मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Value add, Big Picture and the list goes on.

सोनल कर्णिक वायकुळ · · जनातलं, मनातलं
Value add Big picture Solution Providers Unique selling Proposition Strategic view Competitive benchmark…and the list goes on. तुम्हाला कंटाळा नाही येत असल्या बडबडीचा? ह्या शब्दांचा? मला तर अक्षरशः आजकाल वीट येतो. आई शपथ . बोलणाऱ्याच्या डोक्यात वीट घालावी इतका वीट येतो. काय त्या बोलण्यातला आव, अहाहा. आणि त्याच वेळी आपण करत असलेली थुकपट्टी. आहाहाहाहा. ती लपवायला वरून छान छान packaging. वाह वाह क्या बात क्या बात. सुरवातीला हे असले शब्द आपल्या manager कडून ऐकताना कोण अप्रूप वाटायचं काय सांगू! आपण चक्क मोठे झालोय अस काहीतरी. ते शब्द वापरताना तर मनातल्या बेडकीचा बैल व्हायचा फुगून. कॉलेज मधले टवाळ पाचकळ विनोदांच्या कोट्यांचा डोंगर रचणारे ते आपणच कि आणखी कोण? आणि हे काही कळण्या सवरण्याच्या आतच लक्षात आलं कि आपण त्या ‘corporate world ‘ चा एक भाग होऊन जुने झालोत. हळू हळू टेबलाच्या ह्या बाजूकडून त्या बाजूकडचा प्रवास सुरु झाल्यावर बर्याच गोष्टीतला भंपकपणा जवळून पाहायला मिळाला. च्यायला, (sorry . s o r i सॉरी ) ह्या client ला सांगायचं अमुक ढमुक कर म्हणजे तुझ्या अ ब क competitors ची चांगली जळेल. आणि त्याचवेळी अ ब क कडे पुढच्या प्रोजेक्ट साठी खडे टाकून ठेवायचे. हे असले धंदे सरळ सरळ सुख सुखी जमले नसते बुवा आपल्याला बापजन्मी. पण ज्याच्या कडून पगार घेतोय त्याचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्याचं पोट ह्याच धंद्यावर ह्याला काय म्हणायचं! (नोकरी ह्या एका सरळ सोप्या शब्दात आत आत किती खाचा खोचा..कारकुनाच सुद्धा नोकरीच आणि CEO ची सुद्धा नोकरी च. हॉटेलात पो-या म्हणून लागला तरी नोकरीच आणि VP marketing सुद्धा नोकरच. जाऊ दे विषयांतर झाल) नाही म्हणायला collectively कुठे तरी काहीतरी चांगलं घडतंय असं म्हणायला थोडा वाव आहे म्हणून ह्या थोडयाशा हलकटपणाच ओझ सहन करता येईलही. पण अंदर कुच कुच धुमसता हैहीच न? शब्द मुके फोल फोल म्हणून सोडून देता येतीलही. त्यांच्या मागची जाणीव मात्र दुकःरी खुपरी होत जाईल. त्याचं सांगा कराल काय? व्यवहार म्हून सोडून द्याल विवेकाची देव घेव इमान नावाचा भुंगा मात्र पोखरत राहील आतून जीव त्याचं सांगा कराल काय?….

वाचने 2560 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

प्रास 21/03/2011 - 23:20
(विशेषतः) आय.टी.वाल्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील......
ह्म्म..... आयटीवाल्याच्या (ललनांच्या) प्रतिक्रिया येवोत.;) लेखन आवडलं. यातलं काही कळत नसलं तरी आपापल्या नवर्‍यांकडून हे शब्द ऐकूक ऐकून बायकाही (बिगर आय टी) हेच शब्द वापरायला तयार होतात याची मजा वाटते.
>>>> तुम्हाला कंटाळा नाही येत असल्या बडबडीचा? ह्या शब्दांचा? येस्स,,,वीट. >>>>त्याच वेळी आपण करत असलेली थुकपट्टी. आहाहाहाहा. ती लपवायला वरून छान छान packaging. बेष्ट. हे घ्या अजून काही विनोदी ..... Figure it out, Clouding platform (this is super crazy now a days), integrate with e-staff, low hanging fruit (हे ऐकलं की मला हसायलाच येतं), :) Think out of the box, View from 20000 feet, key metric, boil the ocean, global competitiveness. :) :) :) :)

In reply to by बबलु

" we must attack the low hanging fruits first" असे शब्द आमच्या म्यानेजर बाईंकडून ऐकले आणि आम्ही खुर्चीत सरसावून बसलो. या मॅनेजमेंटी शब्दांचा भयानक अतिरेक झाला कि आम्ही खालील शब्दांचा मारा मॅनेजरवर करतो. atomic operations. cyclic dependency circular reference race window bus lockdown. घे भो***च्या.. लावत बस अर्थ.

चिरोटा 22/03/2011 - 11:19
हम्म. व्यथा समजण्यासारखी आहे. धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी अवस्था अनेकांची होते.!! काही लोक ही 'अनुभवांची शिदोरी' घेवून स्टार्ट अप चालु करतात आणि niche market साठी काहीतरी बनवतात्.पण ग्राहक पाहिजे तर हे थोडेफार करावेच लागते.
माझे एक काका भीक्शुक होते.दशग्रंथी होते पण एक नंबर ईरसाल. त्यांच्या एका मुखदुर्बळ सहकार्याची थट्टा करताना ते नेहमी सांगायचे " जिभेची टकळी "चालू" असेल तर पोटाची खळगी दब्ब बसेल " मग हळूच पण सगळ्यांना ऐकु जाईल अश्या आवाजात म्हणायचे " रांडा शुक शुक करतात भट केशवाय नमः , नरायणायनमः करतात "
या धिंगानाका तिंगानाका .. धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. . धत्ताड धतताड तत्ताड तत्ताड .. मला आय्टी मधे जायची बालपणापासुन इच्छा होती. पण काही जमलंच नाही .. बरंय ह्या निमित्ताने कळतात एकेक गोष्टी. (लेख जर्मन टाईप वाटला हा भाग अलहिदा)

प्रियाली 22/03/2011 - 20:50
आपण (आपल्या बॉसकडून) ऐकायचे आणि मग इतरांना (आपल्या टिममधल्यांना/सबऑर्डिनेट्सना) ऐकवायचे. आपण ऐकतानाचा आपला पडेल चेहरा, आपण दुसर्‍यांना ऐकवताना त्यांच्या पडेल चेहर्‍यात पाहायचा. तेवढीच मनःशांती. ;)