Skip to main content

(स्त्री मन)

लेखक नाना चेंगट यांनी गुरुवार, 17/05/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/21683 वळवळण्याने तिच्या जाग आली मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके वळवळायला?' शिरली अलगद केसात माझ्या, लागली कचकचून चावायला, कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला, थापटून डोक्याशी थोपटले किंचीत इथे तिथे, राहिचना, शेवटी मस्त खाजवून डोक्यावर, थोपटले जरा मानेवर, जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . . .'अग! डोक्यात उवा झाल्यात माझ्या, शिकेकाईने जरा घासून दे'..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2039
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कूरकूरण्याच्या मूळे त्रास झाला मला, जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके कूरकूर करायला?' अलगद घेतले मी तिला हातात, उघडून बघू लागलो मी तिचे अंग न अंग. द्रव पदार्थ तर होता व्यवस्थित. तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो, . . . . . .'अग! नीबच तूटलय ह्या पेनाची,जरा नविन नीब आणायला पैसे दे'..