Skip to main content

रंगपंचमी कशी साजरी करता ?

लेखक दशानन यांनी मंगळवार, 10/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1219
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

बेस रंगाची होळी महत्वाची

In reply to by विनायक प्रभू

बरोबर.. पण संगे कोण खेळत आहे हे पण महत्वाचे नाही का :?

"फुगे" आनिक "रंग" ! लै मज्जाच मज्जा! -बरबट्लेला सँडी

हम्म. कौल पण हाताळला... छान!!!! जोरात सुटले आहात.. संभाळा. कौले काढणारे गारद होतात म्हणे.. :) -- अवलिया

होळी , धुलीवंदन आणी नंतर येणारी रंगपंचमी. होळीची पार्श्वभुमी आपण सर्वजण जाणतोच. होलिकादहनामधे सर्व वाइट गोष्टी व विचार नष्ट करुन होळीची पुजा होते आणी संध्याकाळी साजुक तुप घातलेल्या गरमागरम पुरण्पोळ्या, खीर, आमटी, भजे, पापड आणखी बरेच काही. या सर्वाचा आनंद मनसोक्त घेणे आणी तोसुद्धा घरातल्या सर्वाबरोबर. प्रत्येक सण आनंद्च घेउन येत असतो घरी. धुलीवंदन आणी रंगपंचमी (आजकाल दोन्हीचा अर्थ एकच) ची तर मजा काही औरच. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करुन देणारा सण. कडक उन्हामधे गारवा देणारे रंग (अर्थात हर्बल) पाण्याचे फुगे आणी थंडाई वा वाह.. लहान मुलांची तर चांगलीच चंगळ सुरु असते आणी बालपणाचा खरा आनंद देणारा हा सण. मित्रमैत्रिणी नातेवाईक सर्वाशी जवळीक साधुन देणारा हा सण. आमच्याकडे तर मोठा हौद तयार केला जातो आणी अक्षरशः बुडवुन काढले जाते एकेकाला.. थोडं पाणी जपुन वापरा आणी घ्या मजा ह्या अजोड सणाची. आपला मराठमोळा...

एडीबल कलर वापरतो.त्यामुळे सात दिवस रंग गेला नाही तरी चालतो.अपाय होत नाही.रंग काढण्याचा खास साबण आमचेकडे आहे असे आम्ही सांगतो.ऑन साईट डेमो देण्याची तयारी आहे.बाह्य मदतीशिवाय निघणार नाहीत असे रंग पण आम्ही पुरवतो.संपर्क करा.

इतर - गेली काही वर्षे युपीबिहारी बाबुन्च्या व इतर उत्तरभारतीय परप्रान्तियान्च्या आत्यन्तिक प्रभावामुळे होळी नन्तरच्या धुळवडीलाच सुट्टी अस्ते! रन्गपन्चमी महाराष्ट्रातील शहरातून हद्दपारच झालेली दिसते जो काही चिखल रन्ग वगैरे खेळला जातो तो होळीच्या दुसर्‍या धुळवडीच्या दिवशी! सबब, वरील प्रश्ण गैरलागू! आता ऑफिसमधे रन्गपन्चमीच्या दिवशी कामाला जाऊन कसले रन्ग उधळणार????? :D आमच्या लहानपणी मात्र, भर पुण्यात, "रन्गपन्चमीलाच" रन्ग खेळले जायचे आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by limbutimbu

सहमत. आम्ही अजूनही रंगपंचमीला रंग खेळतो. हापिस वगैरे फाट्यावर मारून. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984