराव मांडला. प्रत्येक राष्ट्राला आपले धोरण व मत बनविण्याचा अधिकार आहे असे म्हणत भारताने त्याचा कडाडून विरोध केला पण हा ठराव आमसभेत बहुमताने संमत झाला. आता तो भारतावर जरी लागू पडत नसला ,तरी माननीय शिंदे साहेबांनी फाशीच्या शिक्षेचा भारताला भविष्यात पुनर्विचार करावा लागेल. असे म्हटले ह्यामागे प्रगत राष्ट्रांचे दबाव तंत्र आहे. मी ह्या लेखातून जे मत मांडले होते त्यावर शिक्कामोर्तब करणारी ही बातमी आता फक्त नोबेल ची वाट पाहणे उरले आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीरंग_जोशी 12/12/2012 - 02:11
निनाद - मानले तुंम्हाला याबाबतीत. अजून तरी भारतीय प्रसारमाध्यमे जरा लांबच आहे मलाला व तिच्या कुटूंबियांपासून.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद मुक्काम … 11/01/2013 - 04:33
मी आधीच लिहिल्या प्रमाणे ही उणीव सुद्धा आता पूर्ण झाली. भारतीय जवानांचे शीर कलम केल्याची बातमी वाचली. ह्यामागे पाकिस्तानी सरकारची हतबलता आहे. पाकिस्तानी सैन्याला अफगाण सीमेवरून काहीही करून परत यायचे आहे ,कारण अमेरिका त्यांना डू मोर असा घोषा लावते तर अमेरिकेला मदत करतात म्हणून तेहेरीके तालिबान त्यांच्यावर हल्ले करतात. त्यांचे नुकतेच २१ सैनिक नेउन ठार मारले , तेव्हा ह्यातून सुटका एकाच भारत पाक सीमेवर अस्वस्थता निर्माण करायची त्यामुळे पाकिस्तानी आर्मी आपल्या काही बटालियन युद्धावरून परत काश्मिरात आणू शकतील म्हणून भारतीय सैन्याने त्यांच्या अश्या वागण्याला संयमाने तोंड दिले आहे , हे सरकार शूर नाही मान्य , मात्र हिंदुत्व वादी सरकार होते तेव्हा कारगील प्रसंगी सीमा रेषा का बरे नाही ओलांडली किंवा विमान अपहरण होत असतांना दहशतवादी सोडून देणे त्यातील एक आफिज सईद ने मुंबई हल्ला घडवून आणला , जसवंत सिंग त्या अतिरेक्यांना घेऊन चक्क गेले , तेव्हा काय वाटले असेल , पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकवायचा तर तेहेरीके तालिबान ला कुट नीतीच्या सहाय्याने मदत करावी , असे मला वाटते , शत्रूचा शत्रू आपला मित्र अशी म्हण आहेच., म्हणूनच आभासी जगतात जेव्हा मलाला मलाला हा घोष चालला होता तेव्हा मी हा लेख लिहून तेहेरीके तालिबान ची माहिती देऊन ह्या प्रकरणातील एक बाजू प्रकाशात आणली. ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर द्यावे . आज पाकिस्तान काश्मीर मध्ये फुटीर वादी गटाला अर्थ सहाय्य व इतर मदत करत असतील तर त्यांना कळले पाहिजे तुमच्या अर्थ व्यवस्थेच्या किमान पाचपट मोठी आमची अर्थव्यवस्था आहे , आम्ही पण तुमच्या देशातील अश्याच फुटीर वादी गटांना मदत केली , आधीच अशक्त असेल्या पाकिस्तानी चलन बनावट तुमच्या देशात आणले . तर तुमचे विघटन होण्यास जराही वेळ लागणार नाहि, चाणक्य नीती जाणणारा भारत देश आहे , हे त्यांनी लक्षात घ्यावे. ह्या लेखात माझ्या एका प्रतिसादात मी काही लिंक जाहीररीत्या देता येत नाही असा उल्लेख केला होता , मात्र काही मिपाकरांच्या आग्रहा खातर त्यांना मी त्या व्यनि केल्या होत्या , त्यात तेहेरीके तालिबान पाकिस्तानी सैनिक व आय एस आय च्या हस्तकांची शीर सुरीने बोकड कापावा तशी खुलेआम कापत होते . शिरांचे ढीग च्या ढीग जमा झाले होते , आणि हे शीर कापणारे १४ ते १६ वयाची मुले होती , हि लिंक दीड एक वर्षाच्या आधी पहिली होती , पण ,पाकिस्तानी सैनिकांची मला अजिबात दया आली नाही , माझ्या डोळ्यासमोर समोर आपले शहीद कालिया उभे ठाकले. आमचे २ मारले तर तुमचे आम्ही २०० मारू मात्र ते मारण्यासाठी आपले हात रक्ताने माखण्याची काहीही गरज नाही , त्यांनी धर्मांच्या नावावर देश उभारला मग त्याच मुद्द्यावर सैन्य भारताच्या विरुद्ध कार्यरत ठेवले , धर्माच्या मुद्यावर दहशतवादी संघटना निर्माण केल्या , आता ह्याच धर्माचा आधार घेऊन तेहेरीके तालिबान जर पाकिस्तान मध्ये धुमाकूळ घालत असेल तर हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल.

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दिता 14/01/2013 - 02:11
निनादसाहेब तुम्ही लिहिलेला प्रतिसाद १०००% पट्ला... परराष्ट्र धोरणे व कुट्नीती चा आवाका आपल्याला दाखवला जातो त्यापेक्षा शेकडो पट मोठा असतो.. इतक्या अभ्यास पुर्ण लिखाणाबद्दल तुमचं खरच खुप कौतुक..

निनाद मुक्काम … 11/10/2013 - 05:44
मलाला ला नोबेल सुद्धा देतील असा प्रतिसाद ह्या धाग्यावर वाचला होता परकीय प्रसार माध्यमे आता खरेच तिला नोबेल मिळवून देण्यासाठी व्यवस्थित लॉबिंग करत आहे. हे सध्या तिच्या विषयी बातम्या वाचून कळत असेल. ह्यांच्या दुर्दैवाने ह्यांना सिरियात घुसणे जमले नाही व अफगाण मधून बाहेर पडण्यासाठी तळमळत आहेत. अश्यावेळी तेहेरीके तालिबान विषयी पाकिस्तानी सरकारवर दबाव आणून कारवाई करायला लावणे निव्वळ अशक्य सध्या तेथील पंजाबी बहुल अतिरेकी संघटना काश्मीर मध्ये घुसखोरी करत आहे व सातत्याने करत आहे, अश्यावेळी तेहेरीके तालिबान ला हाताशी धरून ह्यांना धडा शिकवणे काळाची गरज आहे तुने मेरी मारी तो मैने भी तेरी मारी , मग भोकात गेली दुनियादारी म्हणजे मुल्ये , आदर्शवाद इति

In reply to by निनाद मुक्काम …

मदनबाण 15/10/2013 - 15:17
तुने मेरी मारी तो मैने भी तेरी मारी , मग भोकात गेली दुनियादारी ऐसी मारनी होगी की, अगले बारे कुछ सोचने की भी कोशीष की तो दर्द होना चाहिए |

आतिवास 14/10/2013 - 09:07
मलालास तालिबानचे पत्र (अधिकृत धोरण नाही असा पत्रात उल्लेख आहे) - वाचण्याजोगे आहे. http://topinfopost.com/2013/07/22/the-talibans-letter-to-malala-yousafzai यात तथ्य आणि प्रचार यांचे बेमालूम मिश्रण आहे हे सांगणे नलगे.

निनाद मुक्काम … 11/10/2014 - 01:59
अप्रतिम - Wed, 28/11/2012 - 08:20 मलाला धाडसी जरूर आहे पण विचारवंत वगैरे जरा अतिच होतय आता. तिला नोबेल पुरस्कार मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही. परकीय प्रसार माध्यमांची किमया २०१२ ला अप्रतिम ह्यांनी उपहासात्मक प्रतिसाद मालाला उद्देशून दिला होता तो आता खरा ठरला. काही महिन्यापूर्वी उत्तर वझीरीस्थान मध्ये पाक सैन्य घुसले. त्याच्या माध्यमांचा विजय

In reply to by निनाद मुक्काम …

हाडक्या 13/10/2014 - 19:36
फक्त दोन वर्षातच हा उपहासात्मक प्रतिसाद खरा ठरला.. पुरस्कार जाहीर झालेला कळाला तेव्हा आम्हाला पण याच धाग्याची आठवण झाली होती. :)

In reply to by निनाद मुक्काम …

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:42
अश्या अनेक धाडसी मुली भारतात सापडतील. प्रचंड विरोधात शिक्षणासाठी/हक्कासाठी लढणार्‍या. कदाचित आफ्रिके मधे तर अजुन जास्त. पण ह्या लांगुनलांचनाच्या मागे नोबेल समिती सुद्धा लागली आहे. नोबेल पारितोषिक हे मोठ्या प्रमाणावरच्या आणि वैचारीक आधिष्ठान असलेल्या चळवळीला दिले जावे असे मला वाटते. तसेच त्या व्यक्तीने एक संघटना निर्माण करुन ती त्याच्यासारखी दुसरी लोक तयार केली असतील तर.

निनाद मुक्काम … 13/10/2014 - 20:09
ह्या आधी हा पुरस्कार जेव्हा ओबामा व त्या नंतर युरोपियन युनियन ला देण्यात आला होता तेव्हाच ह्या पुरस्काराचे राजकीय हेतूसाठी दुरुपयोग झाल्याची टीका करण्यात आली होती , सध्या संयुक्त राष्ट्र संघाला फाट्यावर मारून ही लोक जगभरात युद्ध खोरीत गुंतली आहेत , शांततेच्या नावाने बोंब आहेत जेथे जेथे युद्धजन्य परिस्थिती तेथे ह्या लोकांचा सक्रिय सहभाग त्याने युद्धजन्य परिस्थिती निवळण्यापेक्ष्या चिघळत चालली आहे

निनाद मुक्काम … 15/10/2014 - 01:50
मलाला केंपेन यशस्वी ठरली , पाकिस्तान ने काही महिन्यापूर्वी उत्तर वझिरीस्तान मध्ये कारवाई सुरु केली. बीबीसी ने तिला हेरले व तिला अनुदिनी लिहिण्यास प्रवृत्त केले त्यास प्रसिद्धी दिली , व ह्यात शिक्षणाच्या आडून तालिबान दुष्ट व त्यांच्या विरुद्ध पाकिस्तानी आर्मी जनतेचे रक्षण करते असा एक आभास निर्माण केला. निदान त्या भागातील नागरिकांशी माझे पूर्वी बोलणे झाले त्यावरून मी हे अनुमान काढले. तिच्यावर हल्ला झाला हे दुर्दैवी होते, पण निदान जर्मनी मध्ये त्यांच्या प्रसार माध्यमांनी तिचा उदो उदो केला तरी सर्व सामान्य लोकांना मलाला प्रसाराचा संसर्ग झाला नव्हता , भारतात मात्र अनेक लोकांनी तिच्या नावाने गळे काढणे चालू केले होते, ह्यामुळे उद्या प्रसार माध्यमे सांगतील तेच देशभक्त किंवा देशद्रोही किंवा त्यागी मानण्याचा पायंडा पडणे घातक आहे त्यातूनच पेड न्यूज ला खतपाणी मिळते , परकीय गुंतवणूक अश्या मिडिया हॉउस मध्ये होतात, तेव्हा अनेक देशांचे परराष्ट्रीय धोरण विविध देशात त्या त्या देशातील प्रसार माध्यमांच्या द्वारे राबविले जाते. आता हि बया भारत व पाकिस्तान मध्ये शांतता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे , त्यात गैर काय आहे असे विचारण्याच्या आधी सांगतो , भारताच्या नवीन सरकारच्या धोरणामुळे पाकिस्तानची बोलणी थांबली आहेत. आपल्याला शांतिवार्ता करण्यास प्रवृत्त करण्यासाठी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा मनसुबा आपल्या सैन्याने सडेतोड उत्तर देऊन उध्वस्त केला. आता हिच्या खांद्यावरून शांतीची कबुतरे उडवायचा प्रयत्न होणार आहे. माझ्या मते नमो ह्यांनी तिथे जाऊ नये, अमेरिकेत शरीफ ची बोलणे, भेटणे कटाक्षाने टाळणारे नमो ह्या वेस्टन भोंदूगिरीला बळी पडणार नाहीत. नोबेल च्या समितीने शांतता पुरस्काराचे राजकीयकरण चालवले आहे. पुढील ५ वर्षात पप्पू , केजू किंवा खुद नमो ह्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. जेव्हा वेस्टन मिडिया मलाला मलाला करत पाकिस्तानी तालिबान ला टार्गेट करते तेव्हा अमेरिकन द्रोण ने बचावली एक मुलगी आपल्या वडील व भावासह तिच्या घरावर का हल्ला करण्यात आला व तिच्या आजीच्या मृत्यूस कोण जबाबदार असा प्रश्न अमेरिकन कॉँग्रेस ला विचारते. ह्या बातमीला भारतात अजिबात दाखवले जात नाही , ह्या दुटप्पीपणाच्या विरुद्ध मला हा लेख लिहावासा वाटला. सध्याच्या मुस्लिम बहुल भागात जेथे युद्धजन्य परिस्थिती आहे तेथे लोकांना शिकण्यासाठी आधी जिवंत राहणे महत्त्वाचे आहे.हे जगाला कळले पाहिजे.

रवीराज 15/10/2014 - 07:36
२ वर्षानुर्वी केलेले नोबेल पुरस्काराचे अनुमान अगदी खरे ठरले, खुपच अभ्यासपुर्ण लेख आणि आता मलासुद्धा शंका येउ लागली आहे की नमोला सुद्धा नोबेल मिळतेय कि काय.

पैसा 15/10/2014 - 18:11
मिपाकर प्रदीप यांनी फेसबुकवर या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. http://www.thehindu.com/news/international/world/malala-kailash-satyarthi-win-nobel-peace-prize/article6488625.ece काय म्हणतात बघा.
It is an important point for a Hindu and a Muslim, an Indian and a Pakistani, to join in a common struggle for education and against extremism,” the Norwegian Nobel Committee said on Friday.
म्हणजे नोबेल पारितोषिक एका हिंदूला आणि एका मुस्लिमाला द्यायचे, त्यातला एक भारतीय आणि एक पाकिस्तानी असला पाहिजे असे ठरवून नंतर बकरे शोधलेले दिसत आहेत. सत्यार्थींना पारितोषिक मिळाले याचा आनंद जरूर आहे. पण यांचे हे निकष मनमोहन देसाईंच्या सिनेमाप्रमाणे तद्दन फिल्मी वाटले.

मदनबाण 16/10/2014 - 10:07
मलाला ला पहिल्या पासुन जसे "प्रोजेक्ट" केले आहे त्यावरुन या गोष्टीचे आश्चर्य वाटले नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण