Skip to main content

रुळावल्या आठवणी

लेखक Satyajit_m यांनी मंगळवार, 10/09/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.

रुळावल्या आठवणी



रुळावरून गेली गाडी दूर आठवांच्या गावा तिथे मायेचा निर्झर इवल्या स्वप्नांचा थवा
पारिजात अंगणात गंध ओतत सांडेल मोहक अबोली फिक्या जुईशी भांडेल
तिथे कुंकवाची डबी जास्वंदीत लवंडली नवी गुलाबाची कळी लाल होईतो लाजली
माझं बालपण तिथे खेळताना सापडेल तिच्या मऊसूत ओल्या पदरात आढळेल
माझ्या राठल्या केसात फिरे मायेचा गं हात सोडे आठवांचा धूर गाडी दूर दूर जात...
सोडे आठवांचा धूर गाडी दूर दूर जात...

  प्रचि श्रेयनिर्देश: पद्मावति


वाचने 20234
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

चटकन रुळावरल्या आठवणी असे वाचून अत्यन्त धाकधुकीने धागा उघडला होता. पण धागा उघडताच टायटल वेगळेच दिसलं म्हणून एडिट झाले की काय कन्फर्म करायला पुन्हा बॅक फोर्वोर्ड करून पाहिले अन लक्षात आले मी चुकीचे वाचले होते. कविता छानच