Skip to main content

बकलावा

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2बकलावा नाव ऐकलं, तर सर्वसाधारणपणे काय येते डोळ्यासमोर? पण हे मध्यपूर्वेतील एका मिठाईचे नाव असून ती अतिशय स्वादिष्ट असते, हे समजल्यावर तिचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. बकलावा म्हणजे मध्यपूर्वेतील एक पक्वान्न. हा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. म्हणजे मूळ कृती एकच, पण आकार वेगवेगळे. बकलावा ज्याने एकदा खाल्ले त्याला वेड लावते, अशी माहिती मिळाली. एका मैत्रिणीने तुर्कस्थानातून आणलेला बकलावा खाल्ल्यावर याचे प्रत्यंतर आले.

पिट्सबर्ग

लेखक अभिजीत अवलिया यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 अल्लेघेणी, मोनोन्गहेला आणि ओहिओ अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेले अमेरिकेतील एक अतिशय सुंदर शहर म्हणजे पिट्सबर्ग. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या स्टीलशी संबंधित उद्योगधंद्यांमुळे पिट्सबर्गला 'स्टील सिटी' आणि शहरात असणाऱ्या तब्बल ४४६ पुलांमुळे 'सिटी ऑफ ब्रिजेस' अशी बिरुदावलीदेखील दिली गेलेली आहे. आज जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक गणले जाणारे पिट्सबर्ग दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मात्र एक अतिप्रदूषित शहर बनले होते. ह्याचे कारण म्हणजे युद्धकाळात वाढलेली स्टीलची गरज.

सिनेमावाला विज्या

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 "विज्या, आज कॉप्या पुरवता नाही येत आपल्याले" मी धावतच सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या विज्याच्या गँगला सांगितले. "कोण अडवते बे आमाले?” पोरे माझ्यावरच ओरडली. "थांबा बे पोट्टेहो." विज्याच्या एका आवाजात पोरे चूप. त्याने त्याच्या बच्चन कट केसातून हात फिरविला, डाव्या हाताने मानेवरचे केस उडविले, विडीचा धूर सोडला आणि मला विचारले, "पण काहून बे बारक्या?" "मास्तर सांगत होता, आज इन्सपेक्टर येनार हाय." "पोलीस" विज्या हलकेच हसला.

बघतो जिकडे तिकडे दिसती ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 बघतो जिकडे तिकडे दिसती मनातले ना कळणारे कळता सुखात असतो हल्ली नशिबावर जळफळणारे .. संधी साधत जगती येथे त्यांच्या पदरी यश पडते अचूक वेळी संधीचा ते वारा बघुनी वळणारे .. शब्द मधुरही कानी पडता टपके लाळ तोंडातुनी पिकल्या पानी मनात हिरवळ आढळती पाघळणारे .. प्रामाणिक राहून ते जरी करती काम इमानाने पाठी लागत असती त्यांच्या काही काही छळणारे .. ताव मारती टाळूवरच्या लोण्यावर मेलेल्याच्या मिरवत असती सभेस दावत नक्राश्रू घळघळणारे .. द्वेष असो वा कौतुक अपुले स्थितप्रज्ञ असती काही व्यथा मांडता समोर

पुरंदराचं तेजस्वी पातं!

लेखक राघव यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 मुरारबाजींचं व त्यांच्यासमवेतच्या सर्व मावळ्यांचं अतुलनीय शौर्य म्हणजे एक दीप्तीमान तुरा आहे स्वराज्यगाथेतला! त्यातून प्रेरणा न मिळालेला मराठी माणूस विरळाच. त्याच शौर्याचं वर्णन करायचा एक अल्प प्रयत्न. त्यांना शत-शत नमन. _/\_ कफन बांधुनी आलेला.. कफनातच गेला.. शत्रूचा आवेशही गळला.. कफनातच मेला.. संख्येची ना तमा तयाला..आता वज्राघात! हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं! असंख्य शस्त्रं जेथे थकली.. ते शब्दांनी झालं खानाच्या बोलांनी काळीज अंगारून आलं.. उफाळला तो त्वेष पुरंदरी..

पाटील गुरुजी

लेखक सौन्दर्य यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 १९७०च्या जून महिन्यात आम्ही मालाडहून बोरिवलीला शिफ्ट झालो. पाचवीपर्यंतचे शिक्षण मालाड पश्चिमेच्या म्युनिसिपालटीच्या शाळेत झाले होते आणि सहावीसाठी बोरिवलीच्या सोडावाला लेनमधल्या म्युनिसिपालटीच्या शाळेत मोठ्या आणि धाकट्या भावंडांसहित प्रवेश घेतला. प्रथमदर्शनी ह्या शाळेत आवडण्यासारखे काहीच नव्हते. जुनी बैठी शाळा, अॅस्बेस्टॉचे छप्पर, भिंतींना चुन्याची सफेदी, प्रत्येक इयत्तेचा फक्त एकच वर्ग आणि मुख्य म्हणजे खेळायला मैदानही नव्हते. मा‍झ्या सहावीच्या वर्गशिक्षकांचे नाव होते सुरेश पाटील.

सोंगाड्या

लेखक जागु यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 सोंगाड्या कुठेही दिसताच मुलांच्या चेहर्‍यावर हसू आणि डोळ्यात चमक आल्याशिवाय राहायची नाही. सोंगाड्या म्हणजे एक मुलखावेगळे व्यक्तिमत्त्व. कधी वेडेवाकडे हातवारे, चेहरे करून मुलांना हसवणारा, तर कधी डोळ्यात अचानक पाणी येणारा, कधीही न बोलणारा - मुका आणि विशेष म्हणजे लहान मुले ज्या कार्यक्रमात असतील त्या कार्यक्रमात वेगवेगळ्या वेषभूषा करून त्यांना हसवणारा, वेडा म्हणून ओळखला जाणारा सोंगाड्या कुठे राहतो, काय करतो याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता.

ग्राम"पंचायत" लागली..!! -4

लेखक विशुमित यांनी बुधवार, 18/10/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40963 http://www.misalpav.com/node/41040 http://www.misalpav.com/node/41296 'शांती'मामा ने मला आवाज दिला, " भाच्याबा, चला मिटिंगला." "कुठे आहे मिटिंग?", मला अचूक अंदाज आला होता. "मारुतीच्या देवळासमोर". माझा अंदाज खरा ठरला होता.

मश्रुम फ्राय

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 18/10/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मश्रुम फ्राय साहित्य: १ मश्रुमचा चौकोनी पुडा (फूडबझार, स्टार, मोअर मॉल मध्ये मिळतो तो) (धुवून निथळून हलक्या हाताने कापडावर कोरडा करून कापावा ) ९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे ) १ टी स्पून काळी मिरी १/२ टेबल स्पून आलं + १/२ टेबल स्पून लसूण १ टी स्पून फिश सॉस / ऑयस्टर पेस्ट १ टी स्पून व्हाईट व्हिनेगर १ टी स्पून साखर उगाच थोडं मीठ १ चक्री फुल (थोडा टवका खाऊन खात्री करा चक्री फुल कडू नसेल याची ) १ टेस्पून तेल (तीळ तेल किंवा कुठलंही प्रकारचं न्यूट्रल तेल वापरू शकता ) तीळ गार्निशसाठी =======