Skip to main content

नात...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
जसं अतूट नातं असतं पाऊस आणि छत्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! अंगरख्याच्या आत असतं मुलायम अस्तर जरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं हळुवार बंधन असतं श्रावणाशी सरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं नातं लाटांचं किना-याशी खात्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं

वाचने 2342
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

चांगली आहे कविता.. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु