मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्रिमितीच्या तुरुंगात

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
त्रिमितीच्या तुरुंगात घुसमटे जीव ज्यांचा उघडीन त्यांच्यासाठी मार्ग चवथ्या मितीचा कळसा नंतर पाया तिथे नियम असतो कार्यकारण भावाचा जाच जराही नसतो स्थळ-काळात तिथल्या पेव खाच खळग्यांचे उतरवी वर्तमान भूत वेडे भविष्याचे दोर परतीचे मात्र नाही कापणार नक्की आपापल्या कोठडीची खूण ध्यानी ठेवा पक्की :)

वाचने 993 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 14:01
शेवटची दोन कडवी समजली,आणी आवडली सुद्धा. पण बाकी कवीता समजली नाही. श्रीधर फडके यांनी ग्रेसांच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला.पण पुढील कडवी समजली नाहीत. ग्रेसांचा व त्यांचा परिचय नव्हता म्हणून ते सुधीर मोघ्यांकडे गेले. त्यांनी सोपे करून दाखवले. https://youtu.be/Ikx26HFj_SM?si=sdn-l2uFSf7haigV अगदी तसेच माझे झाले म्हणून तुम्हीच उलगडून सांगा म्हणजे कवीतेचा अस्वाद घेता येईल.

In reply to by कर्नलतपस्वी

अनन्त्_यात्री Tue, 06/10/2025 - 19:05
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! हे मुक्तक लिहिताना wormholes in space-time हा विषय डोक्यात होता. ह्या संकल्पनेचे सुलभ मराठीत स्पष्टिकरण मी देऊ शकत नाही पण: Many physicists postulate that wormholes are merely projections of a fourth spatial dimension. Also, Wormholes have the theoretical potential to disrupt causality, meaning the natural order of cause and effect could be violated.