Skip to main content

राहूल गांधींच्या लोकल प्रवासाचे कारण काय असावे?

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 06/02/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1288
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

खरं कारण माहीत नाही, पण "सामना" आणि इतर वृत्तपत्रातल्या ह्या मुंबई भेटीवरच्या बातम्या वाचून अंमळ करमणुक झाली! :)

आमचे मत २, ४ आणि ५ ह्या सर्व मुद्द्यांना. -- बंड्या.

आबांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर्र.. बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी बातें होती रहेती है! (डी.डी.एल.जे. मध्ये पण कोणीतरी अस्सेच म्हणते का ओ?) ====================== कोकणी फणस कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं, कधीकधी वाटतं की काही वाटू नये, नंतर वाटतं की जाऊ देत! वाटण्या ऐवजी सरळ.. मिक्सरमधूनच काढावे!!

ते खासदार आहेत..त्यांना रेल्वे प्रवास फुकट असताना तिकिट काढायचे काय प्रयोजन?

In reply to by अविनाशकुलकर्णी

त्यांनी बहुतेक त्यांच्या सुरक्षारक्षकांचे टि़कीट काढले असावे. ;) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मला सगळ्यात वाईट वाटले ते "यूथ काँग्रेस"चा मुखिया कुणी साळवी हिंदीत बोलला त्याचे. साले सगळे एक नेंबरचे कणाहीन व चमचे झालेत! कुठे गेलाय् तो मराठी बाणा देव जाणे. आपलंच नाणं खोटं, तर कोण मदत करणार आपल्याला? ३ नं.ला मत दिले. १ नं. नक्की नव्हे! ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया! (जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)

२ असावे पण ५ असण्याची शक्यता अधिक म्हणून ५ ला मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शिवसेनेने निदर्शनाचा जो आराखडा केला होता त्याची गुप्त्चर खात्याला माहिती मिळाली, आणि शिवसेनेच्या निदर्शनाला घाबरुनचं त्यांचा मार्ग बदलला. रमेश बागवेंच्या राहुल गांधीचे जोडे उचलण्याचे कारण काय असावे?

शिवसेनेने निदर्शनाचा जो आराखडा केला होता त्याची गुप्त्चर खात्याला माहिती मिळाली, आणि शिवसेनेच्या निदर्शनाला घाबरुनचं त्यांचा मार्ग बदलला. रमेश बागवेंच्या राहुल गांधीचे जोडे उचलण्याचे कारण काय असावे? निखिलराव ( आम्ही महा १२ चे )

बाळासाहेब, उद्धव व राज (व स्मिताताई) या समस्त ठाकर्‍यांनी २६/११ च्या वेळी दडी मारून आपली इज्जत घालविली असे मला फार वाटते. अगदी एक जणही घरातून बाहेर कां नाहीं आला? वाईट वेळेला कामाला येतो तोच नेता लोकांचे मन जिंकतो. इथे मात्र अगदी उलटं झालं. उरली-सुरली इज्जत घालविली त्यांनी. याबाबत एक कौल घ्यायला हवा! ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया! (जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)

In reply to by सुधीर काळे

बाळासाहेब, उद्धव व राज (व स्मिताताई) या समस्त ठाकर्‍यांनी २६/११ च्या वेळी दडी मारून आपली इज्जत घालविली असे मला फार वाटते. अगदी एक जणही घरातून बाहेर कां नाहीं आला? वाईट वेळेला कामाला येतो तोच नेता लोकांचे मन जिंकतो. इथे मात्र अगदी उलटं झालं. उरली-सुरली इज्जत घालविली त्यांनी. १००% सहमत...! -दिलीप बिरुटे

हा एक पब्लिसिटी स्टंट होता. ह्याला मत दिले आहे. गेल्या काही दिवसांत भाषेच्या नावाखाली पब्लिसिटी स्टंट चालूच होते.भाषेचा/राज्याचा अपमान कोणी केला नसतानाही "अपमान झाला" म्हणून उरबडवेगिरी चालू होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा स्टंट होता. भेंडी P= NP

२, ३, ४ ह्या पर्यायांना मत देत आहे. पण जरीही ते लोक शिवसेना घाबरली किंवा पोपट झाला असे म्हणतात, तर शिवसेनेने फक्त काळे झेंडेच दाखवणार हे सांगितले होते. घाबरट काँग्रेसवाल्यांनी त्यांना पकडून नेले तर त्यांचाही जोर वाढला असे मला वाटते. तसेच राहूल गांधी आणि काँग्रेसवालेही घाबरले हेच दिसते, कारण त्याचे ४ पैकी २ कार्यक्रम रद्द केले की. (कार्यपूर्ततेचे प्रमाण ५० % च झाले की ;) )

असं काहीही झालेलं नाही .संपूर्ण मिडीया कांग्रेस धार्जिणी असल्यामुळे हे होतय.खास करून लोकसत्ता. कुमार केतकरांना तर गांधी घराण्याविषयी जरा जास्तच आपुलकी असल्याचं त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. राहुल गांधींनी आयत्या वेळी लोकलने प्रवास केल्यामुळे त्या वेळी बाकीच्या प्रवाशांना किती त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला (झेड सिक्युरिटीमुळे) याची मिडीयाने काहीही दखल घेतलेली नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by श्रीयुत संतोष जोशी

शिवसेनेचा पचका झाला हे आपण मान्य का करीत नाही ? >>राहुल गांधींनी आयत्या वेळी लोकलने प्रवास केल्यामुळे त्या वेळी बाकीच्या प्रवाशांना किती त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला अहो, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तर म्हणाले होते ना की, राहूल गांधीनी सामान्य माणसात मिसळून दाखवावे. आता ते सामान्य माणसात मिसळले तर त्यांच्या प्रवासामुळे प्रवाशांना किती त्रास झाला असा शोध लावण्यात काय मजा नाही. मला तर शिवसेनेची खूप दया येत आहे. बरं त्यांच्या पोकळ धमक्या वाचल्या की हहपुवा होते. असो, चालायचच...! -दिलीप बिरुटे

अर्थात संदेश माझ्यापर्यंत अजुन पोचलेला नाही..श्री. राहूल गांधी जर आयुष्यभर रेल्वेनेच फिरला तर मी त्याचे जोडे उचलायला तयार आहे.

पर्याय २ला मत दिले आहे. आणि ते योग्यच आहे हे या बातमीवरुन सिद्ध होते आहे...काय पण आव आणतात काँग्रेसवाले सर्वसामान्यांचे कैवारी असल्याचा.......? http://72.78.249.125/esakal/20100207/5032972353388880678.htm "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

बातमी खरी असावी असे म्हणायला वाव आहे. कॉंग्रेसने लावलेल्या जाळ्यात उद्धव ठाकरे आणि त्या खालोखाल राज ठाकरे अलगद सापडले म्हणायचे. 'इटालियन मम्मी/पाय ठेवून दाखवाच/लग्न झाले नसल्याने मानसिक तोल गेला आहे' अशी भाषा वापरुन बाळासाहेब/उद्धव ठाकरे ह्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतला होता.अमराठी लोकांत महाराष्ट्राबाहेर आपण अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला मदत करतो आहोत ह्याचे भानही त्यांना नव्हते.काँग्रेसला नेमके हेच पाहिजे होते. भेंडी P = NP

चला मुरारी हिरो बनने... और क्या?