Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२

लेखक निनाद यांनी मंगळवार, 01/02/2022 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
किशन भारवाडचा खून - आरोपी सब्बीर आणि जमालपूर येथील मौलाना. अहमदाबाद जिल्हा रहिवासी असलेल्या किशन भारवाड यांची २५ जानेवारी रोजी धंधुका तालुक्यात दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. किशनजी घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सब्बीर, इम्तियाज आणि जमालपूर येथील मौलाना अयुब जावरवाला यांनी यापूर्वी मे २०२१ मध्ये पोरबंदर येथील रहिवासी साजन ओडेदरा याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोरबंदरमध्ये तो सापडला नाही. एटीएसचे एसपी आयजी शेख यांनी सांगितले की, किशन भारवाडच्या हत्येप्रकरणी मौलाना कमरगानी उस्मानी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका फेसबुक पोस्टमुळे किशन भारवाडची हत्या करण्यात आली आहे. एका बैठकीत कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे. त्यामुळेच कमर गनीच्या सांगण्यावरून या दोन्ही आरोपींनी किशन भारवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वाचने 20853
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by sunil kachure

हे नक्की का? आपण इतके अगाध ज्ञान कुठुन मिळवता?

काही उदाहरणे आणि मग तुम्हीच निष्कर्ष काढला तर उत्तम. १) हिंदू धर्माच्या अंध श्रद्धा निर्मूलन करतो म्हणून श्रद्धा वर हल्ला . मुस्लिम करत आहेत की दुसरेच २) मध्ये पुण्यात किंवा बाकी ठिकाणी कॉलेज मध्ये सत्य नारायण ची पूजा घातली त्याला विरोध मुस्लिम लोकांनी केला की विरोध करणारे दुसरेच होते ३)भारताची प्राचीन उज्ज्वल परंपरा ,विविध वास्तू शिल्प,विविध विषयावर प्राचीन ग्रंथात दिलेली माहिती. हे सर्व बकवास आहे खोटे आहे . असे लेबल कोण लावत मुस्लिम लावत नाहीत दुसरेच लावत असतात .त्या मुळे प्राचीन ज्ञान वर भारतात सखोल अभ्यास होत नाही. युरोपियन राष्ट्र तो अभ्यास करतात. ४) भारताची कुटुंब व्यवस्था,लग्न संस्था ह्या वर मुस्लिम आक्षेप घेत नाहीत घेणारे दुसरेच आहेत. हे दुसरेच छुपे पण धोकादायक आहेत . ते कोण हे तुम्ही शोधा

पुण्यामध्ये शिवसैनिकांचा किरीट सोमय्यवरती हल्ला, कल सौम्यांनी राऊता वर आरोप केले आणि आज लगेच हल्ला केला. राज्यातल्या सत्ताधारी पक्षाची उघड उघड गुंडगिरी चालू आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

आता बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही अशी तक्रार कोनी करू शकनार नाही. :) मारहाणीचा निषेध!

In reply to by रात्रीचे चांदणे

आता बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही अशी तक्रार कोनी करू शकनार नाही. :) मारहाणीचा निषेध!

राजकीय वाद हे गुंडगिरी ,मारहाण ह्याच्या मध्ये परावर्तित होवू नयेत . ही संस्कृती राज्यात बिलकुल फोफावली नाही पाहिजे सरकार नी दोषी व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करावी.. आरोपी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असतील तरी.

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://marathi… हा ऐतिहासिक निर्णय आहे.देशात मेडिकल शिक्षण भयंकर महाग झाले होते. हुशारी आहे पण पैसे नाहीत म्हणून अनेक मुलांची डॉक्टर होण्याची स्वप्न पूर्ण होत नव्हती भारत अनेक भावी दर्जेदार डॉक्टर ना मुकत होता.

In reply to by sunil kachure

फिशींग अलर्ट देतेय आमची विषाणु प्रतिरोधक यंत्रणा.... Bedrohung gesichert Wir haben die Verbindung zu marathi.abplive.com sicher abgebrochen, da die Seite mit URL:Phishing infiziert war Wir können auch Sie von anderen Arten von Bedrohungen schützen. UPGRADE FÜR IHREN SCHUTZ DURCHFÜHREN Details anzeigen 8b9431882293/220206.0751+01000

'भारताची घटना नव्याने लिहिण्याची गरज आहे' असे ते तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हटले म्हणून बरे झाले. हेच जर एकाद्या भाजपाशासित राज्याचा मुख्यमंत्री अथवा नेत्यांने म्हटले असते तर कॉंग्रेससहित सर्व लिब्बू लोकांनी, भाजपा विरोधात जमिन आस्मान एक केले असते. मात्र असे स्टेटमेंट एका लिब्बूने दिले असल्याने, 'चोर चोर, मौसेरे भाई' या उक्तीप्रमाणे सध्या सर्व लिब्बू गप्प आहेत.