देवशयनीच्या रात्री
पेंगलेला माझा विठू
म्हणे," झोपू दे रे मला
कार्तिकीला आता भेटू"
"भोळ्या भाबड्यांची माथी
पायी घेतो टेकवून
त्यांचे नवस भाबडे
जाती कान कोंदवून"
"सगुणाचा हाच पेच
त्याचा ताण येतो घोर
कसे देऊ त्यांना सांग
काही थातूरमातूर?"
"रखुमाई रुसलेली
सल्ला देत नाही मला
चातुर्मासी शयनाचा
मार्ग म्हणून सुचला"
"आता कार्तिकी पावेतो
योगनिद्रेत जाईन
प्रबोधिनीच्या मुहूर्ती
पुन्हा कामाला लागेन"
सगुणाची बेडी विठो
कधीची रे मी तोडिली
शयनी वा प्रबोधिनी
दोन्ही एक मला झाली
| लेखनविषय: |
|---|
वाचने
90
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली.
कविता आवडली.
सुप्त मनातली प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया.....
खुपच छान.
कविता आवडली...
सगुणाचा हाच पेच
त्याचा ताण येतो घोर
कसे देऊ त्यांना सांग
काही थातूरमातूर?"
सगुणाची बेडी विठो
कधीची रे मी तोडिली
शयनी वा प्रबोधिनी
दोन्ही एक मला झाली
सगळीच कविता आवडली. पण हे दोन विशेष आवडले.