Skip to main content

९/११ ला पाडलेल्या उत्तुंग इमारतींच्या जागेवर, आता अमेरिकी सरकार मशीद बांधण्याचा विचार करीत आहे.

लेखक सुनील यांनी सोमवार, 16/08/2010 00:19 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1539
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by पंगा

सरकार भले मशीद न बांधो (धर्मनिरपेक्ष सरकारने कोणतेही धार्मिक बांधकाम करू नये (म्हणूनच सोमनाथच्या पुनर्बांधणीस पं नेहेरूंचा विरोध होता) अर्थात विरोधी पक्षियांनी कुठलेही धार्मिक बांधकाम पाडू नये, हे ओघाने आलेच, पण ते तूर्तास सोडा!) मशीद प्रत्यक्ष सरकार बांधणार नाही परंतु, तसा प्रस्ताव आल्यास विरोध करणार नाही, अशी बातमी आहे.

In reply to by सुनील

उसातले सरकार ही आपल्या सरकार सारखे रीकामटेकडे झाले की काय???????????? मशीद काय कींवा कुठलेही पुजास्थ्ळ तिथे बांधु नये

In reply to by रश्मि दाते

हे काय ओबामा म्हणे हनुमान भक्त वगरै आहे असं कुठे तरी वाचल / ऐकल होत !!! ;) http://josh18.in.com/hindi/news-news-/238741/0 http://in.jagran.yahoo.com/news/oddnews/general/15_35_1540.html मग तिथे तर बजरंगबलीचे मंदीर व्ह्यायला हवे ना !!! ;) ओबामांच्या या दुटप्पी वागण्याचा निषेध !!! ;) (राम भक्त)

In reply to by मदनबाण

ह्या ज्यात्या देश्याच्या सरकारचा व नागरिकांचा प्रश्न आहे. त्यासाठी भांडण्यात काही अर्थ नाही. बाकी मला मश्चिदी पेक्षा तिथे एकादा दर्गा बांधला तर आनंद होईल.कारण दर्ग्यात सर्वधर्माच्या लोकाना आरामात जाता येते.

In reply to by वेताळ

दर्ग्याच्या बाजूला एक वेतोबाचे मंदिरदेखिल बांधावे! काय म्हणता? बाकी, दर्गा हे खास भारतीय उपखंडातील मुस्लिमांचे वैशिष्ठ्य आहे. अन्यथा इस्लामात दर्ग्याला स्थान नाही.

In reply to by वेताळ

नुसति मशीद न बांधता..मंदिर..स्तुप..चर्च..जैन मंदिर..गुरुद्वारा....असे बांधावेत त्या मुळे सर्व धर्म सहभाव राखला जाईल...

In reply to by सुनील

मशीद प्रत्यक्ष सरकार बांधणार नाही परंतु, तसा प्रस्ताव आल्यास विरोध करणार नाही, अशी बातमी आहे.
सरकारने विरोध नेमक्या कोणत्या आधारावर करावा? ('आणि कशासाठी?' हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू.) (नुकतेच थोडेसे वाचले त्यावरून ज्या ठिकाणी मोठी मशीद / इस्लामिक सेंटर बांधायचे चाललेले आहे, त्या इमारतीत अगोदरही एक छोटेसे मुस्लिम प्रार्थनास्थळ होते, मान्यताप्राप्त होते असे दिसते. म्हणजे झोनिंगचे कायदे तर आड येऊ नयेत. मग अन्य कोणता आधार राहिला?)

In reply to by पंगा

९/११ ला पाडलेल्या उत्तुंग इमारतींच्या जागेवर
"जागेवर"??? की "जागेपासून जवळ"??????

In reply to by पंगा

सुरुवातीला आलेल्या (सबसे तेज) बातम्यांनुसारे हे "मॉस्क अ‍ॅट ग्राउंड झीरो"" असे होते. आता तसे नाही हे कळले, ते ठीकच! परंतु, मूळ मुद्दा तो नाही. काही तासांपूर्वी ५६% असलेला "अन्य" ह्या पर्यायाचा कल आता वाढून ५८% वर गेला आहे. ही किंचित का होईना पण सुधारणाच म्हणायची!

In reply to by सुनील

मतदान अजूनही चालूच असल्याने टक्केवारीच्या तात्कालिक वाढीस अथवा घटीस काही महत्त्व नाही. उर्वरित पर्यायांस आणखी मते पडल्यास टक्केवारी घटूही शकते. किंबहुना या क्षणी ती घटून ५२% झाली आहे असे दिसते. 'इतर' या पर्यायास मते देणार्‍यांच्या संख्येत वाढ झालेली आहे हे उत्साहवर्धक आहे असे कदाचित म्हणता येईलही. पण याही म्हणण्यात प्रत्यक्षात कितपत तथ्य आहे याबद्दल साशंक आहे. या म्हणण्यात केवळ कौलात भाग घेऊन उघडपणे तसे म्हणणार्‍यांचा विचार केलेला आहे, हा मुख्य आक्षेप दिसून येतो. कौलात ज्यांनी भाग घेतलेला नाही, त्यांपैकी 'इतर'व्यतिरिक्त कोणतेही एक मत असून गप्प बसलेल्यांची बहुसंख्या नाही, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. तेव्हा, आनंद साजरा करण्याची घाई करण्याआधी कोंबड्या मोजण्यापूर्वी त्या अंडी फोडून बाहेर येण्याची वाट पाहण्याची खबरदारी निदान मी तरी घेईन म्हणतो. शिवाय, 'इतर' हा पर्याय निवडणार्‍यांच्या कारणमीमांसांमध्येही प्रचंड वैविध्य असू शकते, आणि त्यातील सर्वच कारणमीमांसा उत्साहवर्धक असू शकतात असे नाही, याही बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो. ('इतर' हा त्या दृष्टीने 'कॅच-ऑल' पर्याय आहे.) हे वैविध्य लक्षात घेता, 'इतर' हे खरे तर अनेक पर्याय आहेत, आणि या अनेक पर्यायांत 'इतर'पंथीयांची मते विभागली गेल्याने पहिल्या दोन पर्यायांपैकीच कोणाच्या तरी समर्थकांचे प्रभावी मत असण्याची शक्यता असून 'इतर'पंथीयांचे बहुमत फसवे आहे, हेही मांडू इच्छितो. (हे थोडेसे भारतातील १९७७पूर्व राजकीय परिस्थितीसारखे झाले. पन्नास टक्क्यांहून कमी मते (की जागा? चूभूद्याघ्या.) मिळूनही, विरोधी पक्षांची मते (किंवा जागा) वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेल्याने सर्वाधिक मते (किंवा जागा) मिळवणारा गट म्हणून सत्ता तेव्हा सतत काँग्रेसकडे जात असे, असे ऐकलेले आहे. (पुन्हा, ऐकीव माहिती. तपशिलांबाबत चूभूद्याघ्या.) यावर उपाय म्हणून १९७७मध्ये 'जनता पक्षा'चा जो प्रयोग झाला, त्याचे पुढे काय झाले, हे सर्वज्ञात आहे.)

In reply to by पंगा

जे मतदानात भाग घेतात त्यांच्याच मतांची नोंद घेतली जाते. जे घेत नाहीत त्यांच्या मतांकडे दुर्लक्षच होते. ही निवडणूकांची मर्यादा आहे.

In reply to by सुनील

कसली टक्केवारी मोजताय? मी पा हे काय अखिल मानव जातीची किमान पक्षी मराठी लोकांची मानसिकता दाखवत नाही...

फक्त मशिद नाही, ५ मजली इस्लामिक सेंटर बांधायला स्थानिक प्रशासनानं परवानगी मिळाली आहे, त्यात मशिदीचाही समावेश आहे. ही जागा ९/११ ला पाडलेल्या इमारतींपासून २ ब्लॉगवर आहे. ओबामानं शुक्रवारी पाठिंबा दिला होता आत्ता म्हणतोय की ते मी फक्त कायदेशीर दृष्टीकोणातून बोललो होतो; ते काही माझं मत नाहीये. href="http://www.telegraph.co.uk/news/worldnews/northamerica/usa/barackobama/7946770/Barack-Obama-backtracks-over-Ground-Zero-mosque-support.html" title="obama"> तुमचे पहिले २ पर्याय फारच टोकाचे आहेत त्यामुळे 'अन्य' ला मत दिलं आहे

In reply to by पुष्करिणी

पुष्करिणीशी सहमत. शिवाय नवीन लिहीता येत नसल्याने येथे प्रतिसाद लिहीत आहे. सर्व प्रथम वरील कौलातील वाक्ये चुकीची आहेत असे वाटते. त्यामुळे गैरसमज होऊ शकतो. इस्लामिक सेंटरसाठी म्हणून देण्याच्या निर्णयामधे सरकार येणार नाही आहे. याचा अर्थ अमेरिकी सरकार मशीद बांधण्याचा विचार करत आहे असा घेणे म्हणजे गैरसमज आहे. तसेच हे "९/११ ला पाडलेल्या उत्तुंग इमारतींच्या जागेवर," हे देखील चुकीचे विधान आहे. अर्थात त्यात सुनील यांचा दोष नाही, त्यांनी इंग्रजी शिर्षकात जे म्हणले जाते, (मॉस्क अ‍ॅट ग्राउंड झीरो) त्याचे भाषांतर केले आहे. वास्तवीक या इस्लामिक सेंटरची जागा, ग्राउंड झीरोपासून साधारण दोन ब्लॉक्स (गल्ल्या) लांब आहे. न्यूयॉर्कचे महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी पहील्यापासून पाठींबा दिला आहे. ओबामांचे वक्तव्य हे केवळ मुस्लीमांना हक्क आहे का नाही या संदर्भातील होते. आणि त्यांचे म्हणणे होते की त्यांना हक्क आहे (right to freedom of religion) असेच होते. मला वाटते मायकल ब्लूमबर्ग यांचा पाठींबा पण याच (कायद्याच्या) संदर्भातूनच असावा, जरी ते तसे स्पष्ट म्हणत नसले तरी. ही मागणी मान्य करण्याचा हक्क हा नाधड ब्लूमबर्गना आहे ना ओबामांना. त्यासाठी (त्याभागाच्या पुनर्विकासासाठी) समिती आहे आणि त्या समितीपुढे पब्लीक हिअरींग होत आहेत आणि ती समिती निर्णय घेणार होती/आहे... वास्तवीक हे धार्मिक आततयीपणामुळे झाल्याने येथे अशी मागणी करणे हे गैर वाटते. हे जर आधी धार्मिक स्थळ नसले तर आता करायची गरज नाही.

काय रश लिम्बाहशी बोलत होता का? व आधी तो फॉक्सन्युज चॅनेल बंद करा पाहू ;-)

काय फरक पडतो? तिथे मशीद, मंदीर, चर्च, पोस्ट ऑफीस, बाग, स्मशानभूमी किंवा खड्डा काहीही असल्याने काय फरक पडेल?

In reply to by ऋषिकेश

खड्डा बांधण्याची कल्पना आवडली.

In reply to by पंगा

तिथे आत्ता सध्या एक मोठ्ठा खड्डाच आहे.

सपशेल चूक असलेल्या, दिशाभूल करणाऱ्या वा आत्यंतिक पूर्वग्रहदूषित (एका विशिष्ट धर्माच्या लोकांचा नायनाट करण्यास अनुमती मागणाऱ्या) लेखनावर लेखकाच्या सुदैवाने बंदी नाही असं दिसतंय. पण म्हणून ते करावंच असंही नाही. एखादं स्फोटक विधान स्वतः न करता ते कौलाच्या पर्यायात घालणं हे मिपाच्या धोरणांत बसत नसावं असं मला वाटलं असतं. अमेरिकन सरकार मशिदी, चर्चेस, देवळं वगैरे बांधत नाही. त्यांनी चुकून बांधलं असेल तरी ते चूक म्हणण्यासाठी मुस्लिमांचा नायनाट करण्यास सहमत होण्याची गरज नाही. तुमच्या लेखनात बिटवीन द लाईन्स वाचलं तर 'मुस्लिमांचा नायनाट झाला पाहिजे, (अमेरिकन) सरकार त्यांना मतांसाठी लांगुलचालन करते (काहींची अन्य मतेही असतील)' अशी विधानं वाटतात. मिपाचं धोरण काहीही असलं तरी माझ्या मते अशी हीन विधानं मिपावर शोभत नाहीत.

In reply to by राजेश घासकडवी

+१००% सहमत.. दिलेले पर्याय फारच अतिरेकी आहेत! 'विशिष्ट धर्मीयांचा नायनाट व्हावा ' यासाठी कौल मागणे अतिशय हिन आहे.. मिपासारख्या संस्थळावर हे नक्कीच शोभून दिसणारे नाही!! ह्या कौलाचा तीव्र निषेध!!

In reply to by राजेश घासकडवी

१०००% सहमत.. असले धागे उडवले का जात नाहीत? मगाशी एकेठीकाणी पीपली लाइव वरून एका वाचकाने प्रतिक्रिया दिली होती "खानाचा कोथळा काढा"... आता ह्यावर काय बोलणार?

नागपंचमीच्या सुमारास जरा डिवचावे, बघू किती नाग डिवचले जातात, अशा विचाराने हा कौल टाकला होता. पर्यायांची रचनाच अशी केली, की "अन्य"ला पर्याय नसावा! जवळपास ५६% मंडळींना माझे पहिले दोन पर्याय "अतिरेकी" वाटले. परंतु हा आकडा फारच कमी (अपेक्षेपेक्षा) आहे. ३६% मंडळींना दुसरा तर ८% मंडळींना पहिला पर्याय निवडला, हे भयावह आहे. काही जुन्या आणि जाणत्या मंडळींना माझे पर्याय अतिरेकी वाटले तरी, ती माझी मते नाहीत, हे ठाऊक आहे. नव्यांना ते ठाऊक नसावे, हे साहजिकच! तो त्यांचा दोष नव्हे! @ नीलकांत आणि चमू, ह्या कौलाच्या निमित्ताने लक्षात आलेली एक तांत्रिक बाब. अन्य लेखनप्रकारात शेवटचा प्रतिसाद शेवटी येतो, हे ठीकच. पण कौलात हा क्रम उलटा होतो. हे चुकून झाले आहे की मुद्दामहून केले आहे?

In reply to by सुनील

शुक्रवारी मिळालेल्या खुलाशानुसार काही बदल ड्रुपल अपग्रेड करताना आपोआप/चुकून झाले आहेत. मुद्दाम केलेले नाहीत. इथे दाखवलेल्या बदलासारखीच स्वसंपादन नाहीसे होण्याची गोष्ट घडली आहे. मुद्दाम केलेली नाही. ते दुरुस्त करायला वेळ लागू शकतो.

In reply to by सुनील

काही जुन्या आणि जाणत्या मंडळींना माझे पर्याय अतिरेकी वाटले तरी, ती माझी मते नाहीत, हे ठाऊक आहे. मी स्वतःला किमान येथे "जुना" नक्की म्हणू शकेन ;) आणि त्यामुळे कौलातील टोकाची मते सुनील यांची नाहीत हे नक्कीच माहीत आहे. फक्त येथील सदस्यांना ते नाग समजतात, हे त्यांचे मत मला नव्यानेच समजले. :-)

i think hindus should appeal USA govt. for constructing Ram mandir at the place where 'masjid' is proposed near ground zero.. if they dont agree, then Advani should arrange 'Rathyatra' from delhi to newyork!

कायदेशीररित्या अशी मशीद बांधता येते का नाही यापेक्षा ह्या जागेच्या इतक्या जवळ अशी मशीद बांधण्याचे औचित्य आहे का याचा संबंधित व्यक्तींनी दयाळू बुद्धीने विचार करावा. ज्या धर्माचे नाव घेऊन, ज्या धर्माच्या शिकवणुकीचा दाखला देऊन हा हल्ला केला गेला त्याच धर्माचे प्रार्थनास्थळ, कार्यालय वगैरे ( जो त्या देशात आज तरी अल्पसंख्य आहे) हे अनुचित वाटते. ज्यांचे नातेवाईक त्या काळ्या दिवशी जळून खाक झाले, तर कुणी इतक्या उंचावरून उड्या मारून आपले जीवन संपवते झाले, जे त्या अपहृत विमानात होते त्यांना असले प्रार्थनास्थळ बघून काय वाटेल? मला वाटते जखमेची खपली काढून त्यावर मीठ चोळल्यासारखे वाटेल. एक सांगितले पाहिजे की ९/११ चा हल्ला हा अमेरिकन सरकारचेच कारस्थान होते ही काही लोकांची लाडकी थियरी आहे. ती मला आजिबात नामंजूर आहे. अमेरिकन सरकार गलथान, ढिसाळ, बेसावध होते पण खुनशीपणाने असा हल्ला ते घडवून आणणार नाहीत याची खात्री आहे. सर्वसामान्य मुस्लिम अतिरेकी नसतात पण आपल्या धर्माचे नाव घेऊन असला अतिरेकी प्रकार करणार्‍या लोकांना आम्ही थांबवू शकलो नाही ह्याची जाणीव म्हणून संबंधित मुस्लिम लोकांनी ही योजना बदलून दुसरीकडे मशीद बांधावी. (निदान १० मैल तरी दूर असावी). समजा इथे मशीद बांधता आली नाही याचा अर्थ मुस्लिमांना त्यांचा धर्म अनुकरण्याची, प्रार्थना करायची मुभा नाही असे होत नाही. कित्येक मशीदी आणि कित्येक लाख मुस्लिम अमेरिकेत सुखाने रहात आहेत. प्रार्थना करत आहेत, रोझे पाळत आहेत, आपल्या धर्माची आपापल्या आवडीप्रमाणे उपासना करत आहेत.

In reply to by हुप्प्या

एक सांगितले पाहिजे की ९/११ चा हल्ला हा अमेरिकन सरकारचेच कारस्थान होते ही काही लोकांची लाडकी थियरी आहे. ती मला आजिबात नामंजूर आहे. अमेरिकन सरकार गलथान, ढिसाळ, बेसावध होते पण खुनशीपणाने असा हल्ला ते घडवून आणणार नाहीत याची खात्री आहे. काही अमेरिकन नागरिकांच्या मते हा इन्टर्नल जॉब आहे. सगळ्यांनी ट्वीन टॉवर पडताना पाहिले, आणि त्यावरच सगळीकडे भाष्य केल गेल पण...टॉवर ७ पडला झटक्यात्...तेही कुठलेही विमान न आदळता...म्हणे त्या बिल्डींग मधे सरकारची अनेक महत्वाची कागदपत्रे होती,एनरॉन भ्रष्टाचाराची व इतर अनेक घोटाळ्यांची कागदपत्रे देखील होती. सगळी स्वाहा झाली... बाकी खालचे व्हिडीयो जरुर पहा:---

ओबामा सरकार कदाचित निश्‍चित करू इछिते की पुढच्या वेळी हल्ला करताना तेथे मशीद असल्याची terrorist दखल घेतील आणि कदाचित हल्ला करणार नाहीत. स्वता च्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा एक चांगला उपाय सरकारने काढला आहे असे वाटते मशीद बांधणे म्हणजे तेथे बनणार्‍या इमारतींसाठी एक security.

In reply to by जासुश

मुस्लिमांकरता सगळ्यात आदरणीय जी काबा मशीद आहे तिथे १९७९ साली अतिरेकी वहाबी लोकांनी हल्ला करून ती बळकावली होती. त्यांचा नायनाट करता करता सौदी सरकारच्या नाकी नऊ आले होते. लाज वाचवायला फ्रेंच एलीट फोर्सेस बोलवले. घाईघाईने त्यांना नावापुरती मुस्लिम धर्माची दीक्षा देऊन त्यांच्या मदतीने ह्या अतिरेक्यांचे पारिपत्य केले. जिथे मुस्लिम अतिरेकी काबा मशीदीवर हल्ला करु शकले तिथे ग्राऊंड झिरो मशीद किस खेत की मूली?

हॉटेल बांधा त्यापेक्षा. सगळेच खूष. हॉटेलात पाहिजे तर टाका वेगवेगळ्या धर्मांची प्रार्थनास्थळे!! मोठ्या विमानतळांवर असतात तशीं. न्युयॉर्कचा एखादा रहेजा/लोधा तशी आयडिया सांगेलच त्यांच्या सरकारला. --