जरी वाटेल माझे बोलणे (गझल)
लेखनविषय:
जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला
हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला
मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला
जगाशी भांडल्याने आपले होते हसे
जगालाही मजा येते जशी येते तुला
जसा हा चंद्र आकाशी बदलतो वागणे
तसे आकाश त्या बदल्यात बोलवते तुला ?
महागाई किती प्रेमातही बघ वाढली
तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला
मला तू सोडले आहेस नाही खंत ही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला
मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला
वाचने
1735
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
>> महागाई किती प्रेमातही बघ वाढली
तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला >>
मस्त!!!
सुरेख गझल.
वा! छान आहे. शेवटचा शेर आवडला.
मस्त...
मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला
कोण बरे ?

छान आहे गझल आवडली
शेवटचा शेर मस्तच !
छान झाली आहे गझल.
सुरेख गझल !
सर्वांना मनापासून धन्यवाद!
>> महागाई किती प्रेमातही बघ