Skip to main content

सस्नेह निमंत्रण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 07/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे. तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे. प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम) कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.* *माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम. प्रसाद ताम्हनकर ९७३०९५६३५६

वाचने 16583
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

सही रे! हाबिनंदन.आमचा पर्‍या लिहिणार म्हणजे काय बोलायची सोयच नाही. येक र्‍याकभर पुस्तकं लिही बेट्या तू. हातोहात खपतील बघ. आणि मला वाटतं, 'How to' प्रकारची मराठीत लिहिली जाणारी फार कमी पुस्तकं असावीत. अशा न रुळलेल्या वाटेवर जाण्याच्या निर्णयाबद्दल मनापासून अभिनंदन. :) अवांतरः रविवारी पुण्यात पोचायला तुला साधारण किती वाजतील? आम्ही आलरेडी टेबल अडवून बसलेलोच असू म्हणा. डायरेक तिकडंच ये. ;)

हार्दिक अभिनंदन परा... इतक्या लांब येणं होणार नाही त्यामुळे इथूनच शुभेच्छा !! एकदम झकास !!

हार्दिक अभिनंदन पराशेठ. अभिज्ञ.

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. प्रकाशनासाठी योग्य माणूस निवडलाय :०

अभिनंदन प्रसाद.... पुस्तकास चांगला रिस्पॉन्स मिळेल ह्याची खात्री आहे...

अभिनंदन ! आणि शुभेच्छा!! लतिका धुमाळे

In reply to by पाषाणभेद

त्रीवार अभिनंदन व शुभेच्छा! (१०० वा प्रतिसाद) अशाच रितीने पुस्तकांचीही शंभरी गाठावी व मराठी पुस्तकलेखनात तुझा विरू सेहवाग व्हावा हि इच्छा!

प्रतिसादावरून बरेच मिपा कुंटुंबीय जमणार असे दिसते आहे. म्हणजे ठाण्यात मांदियाळी जमणार तर! आम्हाला परदेशात राहून कार्यक्रमाचे वर्णन नंतर वाचायला मिळेलच. अशीच प्रगती करीत रहा. कापूसकोन्ड्या

तीकडे विरूने डब्बल सेंचुरी मारली. इकडे तुझ्या धाग्यानी सेंचुरी पुर्ण केली. :bigsmile:

परा अभिनंदन रे ! आणि मी सुध्दा येतोय. :) - नीलकांत

अशा पुस्तकाची फार गरज होती . रायपुर ला तर मिळणे कठीण आहे , पण नागपुर ला हे पुस्तक कुठे मिळु शकेल ? आणि एक पुस्तक अजुन येउ द्या ' चित्रपट समिक्षे वर ' .