चल रे माठ्या कर मतदान
देशावरती पुन्हा गि-हाण.. !
नको खाजवू
तुझे डोके
व्यवहार यांचे
पेटी खोके
आतून समदे
एक सारखे
कशाला करतो
विचार इत्का
मिटून डोळे
मार तू शिक्का
भाड मे जाए रे हिंदुस्थान
चल रे भाड्या कर मतदान !
देशावरती पुन्हा गि-हाण !!
फसव्या आघाड्या
फसव्या युत्या
आपणच साले
आहोत चूत्त्या
मतं न देशिला
तर लागेल पाप
दिले तरी बी
हायेच शाप
लोकशाही चे
हे दुधारी हत्यार
आपलीच मान
आपलीच तलवार
ठेव बुद्धी तू , तुझी गहाण
चल रे माठ्या कर मतदान
देशावरती पुन्हा गि-हाण..!
आता कसले तुझे शोषण
इथे तर आहे कुपोषण
होण्या आधी गावं स्मशान
चल रे मढ्या कर मतदान
मगच मर तू खुशाल गुमान
चल चल बाबा कर मतदान
देशावरती पुन्हा गि-हाण..
बोला..पुंडलिक वरदा हारी विठ्ठल !
इटंबना इटंबना
संसदेची इटंबना
इटंबना इटंबना
लोकशाहीची इटंबना
लोकशाही झिंदाबाद
आम जनता बरबाद.. हौ !!!
याद्या
2449
प्रतिक्रिया
3
लेखनविषय:
मिसळपाव
झणझणीत
जबरदस्त -------
जबरदस्त आहेर!