सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174667
प्रतिक्रिया
559
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिथे स्वतः लिहिलेल्या प्रतिक्रिया ते वाचत नाहित
In reply to त्यांनी इतिहास वाचलेला नाही... by मुक्त विहारि
सर्वोच्च न्यायालय ची सरकार ला जोरदार फटकर
दुवा?
In reply to सर्वोच्च न्यायालय ची सरकार ला जोरदार फटकर by Rajesh188
चांगली बातमी.
In reply to दुवा? by अनन्त अवधुत
बरोबर आहे स्थगिती देण्यास च सांगितले आहे
मी घाईत भविष्य वर्तवले.
In reply to बरोबर आहे स्थगिती देण्यास च सांगितले आहे by Rajesh188
पुढे काय घडेल
आता बसला ना
In reply to पुढे काय घडेल by Rajesh188
पुढें काहिही होणार नाही
In reply to पुढे काय घडेल by Rajesh188
हेच म्हणतो...
In reply to पुढें काहिही होणार नाही by भंकस बाबा
ह्या क्षेत्रात कंपन्या बिलकुल नकोत
स्वतःची बुध्दी किती गहाण ठेवावी
स्पष्ट विचारतो राजेशभाऊ
In reply to स्वतःची बुध्दी किती गहाण ठेवावी by Rajesh188
शेती मध्ये नुकसान आहे असे म्हणणार नाही पण फायद्याची शास्वती नाही
In reply to स्पष्ट विचारतो राजेशभाऊ by भंकस बाबा
हम्म्म
In reply to शेती मध्ये नुकसान आहे असे म्हणणार नाही पण फायद्याची शास्वती नाही by Rajesh188
रिपब्लिक टीव्ही
मला वाटतं
शेतकरी कायद्याला स्थगिती ? - ब्रेकींग न्यूज.
दिलीप बिरुटे
In reply to शेतकरी कायद्याला स्थगिती ? - ब्रेकींग न्यूज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेतकरी हरले ? सरकार जिंकले ?
In reply to दिलीप बिरुटे by Rajesh188
आंदोलक हरणारच आहेत कारण ते
In reply to शेतकरी हरले ? सरकार जिंकले ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजी
In reply to आंदोलक हरणारच आहेत कारण ते by श्रीगुरुजी
आज वृत्तवाहिन्या व
In reply to शेतकरी कायद्याला स्थगिती ? - ब्रेकींग न्यूज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मानसिकता कधी बदलणार
सरकारने शेतकऱ्यांची गेम केली आहे
हांय
In reply to सरकारने शेतकऱ्यांची गेम केली आहे by कपिलमुनी
आज शेतकरी कसे गुलाम बनतील त्या साठी कायदे केले
पुढे ...
In reply to आज शेतकरी कसे गुलाम बनतील त्या साठी कायदे केले by Rajesh188
एक साधा प्रश्र्न आहे.
शेतकरी संघटनांबरोबरील आजची
आता पुढे....
सध्याच्या व्यवस्थेला धक्का न
In reply to आता पुढे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दहा हजार ध्वज!
In reply to आता पुढे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बघुया पुढे काय होत आहे ते
जेव्हा विरोधी पक्ष सुद्धा
In reply to बघुया पुढे काय होत आहे ते by Rajesh188
बरेच जण केवळ श्री मोदी
इतकं कि
In reply to बरेच जण केवळ श्री मोदी by सुबोध खरे
नवीन मुंबई पुणे द्रुतगती
योग्य उदाहरण
In reply to नवीन मुंबई पुणे द्रुतगती by सुबोध खरे
ट्रक्टर मोर्चा
छे हो
In reply to ट्रक्टर मोर्चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधी ह्याच शेतकरी कायद्या बाबतीत, शरद पवार, सहमत होते
In reply to छे हो by सुबोध खरे
CAA मुळे नागरिकत्व जाईल
+१००
In reply to CAA मुळे नागरिकत्व जाईल by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to CAA मुळे नागरिकत्व जाईल by सुबोध खरे
केंद्र सरकार एक पाऊल मागे
केंद्र सरकारने स्थगिती दिली
वाईट वाटलेच पण
In reply to केंद्र सरकारने स्थगिती दिली by मुक्त विहारि
माझे एक साधे तर्कशास्त्र आहे .....
In reply to वाईट वाटलेच पण by राघव
स्थगितीचा प्रस्ताव फेटाळला.