Skip to main content

झाडीपट्टी चंबल लागते (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी रविवार, 14/02/2016 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते स्ययरात ते कईचेे गेले वापस आले नहीं तुमची जमीन बाप्पा आमाले दलदल लागते आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते - संकेत बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे, मिरगात= मृग नक्षत्रात तऱ्याची पार= तळ्याचा बांध सब्बल= पहार कईचे= कधीचे कोटी बी = कोठे पण भलभल= धो-धो वाहणारे लडुलडु= रडत रडत

वाचने 464
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया