Skip to main content

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
(चित्र जालावरुन साभार.) वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून - विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम| वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६|| महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो. *कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.

वाचने 28445
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

वटपोर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व मिपाकारांना मनापासुन शुभेच्छा. निसर्ग देतांना इतके भरभरुन देत असतो की घेतांना आपली झोळी कमीच पडते. मनूष्यप्राण्याला जीवन देणार्‍या प्रत्येक जिवाचे/वस्तुचे पुजन करुन त्यांचा मान वाढविणे हेच आपली भारतीय संस्क्रुति शिकवते व वेळोवेळी आपल्या देवांनीही व क्रुष्णानेही गोवर्धन पूजा करुन आपल्याला याचा आदर्श पाठ शिकवला आहे. या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन करायचा निश्चय करुन,प्रत्येकाने आपआपल्यापरीने खारिचा वाटा उचलावा, हिच विनंती.

महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ
अश्या वेळी तू आपल्या पतीसमवेत विहार करतेस असा ह्या ओळीचा अर्थ अहे. सौदर्य लहरी मध्ये सर्वत्र आपल्या परमशिवस्वरूप पतीसमवेत विहार करणारी त्रिपुरसुन्दरी असा देवीचा उल्लेख आहे

नवर्‍यावर आपली "वट" राहावी म्हणुन स्त्रीया वटपोर्णिमा साजरी करतात... :p हाच त्यांचा छुपा अजेंडा असतो ! :secret: ते यम-रेडा इं... सगळी कॉन्स्पिअरसी थेअरी आहे बघा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }