अरे याला कुणी मत देणार का मत ?
ह्या तुमच्या लोकनायकाला
दिल्लीत राहून सेवा करणार्या
ह्या गरिबांच्या कैवार्याला
कुणी मत देणार का मत ?
खूप पक्ष सोडले
खूप पैसे लाटले
खूप काहीच्या काही केलं
आणि सत्तेतल्या राक्षसाला
सारखं भ्रष्टाचाराच व्यसन लागलं.
बिच्चार्या ह्या राक्षसाला
कुणी मत देणार का मत ?
खातं गेलं, घर गेलं,
रुबाब गेला,गाडी गेली
आता मतदारसंघही बदलतोय
पाच वर्षात न दिसलेल्या
या भिकार्याला
कुणी मत देणार का मत ?
निष्ठेला टोपी घातली
सुखी माणसाची वाट लावली
मंदीतही उधारीच चालली
कामांची तर वाट लावली
स्वप्नातही खुर्ची पाहणार्या
ह्या सत्तापिपासुला
कुणी मत देणार का मत ?
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2058
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाच वर्षात
निष्ठेला टोपी घातली.
मतदान
In reply to निष्ठेला टोपी घातली. by दत्ता काळे
भारी
In reply to मतदान by प्रकाश घाटपांडे
छान कविता
मस्त