Skip to main content

मोह

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 04/12/2017 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
मंद धुंद ही हवा... सहवास तुझा हवा हवा.. नितळ कांतीवरील दवातून.. ओघळू दे गंध नवा! पहाट वारा... सरसर काटा.. नयन पुष्पे अर्धोन्मलीत ती.. कोकीळ कंठी माळ अडकली; युगुल कबुतरे मूक होती! मोहक कटीवर घट्ट मिठी अन्.. कुंतलात त्या मन बहकले! नव यौवना तू.. मोहक.. सुंदर.. सूर्य किरणांनाही मोह पडे!
काव्यरस

तुलना

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 04/12/2017 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा विमानावर शिटला तुच्छतेने, म्हणून विमानाच्या गर्वात कमीपणा येत नाही. त्याचा वेग, त्याचा डौल, त्याचा झपाटा कमी होत नाही. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एका दमात जाण्याची कावळ्याला खाज मिटवता येऊच शकत नाही. त्याच्या साठी समाधानाची गोष्ट म्हणजे तो दुसऱ्याच्या मनाचा ताबेदार नसतो....! समीर...

बिघडणारा मिक्सर (शतशब्दकथा )

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 03/12/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
"काका आहात का आत?" अस म्हणत मी काकांच्या घरात शिरलो. तर काका नेहमीप्रमाणे मिक्सर दुरुस्त करत बसले होते आणि काकू कधी मिक्सरकडे तर कधी काकांकडे करूण कटाक्ष टाकात होत्या. "काका तुम्हाला आधीपण म्हणालो होतो माझ्या अोळखीचा एकजण आहे , त्याकडे द्या दुरुस्तीसाठी " "राजे तुम्ही जन्मला ही नव्हता तेव्हा डिप्लोमा केला आहे मी. बघ कसा चालू होतो.." इति काका त्याच दिवशी संध्याकाळी काका , काकू आमच्याकडे चावी देऊन बाहेरगावी गेले. मी संधीचे सोने करत गुपचूप मिक्सर दुरुस्त करून ठेऊन दिला. दुस-या दिवशी बघतो तर काका मिक्सरला घेऊन बसलेले..

पुणे ते लेह (भाग ४ - शाहपुरा ते जम्मू)

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 03/12/2017 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते लेह (भाग ३ - शामलजी ते शाहपुरा) २७ ऑगस्ट आज सकाळी ७:१५ ला चंदीगडला जाण्यास निघालो. तसे मध्यरात्री पण निघू शकलो असतो. कारण मध्यरात्रीच्या २:३० पासून मी जागाच होतो. अनोळखी ठिकाणी मला बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. यावर काही उपाय ? जरी चंदीगड फक्त ४६० किमी असले तरी वाटेत आम्हाला पानिपतजवळ काला आम्ब ह्या ठिकाणी पानिपत युद्धाचे स्मारक बघायला जायचे होते. राष्ट्रीय महामार्ग ८ वरून प्रवास सुरु झाला. आज वातावरण फारच उदासवाणे वाटत होते. हवेत प्रचंड धूळ आणि धुके होते. ह्या महामार्गाचा जयपूर ते दिल्ली भाग तितकासा खास नाही.

शंका/समाधान.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 03/12/2017 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
शंका/समाधान. * या विशाल अवनी वर्ती, प्रशांत सागर वसतो त्यास भेटण्या सरिता का धावते जणू अभीसारीका? * त्या लाल कमल पुष्पात गोड मकरंदाची रेलचेल आत भ्रमर कैद होतो रात्री तिथेच का रमतो? * गगनात चंद्रमा हसतो धवल प्रकाश पसरतो ते मनोहर दृश्य बघुनि का सागर उफाळतो? * ति फुले रंगी बेरंगी मादक रस गंधाने फुलती. त्या रान पुष्पा वरती.. का भ्रमर असा घुटमळतो? * त्याच्याच नाभी कमलांत कस्तुरी गंध दरवळतो तरीही तो कस्तुरी मृग का शोध घेत फिरतो? * असे कितीक गोड प्रश्न का सतावतात मजला? या शंकांचे समाधान कधी होईल का मजला?? * अश्याच एका कातरवेळी भेटलास तू सजणा तनूत वीज कल्लोळली स्पर्शाने काया मोहरली * घेतलेस मज मिठीत च

रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 03/12/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. आपल्याला कर्करोग का होतो?

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 03/12/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी.

कविराज

लेखक गबाळ्या यांनी रविवार, 03/12/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

रोज रोज

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 02/12/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज -- कथा ( काल्पनीक ) "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली . या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा .