मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमपत्र

दिलीपकुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेमपत्र पहिले तिचे , सर्व काहीं सांगत होते. आतुरलेल्या भावनांना , शब्द्फुलांनी सजवले होते. सजवलेला प्रत्येक शब्द , फुलाप्रमाणे भासत होता . अवखळ तिच्या नखरयापरी, मनामध्ये ठसत होता . पत्र जेंव्हा वाचुन झाले , आनंदाला उधाण आले . तिच्या मधुर प्रेम वर्षावाने, मनात प्रेमचांदणे खुलले . पत्र तिला लिहिण्यासाठी , हात माझे सळसळले . पेन घेतला , कागद घेतला , मग मला जाणवले . पत्र तिला लिहीण्यापुर्वीच , शब्द सारे थिजुन गेले . सुरवात , शेवट तिचीच घेतली , मजकुर फक्त माझा होता . " आय लव यू " पण तो सुध्दा तिच्या पत्रात , दिमाखात झळकत होता .

वाचने 1408 वाचनखूण प्रतिक्रिया 0