Skip to main content

मामाच्या गावच्या आठवणी

लेखक सत्य धर्म यांनी मंगळवार, 09/03/2021 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. सकाळी सकाळी मुलीने मोबाइलला हे गाणे लावले आणि डोळयांपुढे मामाचा गाव उभा राहिला. माझ्या लहानपणी माझ्या मामाचे गाव म्हणजे माज्यासाठी जणु स्वर्गच होता. उन्हाळ्याची सुट्टी, गणपती आणि दिवाळीची सुट्टी याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत राही. मामाच्या गावावरून आल्यानंतर माझ्या मित्रांमध्ये तिथले वर्णन आठवडाभर चालत राही. माझ्या मामाचे गाव म्हणजे रहिमतपूर असं म्हणतात कि अफझल खानचा सरदार रहिमतखान याच्या नावावरून याला रहिमपूर नाव पडले.

दातही होते, दाणेही होते...

लेखक आजी यांनी मंगळवार, 09/03/2021 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी रेडियोवर नोकरी करत असतानाची गोष्ट. मी माॅर्निंग ड्यूटी करत होते. मी पहाटे चार वाजता उठले. माझं आवरलं. सासूबाईंना बाय करुन आणि झोपलेल्या मुलाचं पांघरूण नीट करुन, पावणेपाचला मी माझी कायनेटिक सुरू केली. अर्ध्या रस्त्यात आले आणि लक्षात आलं की डबा घरीच राहिलाय. परत जाणं शक्य नव्हतं. साडेपाचला ट्रान्समिशन ओपन होणार होतं. त्याआधी मटेरियल चेक करायचं होतं. मी कायनेटिक चा स्पीड वाढवला आणि ऑफिसला पोहोचले. कामाला सुरुवात केली. फक्त एक कप चहा पिऊन मी घरातून निघालेली होते. खूप काम होतं. सकाळी नऊ वाजता कोपऱ्यावरच्या चहावाल्याकडून चहा आणि वडापाव मागवला. प्यून सांगत आला चहा तयार होता.

चेरी इन द ब्रेड

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 09/03/2021 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची वेळ. घरातले दुध संपल्यामूळे मी दूध पिशवी आणायला शेजारच्या बेकरीकडे निघालो. जाताना " मी पन येणार!" अशी गर्जना सुपुत्राने केली. अशा गर्जनेनंतर आमाच्या सुपुत्राला नेणे भागच पडते. दुकानात सुपुत्र विस्फारलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पहात होतेच "पप्पा , ते काय आहे ? " चेरीच्या एका पाकीटाकडे बोट दाखवत माझा मुलगा विचारता झाला. " अरे चेरी आाहे ती. ब्रेड खाताना तू वेगळी काढून खात नाही का ? तीच ती. " मी उत्तरलो. " पण पप्पा ती तर ब्रेडमद्धे तयार होती ना ? आणि तीपण कशीबशी सापडते. या काकांना कितीतरी ब्रेड पॅकेट मधून ती चेरी काढली असणार ना ?

महिलादिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 08/03/2021 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
हे वेगवेगळे दिन थोतांड वाटतात, पटत नाही, जर प्रकृती पुरुष एकमेकांना पुरक मग एकाचाच उदोउदो का। माणसाने माणसा सारखे वागावे एवढीच अपेक्षा महिलादिन दाखवण्याचे दात वेगळे जगण्याची ऱीत आगळी जागतीक महिलादिनी मोजा किती आसवं गळली किती चढल्या बोहल्यावरी किती ठरल्या हुंडाबळी असल्या कसल्या रितीभाती कधी तुडवे पायतळी तर कधी घेई डोईवरी सारे दिवस थोतांड उद्दमींचे कुभांड तुबंडी भरण्यासाठी एक दिवसांचे खोटे पण नको दिन नको सण रावा माणसागत सारे नको उत्सव दिनांचा मला माझी जागा द्यारे...... ८-३-२०२१
काव्यरस

महिलादिन

लेखक nanaba यांनी सोमवार, 08/03/2021 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ती आपली भाकरी स्वतः कमवेल. (ते करत नसतानाही ती त्या भाकरीच्या किमतीहून अधिक कष्ट घरात घेत असते ह्याची जाणीव तिला असेल.) ती साडी नेसेल वा मिनी स्कर्ट घालेल. ती लग्न करेल वा करणारही नाही. तीला मुलं नको असतील किंवा कदाचित तिला लग्न नको असेल - पण मुले हवी असतील - तो तिचा निसर्गदत्त अधिकार आहे असेही तिला वाटत असेल. ती डे सेलिब्रेट करेल वा न करेल. ती दागिने घालेल वा तिला त्यांचा तिटकारा वाटेल. ती सणांसाठी पाळी पुढे ढकलणे नाकारेल.. तिला देवाधर्माची खूप आवड असेल आणि त्यापुढे संसार तुच्छ वाटत असेल किंवा कदाचित तिचा देवावर विश्वास नसेलही... तिला कदाचित घरकामाची तितकीच आवड असेल जितकी तुम्हाला..

मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती

लेखक व्लॉगर पाटील यांनी सोमवार, 08/03/2021 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मावळातील बेडसे बुद्ध लेणी - का आणि कशासाठी? संपूर्ण माहिती आपल्याच मि. पा. च्या ग्रुप मध्ये असलेलले आमचे मित्र कपिल कुलकर्णी (कपिलमुनी) यांनी काही दिवसापूर्वी "प्रचेतस" यांची "प्राचीन भारतः बेडसे लेणी" हि लिंक वाचायला दिली आणि बेडसे लेण्यांचा एक विडिओ बनवण्यास सुचवलं होत. मग काय गेल्या आठवड्यात त्या ठिकाणाला भेट देण्याचा योग्य आला आणि आपल्या सर्वासाठी हा सविस्तर माहिती चा व्हिडीओ घेऊन आलो. पुण्यापासून जवळपास ५७ कि मी अंतरावर असलेली बेडसे बुद्ध लेणी. मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत येथून तिकोना किल्ला किंवा काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे.

तो होता तरी कोण? (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 08/03/2021 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे.               तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही.

ती

लेखक आर्णव यांनी रविवार, 07/03/2021 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवी गर्द वनराई, भोवताली पर्वत रांगा ते भिरभिरणारे पक्षी, ती संथ प्रवाही गंगा डोळे भरून पाहताना, ते स्मरणी साठवताना मज ती अचानक दिसली, विवस्त्र स्नान करताना भोळी आदिवासी अबला, स्वच्छंद तिच्या जल क्रिडा ना भोवतालची जाण, संकोच, भीती ना पीडा सौंदर्य मिसळले होते, सृष्टी ने तिच्या यौवनात कोलाहल होता उठला, माझ्या अस्थिर मनात क्षण मोहाचा सामोरी, क्षण नाजूक परी अघोरी क्षण लपवणे ही चोरी, क्षणात पाटी कोरी क्षणभर गढूळ झालो मी, ती क्षणाचीच कसोटी क्षणी भानावर ज्या आलो,तो क्षण किमती कोटी कोटी त्या दिवशी पर्वत, वारा, व्योम, सूर्य अन पाणी हे सर्व तिला पाहून, विरक्त राहीले होते मग मी ही विलीन झाल