Skip to main content

आपण कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलेत?

लेखक भाई यांनी मंगळवार, 20/05/2008 11:30 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 3670
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

इगलिश स्कुलमधी शिकलो. इंगलिश भाषाच नोकरी देनारी आहे. फोनवर स्मुथ इंगलिश बोल्ता आल पाह्यजे. तर नोकरी मिलनार. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

१ ली ते ४ थी गुजराती माध्यम सुर्तेला मग ५ ते १० मराठी माध्यम खोडाल्याला. मग ११ वी dnanvardhini baswant college शापुरात. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

१ ते ४ थी जिल्हा परिषद शाळा मोखाडा (जि. ठाणे) ५ ते १० रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय मोखाडा (जि. ठाणे) ११ ते १५- केटिएचएम कॉलेज नाशिक (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

१ली ते ४थी - पुणे विद्यार्थी गृह, पुणे ५वी ते ७वी - ए एम आय [ऑल महाराष्ट्र इंस्टिट्युट], पुणे. ही शाळा लॉ कॉलेज रस्त्यावर आहे. आता नाव बदललेले आहे. ८वी ते १०वी - एम आय टी, पुणे. सेमी ईंग्लिश. एक दीड वर्षाचा असताना भिवंडिजवळ पडघे नावाचे गाव आहे, तेथे रहात होतो. वडिल भिवंडिला मराविमंमध्ये होते. तर पडघ्याला कॉन्हेंट बालवाडीत जायचो, एका चर्चमध्ये. पण नंतर पुण्याला आल्यानंतर मराठी शाळेत [बालवाडी] जावु लागलो. सुरवातीला मराठी [अबकड] काही समजायचेच नाही त्यामुळे झोपुन जायचो :) - संताजी धनाजी

शिशू वर्ग ते ४थी ब्राह्मण शिक्षण मंडळाचे, ब्राह्मण विद्यालय ठाणे. ५ वी ते १० वी पी. ई. सोसाईटीचे न्यू इंग्लिश स्कूल {संपूर्ण मराठी माध्यम (८- १० विज्ञान आणि बीजगणित सुद्धा) } ठाणे. आजही तेथील जुने शिक्षक भेटले की आनंद होतो....मलाही आणि त्यांनाही....{ म्हणजे दिसताच गल्लीत पळ काढणे, रस्ता ओलांडणे असे प्रकार दोन्ही बाजूनी घडत नाहीत :) } एच.बी. ठाणे

मराठीतूनच शिक्षण मॉण्टेसरी ते १० वी डॉ बेडेकर विद्या मंदिर ठाणे, मुलीला मराठी शाळेतच घातली आहे. (मोठेपणी नुकसान केले म्हणून शिव्या खायची तयारी ठेवली आहे). खराटा (रंग माझा वेगळा)