इंटर व्ह्यु २
सरः एक मोठ्या कंपनीचे मालक. अपत्यहीन. आपल्या संपत्तीचा सुयोग्य विनियोग करण्यासाठी एक सब्सिडरी रिसोर्स डेवलपमेंट कंपनी काढण्याची इच्छा बाळगुन असलेले.
एच.आर.: सर्व नियम तोडुन जगलेला. A Total Freak...
............................................................................................
वर्तमान
"त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय देउ ह्याचा विचार करत होते. पण खोटे बोलुन चालणार नव्हते. ते शक्य नव्हते. कोण आहेत ते. रिअॅक्शन आणि स्टीम्युलस रिस्पॉन्सचा खुपच अभ्यास आहे त्यांचा. इंटरेस्टींग प्रोफाइल असे उत्तर मी देणार होते...
एवढ्यात तेच म्हणाले," Is this about Dad's business failure and that too because of some trusted employee."
मी थक्क झाले."
.........................................................................................
भुतकाळः
त्याला कॉलेजमधे एकच मित्र होता. समदु:खी. दोन्ही घरांची श्रीमंतीकडुन गरीबीकडे वाटचाल. पावसाळ्यात सुद्धा स्लिपर्स. प्लास्टीकच्या पिशव्यात घरुन बांधुन आणलेल्या चपात्या कँटीनमधे जवळ बसलेल्या सहकार्याच्या राहीलेल्या सांबार किंवा चटणी मधे बुडवुन खायच्या. प्रॅक्टीकल नंतर चणे आणि पाणी. सुट्टीच्या दिवसात काम करुन घरी हातभार लावणे क्रमप्राप्त. इंटर नंतर दोघांनीही शिक्षण बंद करुन नोकरी पकडली.
त्याला नोकरी मिळाली. साहेब मिळाला तो पण अवलिया. इंजिनियरिंग ची डीग्री अर्धवट सोडुन ह्युमन सायकॉलॉजीत डॉक्टरेट केलेला. यु.एन. च्या भारतातील प्रकल्पाचा अधिकारी. त्या दोन वर्षात मुंबईच्या गल्ली बोळातुन झोपड्यांतुन फिरताना आयुष्याचे गणितच बदलले.
........................................................................................
"सर, He reports to none चा अर्थ काय? ते तुमच्या कंपनीत काम करतात ना? आणि ते असताना ह्या इंटर व्ह्यु ची गरज काय?"
हम्म.
ते फक्त त्यांच्या मर्जीने सात दिवसांकरता आले होते. कन्सलटंट म्हणुन.त्या दिवशी त्यांनी इतर ३ अगदी अनुभवी उमेदवार रिजेक्ट केले. जाताना एक एनवलप दिले आणि म्हणाले " Open this if Saritaa returns. That should be in 2 weeks."
क्रमशः
याद्या
4391
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रभुंच्या सांगण्यावरुन मागच्या लेखाची लिंक
या भागाला
या भागात
हे काय चालू आहे ?
फारच क्रिप्टिक लिहिता की बुवा
पहिल्या
+१
In reply to पहिल्या by गणपा
मीपण आहे रे
In reply to +१ by धमाल मुलगा
मास्तर क्रिप्टीक लिहणे सोडेल असे कधी वाटतच नाही.
जराशी
गुर्जी,
अरे वा ...
In reply to गुर्जी, by परिकथेतील राजकुमार
म्हणजे
In reply to अरे वा ... by छोटा डॉन
तर हो ...
In reply to म्हणजे by Nile
आम्ही आपलं
In reply to अरे वा ... by छोटा डॉन
कंदिलधार्
In reply to आम्ही आपलं by आंबोळी
शरदिनीतै आणि मास्तर...
In reply to कंदिलधार् by गणपा
अजूनतरी
मोलाचा उपदेश
छान
मास्तर