Skip to main content

एखद्या व्यक्तीस त्याला न पाह्ता त्याच्यावर प्रेम करने किती रास्त आहे.

लेखक जीत यांनी गुरुवार, 04/09/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1603
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे| अशी तुमची धारणा असेल तर अजाबात त्या व्यक्तीला बघायची गरज नाही. जो दिसेल किंवा नाही दिसत त्याच्यावर प्रेम करत सुटा. प्रेमच कशाला? लग्नही न पाहताच करा. निदान तुझ्यात काय पाहून लग्न केलं? तुझ्यात काय पाहून प्रेमात पडलो ?म्हणून हळहळायला तरी नको.

प्रेम करण्यास हरकत काय आहे? आपली मैत्रीही आपल्या आवडीनुसारच होते की. मला 'सिर्फ तुम' मधील प्रिया गिलचे वाक्य आठवते. ती तिच्या मैत्रीणीला म्हणते, 'तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?'

मला वाटते प्रेम करावे लागत नाही ते आपोआप होते, आपल्याला ही ते कळत नाही कधी प्रेमात पडलो :) पाहणे न पाहणे ह्या गोष्टी दुय्यम आहेत. मन/ विचार जुळले की मैत्री होते आणि हदय जुळले की प्रेम होते.

एखाद्याला न बघता (म्हणजे चित्रपटातही नाही!) त्याचे अस्तित्व तरी कसे जाणवेल? मग प्रेमात पडण्याची मैत्री करण्याची वेळ कधी येईल. कौल लिहिणारे पत्रमैत्री, किंवा इंटर्नेट-मैत्री विषयी बोलत आहेत का? इंटर्नेटवर दिसणारा स्वभाव हा प्रत्यक्षातल्या स्वभावापेक्षा वेगळा असू शकतो. माझा तर आहेच. याविषयी सर्किट यांनी मागे चर्चा केली होती. त्यामुळे त्या इंटर्नेट स्वभावाच्या प्रेमात/मैत्रीत पडायचे आहे, की वास्तवीक स्वभावाबद्दल कौल आहे?

In reply to by धनंजय

असे प्रतिमेच्या प्रेमात पडणारे अनेक वीर असतात. फारावर्षांपूर्वी जेव्हा याहू मेसेंजर नवानवा होता त्यावेळेस माझ्या बाजूचा डेस्कवरचा गिरीश - कविता बनून दोन डेस्क सोडून बसणार्‍या राजेशशी गुजगोष्टी करायचा आणि राजेशराव कविताताईंच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. गोष्टी गाठीभेटींवर गेल्या. देवदास बनून दाढीचे खुंट वाढल्यानंतर राजेशरावांना आपण कोणाच्या प्रेमात होतो ते एक दिवस सांगावं लागलं.
त्यामुळे त्या इंटर्नेट स्वभावाच्या प्रेमात/मैत्रीत पडायचे आहे, की वास्तवीक स्वभावाबद्दल कौल आहे?
न पाहिलेल्या व्यक्तिचा वास्तविक स्वभाव कसा कळतो?

In reply to by सखाराम_गटणे™

लोक इतके पण मुर्ख कसे होतात, देव जाणे.
बोळा फारच तुंबला असेल तर काहीही होऊ शकते... ;) असो...मनावर घेऊ नये.... (बघता आणि न बघता प्रेम केलेला) पांथस्थ

In reply to by पांथस्थ

बोळा फारच तुंबला असेल तर काहीही होऊ शकते. =)) =)) =)) =)) =)) खरे आहे . बोळे तुंबले की मोरीतुन पडेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करते हा भौतिकीचा नियम आहे .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by प्रियाली

देवदास बनून दाढीचे खुंट वाढल्यानंतर राजेशरावांना आपण कोणाच्या प्रेमात होतो ते एक दिवस सांगावं लागलं. खो खो खो ! मी पण माझ्या एका पुण्याच्या मित्राला युनिवर्सिटी सर्कल जवळ भेटायला बोलावले होते, मुलीचे सोंग घेऊन चॅटून. बिचारा खरेच गेला. मी अमेरिकेत होतो. -- सर्किट

गेले काही आठवडे काही जण सदस्यत्व घेऊन लवकरच कुठलासा त्रोटक कौल टाकतात असे दिसते. नवीन सदस्यांचा सक्रिय सहभाग बघून मन सुखावते. पण हा कुठलासा "पॅटर्न" असल्याचे राहून राहून वाटते. नवीन सदस्यांनी त्रोटक कौल टाकण्यापूर्वी एखादा छोटासा चर्चाप्रस्ताव टाकून मिपावरती सदस्यत्वाचा शुभारंभ करावा. असे केल्यास त्यांच्याशी (मला तरी) मिपा-मैत्री करणे अधिक सुलभ जाईल. मग अशा मित्राच्या कौलाला उत्तर देण्यात मला अधिक स्वारस्य वाटेल. नाहीतर अशा सदस्याशी हितगुज करणे म्हणजे, हा कौल म्हणतो तसे - "ओळख नसलेल्या व्यक्तीशी मैत्री/प्रेम करणे" होय. बाकी सदस्यांना काय वाटते?

In reply to by धनंजय

पण त्यापेक्षाही सोपे म्हणजे ह्या कौलाच्या सुरुवातीलाच एक छोटासा परिच्छेद टाकण्याची सोय मिसळपावाने द्यावी. म्हणजे एका दगडात दोन पक्षी ! -- सर्किट

In reply to by धनंजय

गेले काही आठवडे काही जण सदस्यत्व घेऊन लवकरच कुठलासा त्रोटक कौल टाकतात असे दिसते. नवीन सदस्यांचा सक्रिय सहभाग बघून मन सुखावते.
म्हणजे कौल लावणार्‍याप्रमाणे आपणही तासाभरात एंट्री मारून कौल लावणारा सदस्य नवा आहे असं धरून चालता आहात. कदाचित, १. जुना सदस्य आपली प्रतिमा डागाळू/ बदलू नये म्हणून नाव बदलून असा प्रस्ताव टाकत असेल. २. किंवा, पिल्लू सोडायचं - आपण आहोतच चर्चा करायला, वादावादी करायला आणि फेटे उडवायला ;) ....दाजिबा!!!

In reply to by प्रियाली

म्हणजे कौल लावणार्‍याप्रमाणे आपणही तासाभरात एंट्री मारून कौल लावणारा सदस्य नवा आहे असं धरून चालता आहात.
हा हा. आपला, (सर्व संकेतस्थळांवरील जुन्या सदस्यांना ओळखणारा) आजानुकर्ण

In reply to by प्रियाली

मी जो काही "पॅटर्न" म्हणत होतो, तो तुम्ही स्पष्ट शब्दांत सांगितला आहे. अशास एका सदस्यनावाचे खाते बंद केलेले आहे, असे दिसते. हा सदस्य खरोखर नवीन असेल, तर त्याला या पॅटर्नबद्दल जाणीव करून देत होतो. आपण विघ्नसंतोषी असल्याची शंका दूर करणारे, असे काही लेखन नवीन सदस्य करेल. जेणेकरून त्याचे खाते बंद होऊ नये. पुढे नवीन सदस्याला प्रोत्साहनच मिळेल. हा सदस्य खरोखर नवीन नसेल, तर हा कौलही त्या पॅटर्नचाच भाग होतो. हे जाणून त्याचे खाते कदाचित बंद होईल याची सर्वांना कल्पना यावी, आणि गंभीर प्रतिसाद देण्यात कोणी वेळ दवडू नये.

In reply to by धनंजय

हा सदस्य खरोखर नवीन नसेल, तर हा कौलही त्या पॅटर्नचाच भाग होतो. हे जाणून त्याचे खाते कदाचित बंद होईल याची सर्वांना कल्पना यावी, आणि गंभीर प्रतिसाद देण्यात कोणी वेळ दवडू नये.
एग्जॅक्टली!

In reply to by धनंजय

मला हा पॅटर्न प्रकार कळला नाही. कुणी आपल्या मिपा कारकीर्दीची सुरवात कौलाने केली तर त्याचे सभासदत्व लवकरच आपोआप निकालात निघते असे तुम्हाला असे म्हणायचे आहे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

मलाही काही कळले नाही. जर एखाद्याने कौल ह्यावर पहिला लेख लिहिला तर त्याचे सभासदस्यत्व रद्द होईल का? असेच काही असेल तर (जमल्यास) नवीन सभासदांना काही विशिष्ट प्रकारचे लेखच लिहिणे (किंवा आधी प्रतिक्रिया देणे) असे बंधन घालावे. थेट सभासदसत्व रद्द करणे म्हणजे नवीन सभासदांना उगाच नाराजी वाटण्याचा संभव आहे.

In reply to by धनंजय

बाकी सदस्यांना काय वाटते? मला वाटते की नवीन सदस्यांना काही लिहायला सुचत नसेल , परंतु त्यांच्या मनात प्रश्न खूप असतील तर कौल सुरू करणे हा एक सोपा उपाय असू शकतो. माझ्या दृष्टीने मिपा सारख्या संस्थळांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ज्यांना लिहावेसे वाटते परंतु अनुभवाअभावी लिहीणे जमत नाही त्यांना लिहीते करण्याचा आहे.

>>एखद्या व्यक्तीस त्याला न पाह्ता त्याच्यावर प्रेम करने किती रास्त आहे. हा सरळ सरळ मुर्ख पणा आहे. वन नाईट मैटर म्हणुन ठिक आहे.

In reply to by सखाराम_गटणे™

हा सरळ सरळ मुर्ख पणा आहे. खरड फळ्यावर आपण सगळेच मुर्ख असतो रे वन नाईट मैटर म्हणुन ठिक आहे. पाणी तुंबले असल्यास ...मोरीचे बोळे काढणे .... (ह घे) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by सखाराम_गटणे™

वन नाईट मैटर म्हणुन ठिक आहे.
:O म्हणजे वन नाईट स्टँड, न बघताच???? काय झेपलं नाय राव... प्रत्यक्षात तो जर 'गिरिश' किंवा 'सर्किट' निघाला तर?

In reply to by कोलबेर

>>प्रत्यक्षात तो जर 'गिरिश' किंवा 'सर्किट' निघाला तर मला वाटते, हा प्रश्न असले बावळट प्रेम करणार्याचा आहे. जे लोक इन्टरनेट वर प्रेम करु शकतात त्यांच्या बद्दल काय बोलायचे?

In reply to by कोलबेर

प्रत्यक्षात तो जर 'गिरिश' किंवा 'सर्किट' निघाला तर? मग तो गिरिश किंवा सर्किटचा प्रश्न आहे.. ;) ( B) ) केशवसुमार

In reply to by केशवसुमार

खि खि खि! गिरीशचं माहित नाही..पण सर्किटराव तरी युनिवर्सिटी सर्कलवर गेले नाहीत... म्हणजे ते (एका रात्री पुरते तरी) इंटरेस्टेड नसावेत ;)

In reply to by कोलबेर

बरोबर ! आम्हाला लाँग टर्म कमिटमेंट हवी असते ;-) -- सर्किट

In reply to by केशवसुमार

सख्याला सॅनफ्रॅन्सिस्कोत हेट-ऍशबरी ला सोडून यावे म्हणतो एकदा. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बोगारवेस आहे की काय? ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

नाही, ही इथली "मैत्रनगरी" आहे. -- सर्किट

In reply to by मुक्तसुनीत

जो जे वांछील तो ते लाहो! ;) (खुद के साथ बातां : ह्म्म्म्म...माहिती अगदी ताबडतोब मिळाली. मुक्तराव बर्‍याच ठिकाणची सफर करुन आलेले दिसतात बरं रंगा! ;) चतुरंग

स्वतः काहीच न लिहिता नुसते कौल टाकणार्‍यांचा आम्हाला वैताग येतो... त्यावर मी काहीच प्रतिसाद देत नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कौलाला मतं दोन आणि प्रतिसाद बत्तिस?? 'प्रतिसाद पाडण्याचे १०१ राजमार्ग' ह्या पुस्तकाचे लेखक सदर विदावर लक्ष ठेउन असतीलच..

'प्रेम करावे' ला मत दिले आहे! :) आपला, (अंमळ प्रेमळ!) तात्या. :)

उगीच नंतर फसवणुक होण्यापेक्षा मैत्रीच ठेवलेली बरी!!! प्रद्युम्न- ॥एक अजेय योद्धा॥ चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते, उंच भरारी घेणा-याला आभाळाचे ओझे नसते.

उगीच नंतर फसवणुक होण्यापेक्षा मैत्रीच ठेवलेली बरी!!! प्रद्युम्न- ॥एक अजेय योद्धा॥ चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते, उंच भरारी घेणा-याला आभाळाचे ओझे नसते.

तुम्हाला शुद्ध मैत्री ठेवायची असेल, तर बघण्या- न बघण्याने काहीच फरक पडत नाही... हलक्या-फुलक्या गुजगोष्टींपासुन, ते आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयापर्यंत काहीही डिस्कस करु शकतो... कारण शुद्ध मैत्रीत शरीरापेक्षा मनाची गरज मोठी असते.. पण जेव्हा ही मैत्री प्रेमात रुपांतरित होऊ पाहते, तेव्हा मात्र सर्वांगीण विचाराची आवश्यकता भासते. कारण वरच्या काही प्रतिक्रियांमध्ये उल्लेखल्या प्रमाणे, आपण न पाहिलेल्या व्यक्तीचे खरे स्वरुप काय आहे, हे तपासणे महत्वाचे ठरते. कारण इतके दिवस आपल्या कल्पनेच्या चौकटीत, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला बसवलेले असते. आणि वास्तव जीवनात जेव्हा ही "प्रिय व्यक्ती" भेटते,,, तेव्हा "ही"कल्पनेची चौकट ९०% वेळेस, पार निखळुन पडते.. आणि भानावर आणते. अगदी रुप-रंग, जात-धर्माचा विचार जरी बाजुला ठेवला, तरी.. वय, शिक्षण, लिंग, मानसिक जडणघडण, इ. गोष्टी एकमेकांशी मिळत्या-जुळत्या असतीलच असे नाही. हां..... ज्यांना फक्त प्रेमातच / प्रेमाच्या कल्पनेतच बुडुन राहायचे असेल, त्यांची गोष्ट वेगळी आहे........ पण ज्यांना एकमेकांच्या आयुष्यात आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारिरीक सक्रिय सहभाग घ्यायचा असतो.....म्हणजे थोडक्यात सांगायचं, तर ""लग्न"" करायचे असते, त्या लोकांनी डोळे उघडे ठेउन घेतलेला निर्णय केव्हाही कल्याणप्रदच असतो.. कारण एखाद्या व्यक्तीला न पाहता आपण त्या व्यक्तीवर प्रेम करु शकतो, पण संसाराचा मार्ग स्वीकारताना आंधळे -पणाचे सोंग घेता येत नाही.. :-? आणि जर कर्म-धर्म- संयोगाने, अगदीच कुठे (दोन्हीकडुन ... योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी..)मटका लागलाच, तर आनंदच असतो.. अगदी "स्वर्गातुन निसटले अन् हातात येऊन पडले" अशी स्थिती होते. पण हे प्रसंग खूप कमी लोकांच्या आयुष्यात खूप कमी वेळेस येतात.. त्यामुळे प्रत्येकाने मन, (सद्सदविवेक)बुद्धी, दुरदृष्टी..... यांचा सर्वार्थाने विचार करुनच निर्णय घ्यावा. :)

In reply to by मृगनयनी

वय, शिक्षण, लिंग, मानसिक जडणघडण, इ. गोष्टी एकमेकांशी मिळत्या-जुळत्या असतीलच असे नाही. 'सर्व'गोष्टी मिळत्या जुळत्या नसाव्यात असे वाटते. एखाद्या व्यक्तीची 'ओळख' किती दिवसांत होते? माणसाचा स्वभावही वयपरत्वे बदलत असतो असे म्हणतात. एक विनोदः लग्न झाल्या नंतर बायको नवर्‍याला प्रत्येक गोष्टीत स्वभाव बदलायला लावते. तो बिचारा, तिचे मन राखण्यासाठी तिच्या मतांनुसार वागत जातो. काही वर्षांनी ती त्याला म्हणते,' तुम्ही काही पूर्वीसारखे वागत नाही माझ्याशी. तुम्ही पक्के बदलला आहात.' असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

>>'सर्व'गोष्टी मिळत्या जुळत्या नसाव्यात असे वाटते. अजुन त्या गोष्टीला भारतात परवानगी नाही. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

In reply to by मृगनयनी

पण हे प्रसंग खूप कमी लोकांच्या आयुष्यात खूप कमी वेळेस येतात..
खूप कमी वेळेस की एकदाच??? :O

In reply to by विकि

काय हो विकी राव, तुमचे तुमच्या देशावर प्रेम नाहि वाटतं!?.. कशावर / कोणावर प्रेम करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण प्रेम करावे हे नक्कीच -('मिसळ'लेला) ऋषिकेश

http://misalpav.com/node/3440 इथे प्रेमात पडल्याची लक्षणे या चर्चेत "फ्लश करायला विसरणे :हे लक्षण देणारे तज्ञ आहेत ते अनुभवी आहेत. कृपया त्यानी आपला अभ्यास नोंदवावा आणि माल्गदल्शन कलावे तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

In reply to by विजुभाऊ

आम्ही आमचे मत वर दिले आहे, कोणतीही वस्तु नीट पाहुन घ्यावी विक्रेत्यावर पुर्ण विश्वास ठेउ नये. * सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो * (सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)

:X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :X :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!