Skip to main content

नवरात्रीनिमित्त बरेच लोक रस्त्यावरून अनवाणी चालतांना दिसतात. यावर आपले मत काय?

नवरात्रीनिमित्त बरेच लोक रस्त्यावरून अनवाणी चालतांना दिसतात. यावर आपले मत काय?

Published on गुरुवार, 14/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1294
प्रतिक्रिया 26

केवळ बेरीज आणि वजाबाकी (म्हणजे स्पष्ट भाषेत 'कळणारा') वापरून एखादा लेख लिहिणार असाल तर मत देणे योग्य समजतो. ---------------------------------------------------------------------------- आम्हाला केवळ बेरीज आणि वजाबाकीच समजते, भागाकार आणि गुनाकारासाठी calculator वापरावे लागते. हा शब्द मिसळपाव वर इतकाच बोल्ड करता येतो अन्यथा अजून बोल्ड करण्याची इच्छा आहे.

In reply to by गांधीवादी

स्वतंत्र प्रतिसाद द्यायची जागा नाही म्हणुन इथे लिहित आहे. गैरसमज नको.. हा कौल काढण्यासारखा विषय आहे का? यावर आपले मत काय?

In reply to by प्रचेतस

-

In reply to by प्रचेतस

-

सुदैवाने भारतात रहात असल्याने अनेक जण आजु बाजुला अनवाणी दिसतात. तेव्हा नवरात्रीचा उत्सव चाललेला असतोच असे नाही. कामानिमित्त अनेक कामगारांशी (बागकामापासुन शेती किंवा अगदी गवंडी वगैरे सुद्धा) बोलणे होते तेव्हा काही जणांच्या पायात चपला असतात, काहींच्या नसतात, काही जणांच्या फाटक्या असतात. अनवाणी चालणे हा काही फार मोठा गुन्हा नाही. परिचितांमधे एक विशिष्ट पंथाचा अनुयायी आहे. जीवहत्या हे पाप मानत असल्याने तो अगर त्याच्या घरातील कुणीही बुट अथवा चप्पल कधीही वापरत नाही. प्रामाणिकपणे धंदा करुन(सुद्धा) करोडपती आहे. त्याच्या मानसिक धारणेची खिल्ली उडवणे मला योग्य वाटत नाही. त्याचे पाहुन त्याच्या पंथातले अनेक जण प्रामाणिकपणा आणि चप्पल्/बुट न वापरणे शिकले आहेत. हा काही फार मोठा गुन्हा नाही. भारतीय विचारधारेमधे सुख दु:ख एकसारखे मानुन आनंदात रहाणे हे श्रेयस्कर मानले गेले आहे. शारीरिक व्याधी /दु:खाकडे दुर्लक्ष करणे हे अंतिम ध्येय गाठण्याच्या अनेक पायर्‍यांपैंकी एक मानले जाते. अशा प्रकारे स्वतःहोउन त्रास सहन करुन मनाची त्रास सहन करण्याची क्षमता वाढवणे हे अनेक पंथांमधे योग्य मानले जाते. काही काळ अनवाणी राहुन पावलांना झालेली सुखाची सवय काही काळ मोडुन आनंदाने त्रास सहन करणे हे अनेकांना योग्य वाटते. असे योग्य वाटणे हा भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराचा भाग असुन भारतीय दंडसंहितेतल्या कुठल्याही कलमाचे उल्लंघन करणारे नाही. वैयक्तिकरित्या अशा काही गोष्टींचे मी आचरण करेल अथवा न करेल, पण किमान माझ्याबाजुने खिल्ली उडवणार नाही हे नक्की. बाकी चालु द्या !

In reply to by अवलिया

जीवहत्या हे पाप मानत असल्याने तो अगर त्याच्या घरातील कुणीही बुट अथवा चप्पल कधीही वापरत नाही अनवाणी पायाखाली किडा मुंगी आली तरी ती चिरडली तर जाणारच .... चप्पल असो व नसो....... कि "चपला" चामड्याच्या असतात..... म्हणून ते अनवाणी फिरतात?

In reply to by स्पा

अनवाणी चालण्यामागचा मुख्य हेतू चामड्याच्या चपला-बूट वापरू नये किंवा चामडे टाळणे हाच असावा. हे लोक चामडी पट्टाही नउ दिवस वापरत नाहीत. परीणामी बरेचसे अनवाणी असे पट्याऐवजी कमरेला नाडी किंवा दोरी बांधलेले असेही दिसतात. पण यातीलही बरेचसे लोक मात्र दसर्‍याला पशुबळी देतांना मी बरेचदा पाहीलेले आहे. जीवहत्या टाळणे हे प्रामुख्याने जैन धर्मियांत दिसून येते. तो विषयच वेगळा.

In reply to by अवलिया

जीवहत्या वगैरे ठीक आहे हो...पण अनवाणी रस्त्यातून चालल्यावर खाली लोक थुंकतात, कचरा असतो, घाण असते आणि काय काय ते पायाला नाही का लागणार? ते चालत असेल तर गोष्ट वेगळी...आणि गावात असे काही प्रकार मोठ्या प्रमाणावर नसतात (आणि धूळ भरपूर )त्यामुळे चालतं अनवाणी फिरलेलं...बाकी चालू द्या.

In reply to by शिल्पा ब

म्हणुनच पुर्वीपासुन बाहेरुन आल्यावर पाण्याने स्वच्छ हात पाय धुण्याची पद्धत होती. आधुनिक ज्ञान संपादनाच्या धावपळीत अनेकांना या साध्या पण अतिशय परिणामकारक उपायाची विस्मृती झाली आहे. हल्ली शौचास जाऊन आल्यावर हात पाय धुणे तसेच शौचासाठी पाण्याचा वापर करणे कमीपणाचे समजले जाते याची आपल्याला कल्पना असेलच. [अवांतर - व्यवहारात वापरल्या जाणार्‍या चलनाच्या नोटा, कागदांची देवाण घेवाण, ग्रंथालयातुन आणलेली पुस्तके, एकमेकांशी हस्तांदोलन करणे या सर्व माध्यमांतुन जिवाणु/ विषाणु यांचे संक्रमण होते का आणि त्याचे एकुण संक्रमणाशी असलेले तुलनात्मक प्रमाण यांचा अभ्यास कुणी केला आहे का यावर माहिती मिळाली तर बरे होईल. अर्थात अशा प्रकारे आपण अनेक मुद्दे काढुन माणसाने एकमेकांना भेटणे सुद्धा अपायकारक आहे हे सिद्ध करु शकतो. पण ते तितकेसे योग्य नाही असे मला वाटते]

In reply to by अवलिया

(कु)प्रसिद्ध चित्रकार श्री. म.फि. हुसेन यांना अनवाणी असल्याबद्दल एका अतिश्रीमंतांच्या साहेबी क्लबाने प्रवेश नाकारला होता याची आठवण झाली. पाश्चिमात्य संस्कृती(?)च्या आहारी गेलेल्या या जगात अनवाणी चालणे यासारख्या सहज आणि नैसर्गिक कृतीवर इतका वाद होणे स्वाभाविकच आहे. तेव्हा चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटते हा कौल अनवाणी चालण्यासंदर्भात नसून "नवरात्रीनिमित्त बरेच लोक रस्त्यावरून अनवाणी" चालण्यावरून आहे... ;)

In reply to by शिल्पा ब

शिल्पाताईंशी सहमत. मुंबईसारख्या ठिकाणी तर अनवाणी चालणे म्हणजे त्वचारोग, लेप्टोस्पायरॉसिस वगैरेंना आमंत्रण देणेच आहे. त्याशिवाय लोकांनी रस्त्यात टाकलेले खाकरे, बेडके हे पायाला लागणारच. कदाचित रत्यावर पडलेल्या बुळबुळीत कंडोमवरुन घसराल सुध्दा! यावरही श्रध्दा मात करत असेल तर कायमच अनवाणी चालावे.

In reply to by अवलिया

प्रामाणिकपणे धंदा करुन(सुद्धा) करोडपती आहे. त्याच्या मानसिक धारणेची खिल्ली उडवणे मला योग्य वाटत नाही. माझ्या मते, करोडपती नसला तरी मानसिक धारणेची खिल्ली उडवू नये. बाकी प्रामाणिकपणा कालसापेक्ष आहे, हे माझे मत आहे. एकेकाळी आमचेही एक परिचित प्रामाणिकपणे धंदा करायचे, असा वहीम होता.

In reply to by मिसळभोक्ता

मा... ... ता.
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत...

In reply to by मिसळभोक्ता

>>>माझ्या मते, करोडपती नसला तरी मानसिक धारणेची खिल्ली उडवू नये. वरील माझ्या वाक्यांमधे तो करोडपती आहे म्हणुन खिल्ली उडवु नये असा भाव नाही/ नसावा. आपल्या वाक्याशी मी सहमत आहे आणि हेच माझे अनेकांना सांगणे आहे. असो.

जे सश्रद्ध आहेत त्यांनी हे केले तर समजू शकतो. काही जण निर्जळी उपवास वगैरेसुद्धा करतात किंवा मुसलमान लोकदेखील थुंकीसुद्धा गिळायची नाही इतका कडक असा रमजानचा उपवास ठेवतातच. जी बंधने स्वखुशीने स्वतःवर लादून घेतली आणि ती बंधने जे लोक कडकपणे पाळतात त्यांच्या निष्ठेचे, श्रद्धेचे, शिस्तीचे कौतुक वाटते. पण कित्येक लोक 'घटं भिंद्यांत, पटं छिंद्यांत, कश्चित गर्दभारोहणं | येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषः भवेत ||' अशा वॄत्तीने स्वतःच्या धार्मिक वृत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करतात. त्या वॄत्तीची किळस येते.

In reply to by अप्पा जोगळेकर

मिपाचालकांनी या धाग्याला स्वतंत्र प्रतिसाद देणे अशक्य केले आहे... आणि आडवी टांगच मारायची तर पहिल्याच प्रतिसादाला का मारू नये? तेंव्हा श्री आप्पा जोगळेकर, त्रिवार क्षमस्व!!! बाकी, नवरात्रीनिमित्त बरेच लोक रस्त्यावरून अनवाणी चालतांना दिसतात. यावर आपले मत काय? आमचे मत...समाजात बरेच लोक येड*वे आहेत!! आमेन!!!

मत! प्रेषक पिवळा डांबिस दि. रवी, 17/10/2010 - 09:36. मिपाचालकांनी या धाग्याला स्वतंत्र प्रतिसाद देणे अशक्य केले आहे... हा बघा नविन प्रतिसाद. >>आमचे मत...समाजात बरेच लोक येड*वे आहेत!! आणि उरलेले ?

नवरात्रीनिमित्त काही लोक अनवाणी चालतात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. मला कधी कधी अनवाणी चालावे वाटते. गवतातून, नदीच्या पात्रातील वाळूतून, मंदिराचे दर्शन घेतांना. वगैरे इत्यादी ठिकाणी. -दिलीपबिरुटे