Skip to main content

१. टोटल वॉर - संपुर्ण युध्द

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 16/11/2026 15:39 या दिवशी प्रकाशित केले.

Total war 

Total war is a type of warfare where all national resources are mobilized to sustain the war effort (particularly through war production), blurring the line between military and civilians, and legitimizing attacks on civilian targets as part of a war that is "unrestricted in terms of the weapons used, the territory or combatants involved, or the objectives pursued, especially one in which the laws of war are disregarded. 

संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Total_war


खरं तर ठरवलं होतं की २०२९ च्या निवडणुकांचा निकाल येई पर्यंत मिसळपाव वर काहीही लिहायचे नाही की कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही. अन्य प्रसार माध्यमे, सोशल नेटवर्क्स प्रमाणे इथेही मोदी द्वेष, भाजप द्वेष, आणि त्या निमित्ताने मुळातच असलेला  हिंदु द्वेष आणि ब्राह्मण द्वेष ओसंडुन वहात होता. काही मोजके लोकं जाणीवपुर्वक माझ्या लेखनावर येऊन वैयक्तिक टिप्पणी करणे, असंबध्द प्रतिसाद देणे, आणि दुसऱ्या कोणत्या तरी लिखाणावर चर्चा सुरु करणे असले प्रकार करु लागले होते. आणि संपादक मंडळ हे सारे प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देखील हातावर हात ठेऊन बसत होते. तेव्हा अशा वातावरणात कशाला इथे काही लिहा, आपले आपण फेसबुक वर लिहु असे ठरवले होते. पण नुकताच एक प्रसंग झाला आणि मग आता परत लिहिते व्हावे लागणार असे जाणवले आणि हे लेखन करायला घेतले. 


तर झालं असं की मित्रांसोबत गोवा ट्रिपला गेलो होतो. आता राजकीय मतभेद जसे सर्वत्र असतात तसे आमच्याही ग्रुपमध्ये आहेतच. काही टोकाचे डावे काही टोकाचे उजवे, बहुतांश मध्यममार्गी असे. ( त्यात एक जण होता तो मात्र पुर्वी एकदा चर्चेत म्हणाला होता कि "मला बंदुक मिळाली तर मी मोदीला ...." वगैरे वगैरे. इतका टोकाचा द्वेष पाहुन तेव्हा पासुन त्याला ग्रुपच्या ट्रिप्स मध्ये, पार्ट्यांमध्ये  जाणीवपुर्वक  टाळले जाते , पण तो एक टोकाचा अफवाद सोडुन द्या. ) 

तर आमची अशीच राजकीय चर्चा चालु असताना एका लेफ्टीस्ट मित्राला विचारलं की - " वरकरणी असं दिसून येत आहे की या विरोधकांना आंदोलकांना भारताबाहेरून देश विघातक शक्तींकडून फंडिंग होत होते, भारताचे सरकार अस्थिर करणे, भारताच्या इकॉनॉमिक प्रगतीला अडथळा आणणे, भारताचे जिओ पॉलिटिक्स मधील बळकट होत चाललेले स्थान कमजोर करणे या उद्देशाने या आंदोलनाला फंडिंग होत होते. "

आता समजा तुला कळालं की यात तथ्य आहे तर तू आंदोलकांची बाजू घेशील की सरकारची ? म्हणजे संपुर्णपणे काल्पनिक प्रश्न . हायपोथेटिकल प्रश्न आहे असे समजुन उत्तर दे. 

त्यावर तो म्हणाला की -  असं असलं तरी सुद्धा, देशविघातक शक्ती देशातील राजकारणात ढवळाढवळ करत आहेत असे सत्य असले तरीही,  मी आंदोलकांची बाजू घेईन आणि हे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करीन. मोदी , भाजप सरकार उलथवुनच टाकले पाहिजे, भले मग त्याला पाकिस्तान, चायना किंव्वा सोरोस अन्य कोणीही फंडींग करत असेल तर त्यांचे स्वागतच आहे. 

 

मी विचारलं , अजुन एक हायपोथेटीकल प्रश्न : समजा तुला फुल्ल ताकत आणि ऑथोरिटी दिली कि नागपुरात जाऊन संघाच्या कार्यालयाला कुलुप ठोकायचे, व्यक्तीस्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य वगैरे केराच्या टोपलीत टाकुन संघ पुर्णपणे बंद पाडायचा, आणि केवळ संघ संघ प्रचारकच का तर तो स्टैलिन म्हणतो तसे संपुर्ण सनातन धर्मच  त्याच्या सर्व सांस्कृतीक खुणासह नष्ट करुन टाकायचा, तर तु हे करशील का ?    

 त्यावर तो म्हणाला -  अगदी आनंदाने ! मी , आम्ही तर वाटच पाहतोय की कधी एकदा हे सरकार जातय, एकदा आमच्या कडे सत्ता आली की सगळ्या अंधभक्तांचे गिले चिठ्ठे खोलायला सुरुवात करणार आहे. 

 

तिथे माझे डोळे खाडकन उघडले. हे बोलणारा कोनीतरी अशिक्षित, धर्मांध व्यक्ती नाही, व्यवस्थित सुज्ञ व्यक्ती आहे. 

तेव्हा मला लक्षात आलं की this is a total war. They just want to destroy not only the BJP government but RSS and Sanatan dharma and Sanskriti . And they have an unapologetically clear manifesto for that.

ह्या लोकांचे टारगेट वरकरणी भाजप आणि मोदी शहा ह्यांन्ना सत्तेतुन खाली खेचणे हे दिसत असले तरी मुख्य अजेंडा सनातन धमच मुळासकट उद्वस्त करुन टाकणे हे आहे. 

राजकारण तर केवळ बहाणा आहे, मुळ टारगेट हे हिंदु धर्मच आहे.  आणि मग ते वेगवेगळ्या संधी घेउन त्या टारगेट वर आक्रमण करतच राहणार . कधी गणेशोत्सवात ढोलताशे नको तर कधी गणेशोत्सवच नको, कधी दिवाळीत फटाकेच नको तर दिवाळीच नको. कधी रामायण सारखा चित्रपट काढुन रावणाचेच पात्र हिरो करायचे तर कधी राम हे काल्पनिक पात्र आहे असे कोर्टात निवेदन द्यायचे !

तुम्हाला काय वाटतं , समजा यदाकदाचित २०२९ मध्ये मोदी सरकार पडले , भाजपा सत्तेतुन बाहेर फेकले गेले, श्री. राहुल गांधी प्रधानमंत्री झाले तर हे लोकं शांत बसतील ? मुळीच नाही , उलट सध्या आहे त्या पेक्षा दुप्पट त्वेषाने हल्ले सुरु करतील. 

आणि समजा २०२९ मध्ये परत भाजपा सरकारच बहुमताने निवडुन आले तर तुम्हाला असं वाटतं का की हे लोकं  शांत बसतील , आत्मचिंतन करतील, बहुसंख्य हिंदुंच्या धर्मावर संस्कृतीवर हल्ले करायचे थांबतील, तर तसंही नाहीये. हे लोकं २०३४ च्या निवडणुकांचे टूलकिट तयार करुन परत आंदोलने सुरु करतील , कधी शाहीन बाग तर कधी शेतकरी, कधी आरक्षण तर कधी कॉकरोचेस ! 

 

तर तात्पर्य काय तर - ह्या लोकांचा  मॅनिफेस्टो अतिषय सुस्पष्ट आहे . इट्स अ टोटल वॉर. मोदी - भाजप हे टारगेट नाहीत तर समस्त हिंदु धर्म , हिंदु संस्कृती हे टारगेट आहे, भले मग ते राजकारणाशी संबंधीत असो की नसो. 

आणि अशोकाने ज्याप्रमाणे बौध्द धर्माचा स्विकार केल्यावर, ३ -४ वर्षांनंतर,  कलिंगवर युध्द पुकारले आणि संपुर्ण नरसंहार केला तसे काहीसे  लोंगटर्म व्हिजन आहे ह्य लोकांचे ! हे स्वत: सिक्युलैरिझम चा मुखवटा घालत आहे खरे , पण ह्याचे खरे व्हिजन अतिषय सुस्पष्ट आहे. ज्याप्रमाणे अकबराला कळले की आपण राजपुतांना संपवु शकत नाही, ह्यांच्या सोबत लढत बसण्यात आपली जिंदगी जाईल त्यापेक्षा आत्ता शांत बसु , सिक्युलैरिझम चा आव आणु तसे ह्यांचे आहे. पण शक्ती वाढल्यावर औरंगजेबाने  जसे स्वत:चा , आपल्या पुर्वजांचा, आपल्या विचारसरणीचा अजेंडा सुस्पष्टपणे राबवायला सुरुवात केली तसेच हेही लोकं करणार आहेत. 

 

असे हे टोटल वॉर आहे.  आहे हे असं आहे.  अशा वेळेला आपण गप्प बसून राहू शकत नाही. आपण का गुळुमुळु मध्यममार्ग स्विकारायचा ? आपल्याला  आपल्या धर्माचे देशाचे संस्कृतीचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर नुसते अलिप्त राहून चालणार नाही, आपल्याला आपल्या  "युगधर्मा"चे पालन करावेच लागेल. श्री. अटलबिहारी वाजपेयी जीं जसे म्हणाले तसे "राजधर्मा"चे पालन करावे लागेल . 

आता ह्या इथे हातपाय गाळुन , होईल ते बघु असा दृष्टीकोन स्विकारुन चालणार नाही. कृष्ण काय म्हणाला आठवते ना ? 

श्रीभगवानुवाच -
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यमजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ २-३ ॥

म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥

सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥

 


हं . पण नक्की करायचं काय ? 

सगळ्यांनीच राजकारणात जायचं का ? की सगळ्यांनीच राजकीय वादावाद्या करत बसायचं ? 

नाही तसं नाही. राजकारण , राजनीती हा क्षत्रियांचा धर्म आहे. उपनयानदी संस्कारांचा लोप झाल्याने जन्माने कोणी क्षत्रिय नाही, जो पराक्रम गाजवेल तो क्षत्रिय , जो देव देश धर्मासाठी प्राण पणाला लाऊन लढेल तो क्षत्रिय , मग तो जन्माने कोणी का असेना . 

ब्राह्मणांचे कर्तव्य काय तर धर्मामध्ये ज्या मुर्ख प्रथा घुसल्या आहेत त्या समाज प्रबोधन करुन काढल्या पाहिजेत. उदाहरणार्थ : ढोल ताशे ही चर्म वाद्ये आहेत , ती पवित्र उत्सवात वाजवायची वाद्येच नाहीत , डीजेचा तर संबंधच येत नाही. ह्या गोष्टी कलंकास्पदच आहेत धर्माला त्या आआपल्या आपणच हटवल्या पाहिजेत जेणेकरुन धर्म स्वच्छ होईल. त्यात ह्या परक्या लोकांना बोलायची संधी दिली तर ते ह्या निमिताने संपुर्ण गणेशोत्सव च कसा बंद पाडता येईल हेच बोलणार आहेत त्यामुळे त्यांना हि संढीच द्यायची नाही.

अजुन एक उदाहरण म्हणजे - फटाक्यांचा शोध चीन मध्ये लागलेला आहे, त्याचा सनातन धर्माशी काय संबंध . फटाके संपुर्णपणे , निशेषपणे बंद व्ह्यायला पाहिजेत.  आणि हे लोकांना , प्रेमाने आणि अधिकाराने समजाऊन देणे हे काय ब्राह्मणांचे आहे.  "प्रदुषण काय फक्त फटाक्यांनीच होतं का ?" असे विचारणे हाच वितंडवाद आहे. प्रदुषणाने नुकसान आपल्याच लोकांचे आहे, सनातनी हिंदुंचेच आहे. 

ह्या आपल्या धर्मात घुसलेल्या कुप्रथा म्हणजे आपल्या घरात लागलेली जळमटं आहेत , ही आपणच काढली पाहिजेत , कारण आपण ही जबाबदारी झटकली तर दुसरा कोणीतरी जळमटं काढायच्या निमित्ताने घराला आग लावायला बसलेला आहेच !

वैश्य आणि शुद्रांचा युगधर्म हा आहे की हे जे धर्म विध्वंसक लोकं आहेत त्यांच्याशी त्यांच्या फायद्याचा व्यवहार न करणे , त्यांच्या फायद्याच्या सेवा न पुरवणे. व्यवसायाच्या , सेवेच्या संधी आपल्याच लोकांना देणे. आणि लोकांमध्येही प्रबोधन करणे की अरे तुम्ही देवाला हळदी-कुंकु विकत घेताय खरे पण ज्याच्याकडुन घेताय तो त्या पैशाचा विनियोग गाय कापायला करणार असेल ,  तुमच्या पोरीबाळी पळवायला करणार असेल किंब्वा दररोज माझेच अंतिम सत्य असे ओरडायला करणार असेल तर अशा कर्माने तुम्हाला काय पुण्य लाभणार आहे , उलट पापच लाभेल. त्यामुळे ज्याप्रमाणे बैंका Know Your Customer (KYC) चालवतात त्याच प्रमाणे आपण know your goods and service provider हे चालवले पाहिजे. 

 


 

तात्पर्य इतकेच की - 

हे संपुर्ण युध्द आहे.  आता शांत बसुन उपयोग नाही.  ज्याला जे असे सुचेल तसे , ज्याला कृष्णाचा उपदेश जसा उमगेल तसे आता ह्या धर्मयुध्दाला उभे रहावेच लागेल !

 

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥ १८-७३ ॥ 

तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा । करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥

 

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 545
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कम्युनिस्टांचा जाहीरनामा सरळ सरळ म्हणतो कि 

साम्यवाद शाश्वत सत्ये नष्ट करतो, तो नवीन पायावर त्यांची पुनर्बांधणी करण्याऐवजी सर्व धर्म आणि सर्व नीतिमत्ता नष्ट करतो; आणि म्हणूनच तो आजवरच्या सर्व ऐतिहासिक अनुभवांशी विसंगत वागतो."

Karl Marx and Friedrich Engels wrote in Chapter 1 of the Manifesto:
Communism abolishes eternal truths, it abolishes all religion, and all morality, instead of constituting them on a new basis; it therefore acts in contradiction to all past historical experience.

आता वाममार्गी सुरुवातच अशी करतात तर यांच्याशी कोणता तह किंवा समेट होऊ शकतो.

ती वैचारिक वाळवी मुळापासूनच नष्ट करायला हवी.  

त्यांच्या आदर्शवादाची झापडं जितकी लवकर दूर कराल तितके राष्ट्राच्या पुनर्रबांधणीस हातभार लागेल.  

मुळात साम्यवाद हा तरुणांना सुरुवातीला आदर्शवादी वाट्तो  पण जसे वय वाढते आणि अनुभवविश्व समृद्ध होते तसा त्यांना त्यातील फोलपणा जाणवू लागतो. 

म्हणूनच जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाला आहे कि वयाच्या पंचविसाव्या वर्षी तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदयच नाही. आणि वयाच्या चाळिशीला तुम्ही कम्युनिस्ट असाल तर तुम्हाला मेंदूच नाही.      

बाकी श्री मोदी याना हटवण्यासाठी असंख्य लोक टपून बसलेले आहेत. आता मिपावरही ते आहेतच.  

पण ते सफल होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन टोकाची विधाने करत राहतात. तेवढाच त्यांच्या मनाचा निचरा होतो. 

जसे एरंडेल घेतलं कि कोठा साफ होतो तसंच.  


पण मूळ वृत्ती बद्धकोष्ठाची असली तर ते तरी काय करणार?  

आपण एरंडेल देत राहायचं.  
   


In reply to by सुबोध खरे

हे जरा स्टिलमॅन करा की. 

 

त्यांचे म्हणणे काय आहे ? की कम्युनिझम स्वीकारल्यावर धर्माचा पगडा जातो असं की ते स्वतःहून काही नष्ट करण्याबद्दल बोलतात ?

 

आयन रँड सुद्धा धर्माला ह्यापेक्षा वाईट शब्दात ठोकते. शरीर आणि आत्मा ह्या तफावतीला ती भूत आणि प्रेत ह्यांची बाष्कळ गप्पा म्हणते. 


In reply to by सुबोध खरे

>> Communism abolishes eternal truths, it abolishes all religion, and all morality, instead of constituting them on a new basis; it therefore acts in contradiction to all past historical experience.

सदर उतारा Communist Manifesto (Chapter 2) मधे आहे Chapter 1 नाही.

ह्या उताऱ्याच्या पुढचा उतरा abolish म्हणजे नेमकं काय ते छान स्पष्ट करतो: 

What does this accusation reduce itself to? The history of all past society has consisted in the development of class antagonisms, antagonisms that assumed different forms at different epochs.

But whatever form they may have taken, one fact is common to all past ages, viz., the exploitation of one part of society by the other. No wonder, then, that the social consciousness of past ages, despite all the multiplicity and variety it displays, moves within certain common forms, or general ideas, which cannot completely vanish except with the total disappearance of class antagonisms.

ह्या लेखाच्या परिप्रेक्षात class antagonisms हा महत्वाचा मुद्दा अधोरेखित होतोय. लेखकाने कोणत्या क्लास (वर्णाने) काय करायला हवं हे ठळकपणे मांडलं आहे.

- (आदर्शवादी) सोकाजी


लेख बाद झाला नाही.आश्चर्य आहे. बाकी प्रधानमंत्री बनण्यासाठी 272 जागा लढवावी लागतात. बाकी टूल किट सफल होणे शक्यच नाही. जनता मूर्ख नाही.


ह्या आपल्या धर्मात घुसलेल्या कुप्रथा म्हणजे आपल्या घरात लागलेली जळमटं आहेत , ही आपणच काढली पाहिजेत , कारण आपण ही जबाबदारी झटकली तर दुसरा कोणीतरी जळमटं काढायच्या निमित्ताने घराला आग लावायला बसलेला आहेच !

हे तर करायलाच हवे.


हार्दिक अभिनंदन.  

टोटल वाॅर

आदीम काळापासून युद्ध अहोरात्र  चालूच आहे आणी अंतापर्यंत पर्यंत चालूच रहाणार आहे. युद्धपद्धती बदलतात. मानसिकता जोवर बदलत नाही तोपर्यंत असेच चालणार. रणांगण सोडून पळून गेल्यावर सुद्धा युद्ध चालूच रहाणार. 

मला बंदुक मिळाली तर......

वाचाळवीर एवढेच म्हणेन. टोकाचा द्वेष जरी असला तरी प्रत्यक्षात कृती करायची वेळ आल्यावर कोण  किती पाय रोखून उभे रहातील याबद्दल  शंकाच  आहे. चाफेकर, भगतसिंग, राजगुरू विरळेच. 

 

हे असेच चालत रहाणार.  धर्म, जात,पंथ याचा सत्ता काबीज करण्यासाठी येन केन प्रकारेन उपयोग होतच रहाणार.  इथे शिक्षित, अशिक्षित याचा काही संबंध नाही.

 

फार काळजी करायची गरज नाही. निसर्ग आपला समतोल राखण्यासाठी सक्षम आहे. 

 

बाकी काळानुसार रूढी परंपरा,प्रथा यामधे बदल व्हायलाच  हवा. समाज परिवर्तनशील असतो पण परिवर्तनाची गती  इतकी हळू असते की  ते झाल्यावर सुद्धा काही वेळा कळत नाही. 

चातुर्वर्ण्य मया सृष्ट्या, असे भगवद्गीतेत म्हणले आहे ,अर्थात  मी वाचले नाही पण ऐकले आहे. ती पूर्वापार  चालत आलेली समाज व्यवस्था बदलली ना.....

असो,पुन्हा भेटूच.  


In reply to by कर्नलतपस्वी

निसर्ग आपला समतोल राखण्यासाठी संपूर्ण मनुष्यजातच नष्ट करणार असा रंग दिसत आहे.


समयोचित आणि समर्पक लेख 

 

हे संपुर्ण युध्द आहे.  आता शांत बसुन उपयोग नाही.  ज्याला जे असे सुचेल तसे , ज्याला कृष्णाचा उपदेश जसा उमगेल तसे आता ह्या धर्मयुध्दाला उभे रहावेच लागेल !

 

टोटल सहमत. 


डावे नवकम्युनिस्ट, पुस्तकी धर्मांध जगभरात धुडगूस घालणारा मुस्लिम गुंड  समाज एकमेकांचे शत्रू असूनही सध्या मित्र दिसतात. तेच आपापसात झगडताना दिसू लागतील. 


In reply to by शशिकांत ओक

डावे नवकम्युनिस्ट, पुस्तकी धर्मांध जगभरात धुडगूस घालणारा मुस्लिम गुंड  समाज एकमेकांचे शत्रू असूनही सध्या मित्र दिसतात. तेच आपापसात झगडताना दिसू लागतील. 


मुस्लिम धर्मांध सत्तेत आल्यावर कम्युनिस्टांचे शिरकाण करतात तर कम्युनिस्ट सत्तेत आल्यावर मुस्लिम धर्मांधांचे शिरकाण करतात. तरीही कोणी तिसरा सत्तेत असेल तर त्याच्याविरोधात लढायला दोघे एकत्र असतात. पण तो तिसरा एकदा सत्तेतून गेला आणि या दोघांपैकी कोणी एक सत्तेत आला की दुसऱ्याचे शिरकाण होणे अवश्यंभावी आहे. ही एक प्रकारची विडंबना आहे. 


@ प्रसाद गोडबोले,  वर्षभरानंतर पुन्हा लिहीते झालात हे खूप चांगले केले. तुमच्या सारख्या बहुशृत, व्यासंगी,  रसिक, आणि मनापासून कळकळ असणाऱ्यांनी मिपावर लिहीणे आणि प्रतिसाद देत रहाणे अतिशय गरजेचे आहे. असेच नियमित लिहीत रहाल अशी आशा आहे. अनेक आभार.

अवांतर: फ्रान्स आणि अन्य युरोपीय देशात फिरताना दिसणाऱ्या प्रत्येक चर्चमधे मी आत संपूर्ण फिरून तिथली भव्य चित्रे, मूर्ती, वास्तुकला, लाकडी काम सावकाशीने जरूर बघत असतो. माझ्यासारखे थोडेसे कलाप्रेमी तिथे फिरताना दिसतात, मात्र धार्मिक कारणाने आलेले कोणी दिसत नाहीत. फक्त रविवारी सकाळी दहा वाजता पाद्रीबुवांचे  प्रवचन ऐकणारे थोडेसे लोक आलेले दिसतात. एका अर्थी ख्रिस्ती धर्म इतिहासजमा झालेला असल्यासारखी परिस्थिती दिसते. रस्त्यावर एक लहान टेबल लावून काही लोक जाणायेणारांना काही छापील चोपड्या देऊ करतात, त्यांच्याकडेही कोणी लक्ष देताना दिसत नाही. 

 खुद्द त्या त्या देशातल्या मूळ नागरिकांच्या लोकसंख्येतली वाढ नगण्य झालेली असली, तरी हजारो लाखो बेकायदेशीर शांतताप्रेमी दर वर्षी तिकडे घुसत असतात, त्याबद्दल तिकडले लोक हतबल झालेले आहेत.


>> अशोकाने ज्याप्रमाणे बौध्द धर्माचा स्विकार केल्यावर, ३ -४ वर्षांनंतर,  कलिंगवर युध्द पुकारले आणि संपुर्ण नरसंहार केला

लेखात जे काही दावे केले जातात ते सबळ पुरावा / आधार यानुसार केले तरच लेखाचं गांभिर्य ठसतं. वरील दाव्याचा (युध्द आणि बौध्द धर्माचा स्विकार) यांची क्रोनोलॉजी,  आर्किओलोजिकल आधार दिल्यास त्याची तथ्यता ठरवता येईल.  'संपुर्ण नरसंहार' तूर्तास बॅक-बर्नर वर ठेवतोय.  

 

>> राजकारण तर केवळ बहाणा आहे, मुळ टारगेट हे हिंदु धर्मच आहे

राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवूया. हिंदु धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म. त्याचं नामकरण किंवा उल्लेख लिखीत स्वरूपात कोणत्या वेदात, स्मृती-श्रुती,  पुराणात, इतिहासात आला आहे? 

 

>> शक्ती वाढल्यावर औरंगजेबाने  जसे स्वत:चा , आपल्या पुर्वजांचा, आपल्या विचारसरणीचा अजेंडा सुस्पष्टपणे राबवायला सुरुवात केली

'भविष्यपुराण' या महर्षी व्यासलिखीत पुराणात, भविष्यकालीन घटना व व्यक्ती यांचा निर्देश असल्याने, १८ महापुराणांपैकी एक प्रमुख पुराण म्हणून गणल्या गेलेल्या ग्रंथात, प्रतिसर्गपर्वातल्या चतुर्थखंडात अकबर हा पूर्वाश्रमीचा मुकुंद ब्राह्मण असल्याच म्हटलं आहे. म्हणजे औरंगजेब त्याच्या पूर्वजांचा म्हणजे मुकुंद ब्राह्मण यांचा अजेंडा राबवतो आहे असे म्हणता येऊ शकेल का? 😀 
(संदर्भ: गीता प्रेस प्रकाशित भविष्यपुराण, पान क्रमांक ३७५) 

 

>> ब्राह्मणांचे कर्तव्य काय तर धर्मामध्ये ज्या मुर्ख प्रथा घुसल्या आहेत त्या समाज प्रबोधन करुन काढल्या पाहिजेत.  उदाहरणार्थ : ढोल ताशे ही चर्म वाद्ये आहेत , ती पवित्र उत्सवात वाजवायची वाद्येच नाहीत

चर्म वाद्य वाजवणे ह्या मुर्ख प्रथा. 

भविष्यपुराण (आणि बहुतांश इतर ग्रंथांत) जे काही लिखीत स्वरूपात केलं आहे तो मुर्खपणा नाही, कारण ते ॠषी-महर्षींनी लिहून ठेवल्याने ते शास्त्र आहे. 

 

>> वैश्य आणि शुद्रांचा युगधर्म हा आहे की हे जे धर्म विध्वंसक लोकं आहेत त्यांच्याशी त्यांच्या फायद्याचा व्यवहार न करणे , त्यांच्या फायद्याच्या सेवा न पुरवणे

ब्राह्मणांचे कर्तव्य काय तर मुर्ख प्रथा काढण्यासाठी समाज प्रबोधन करायचं. आणि, वैश्य आणि शुद्रांनी काय करायचं तर सगळ्यांना सगळ्या सेवा पुरवायच्या, झकास!

 

हा चातुर्वर्णाधिष्टीत सो-कॉल्ड धर्म  वाचवायला धर्मयुध्दाला उभे राहयचं म्हणजे युद्ध करायचं क्षत्रियांनी, त्यासाठी सेवा पुरवायची वैश्य आणि शुद्रांनी आणि ब्राम्हणांनी फक्त समाज प्रबोधन करायचं, छान!

 

तुर्तास इतकेच!

 

- (परखड) सोकाजी