या धाग्यामधे फक्त सुरु करुन देण्याचं निमित्त झालोय म्हणून मी धागाकर्ता. अन्यथा माझा सहभाग या धाग्यात वाचक म्हणूनच असेल असा बेत आहे.
पावसाची तर्हा जरा अत्रंग आहे. हा रोमँटिक गुदगुल्या करता करता मधेच लपविलेला बडगा दाण्णकन हाणायला कमी करत नाही. गालगुच्चा घेतल्यासारखं करुन पाठोपाठ कानशिलात लाफे लगावणारा पाऊस मुंबईत आणि कोंकणात दिसतो.
मुंबईकरांच्या मनात पावसाची गंमत जाऊन दहशतही बसली आहे एव्हाना. पाऊस आला की सक्काळी सक्काळी उठून आधी इमारतीखाली किती इंच पाणी झालंय हे पाऊल बुडवून बघायचं, मग त्या लेव्हलवरुन लोकल चालू असेल की लोचे झाले असतील हा अंदाज बांधायचा आणि परत जिना चढून आपापल्या घरात घुसून टीव्ही बघत बसायचं.. असेही दिवस येतात.
हा धागा "पावसातले आपण" या विषयावरच आहे. आणि सर्वांसाठी आहे. याचा उपयोग (?) आपापले पावसात अडकल्याचे, किंवा पावसामुळे हपीसातून सुटल्याचे, किंवा पावसात कटिंग चहात पाणी मिसळून तो गार झाल्याचे, किंवा छत्तीस तास अडकून पडल्याचे असे कोणतेही अनुभव इथे सर्वांना सांगण्यासाठी...!! सोबत चालू पावसाचे किंवा पूर्वी कधी काढलेले पण कायमची आठवण बनलेले पावसाचे फोटोही लिंकवावेत.
हे फक्त मुंबईसाठी अर्थातच नाही..
ज्या प्रदेशांत सध्या पावसाळा नाही, किंवा जिथे बारमाही पावसाळाच असतो, किंवा जिथे वर्षभरात मिळून पावसाचा थेंबही पडत नाही अश्या सर्व भागात आपले मिपाकर मेंबर राहत असू शकतील. आपापल्या जवळचा पाऊस सर्वांना भेटायला इथे आणा. फोटोसकट किंवा नुसत्या शब्दांनी.. अगदी बर्फवृष्टीसहित सुद्धा...
अगदी पावसाची वॉर्निंग देण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, तुम्ही कुठे अडकून पडला असाल तर इतरांना सावध करण्यासाठी आणि त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर वेळ घालवण्यासाठी हे पान आपल्या मोबाईलवर बुकमार्क करुन ठेवता येईल..

वाचने
5452
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास. आता एक चहाचा, एक
का बरं इतका तिडिकीने दिलेला प्रतिसाद ??
In reply to झक्कास. आता एक चहाचा, एक by मृत्युन्जय
कोण म्हणतय सौदि अरेबियामध्ये
आं? कमाल आहे.
In reply to कोण म्हणतय सौदि अरेबियामध्ये by डॉ सुहास म्हात्रे
हे नेहमीचे नाही, फार क्वचीत
In reply to आं? कमाल आहे. by काकाकाकू
अरेच्या
In reply to हे नेहमीचे नाही, फार क्वचीत by डॉ सुहास म्हात्रे
वाळवंटातली वाळू आणि त्या वाळूचा पाऊस !!!
In reply to अरेच्या by काकाकाकू
साठलेल्या पान्यात होड्या
In reply to कोण म्हणतय सौदि अरेबियामध्ये by डॉ सुहास म्हात्रे
मस्त धागा!
या धाग्याचे जन्मदाते का दिसत