रुळ
लेखनविषय:
हातात हात
घेवुन आम्ही चालायचो
ती एका रुळावर पाय ठेवायची अन्
मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो
तोल संभाळत
चालत असतांना बोलत असतांना
असंच आयुष्यातही संभाळायचे
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
करिअरच्या रुळावरुन
कधीतरी तिची गाडी निघुन गेली
मी मात्र मारत आहे त्याच रुळांवरुन
शटलसारख्या चकरा... टर्मिनस टु टर्मिनस.
वाचन
6898
प्रतिक्रिया
0