Skip to main content

मेथी डाळवडे

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 18/12/2017 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
मेथी डाळवडे  थंडी आली की,माझी आई आहारतल्या मेथीचे प्रमाण वाढवायची.मेथीचे लाडूही केले जायचे,पण मला ते कधीच आवडायचे नाहीत.मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार,मेथी घालून डोसे,घावणे, धिरडी,थालिपीठं बरंच काय काय व्हायचं.त्यातलाच एक चमचमीत पदार्थ म्हणजे मेथी डाळवडे,नाश्त्याला हमखास असायचेच.भरपूर थँडियासायची तेव्हा दिवळीपासूनच.सकाळी पहाते उठून अभ्यासला बसायचो तेही स्वेटर घालून, कं बांधून.

भावगीत

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 18/12/2017 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
( धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.. ह्या भावगीताच्या चालीवर म्हणता येते.) दोन जीवांची इथे भेट झाली रात्र सारी आज चांदण्यात न्हाली ||धृ || तुला पाहता मन हे मोहरले तुझे माझे नेत्री शब्द अश्रूरूप झाले शब्दावीण संवाद अंतर्यामी झाला तुझे माझे मनी आज अनुराग झाला ||१ || तुझे लाजणे ते अन् हसून बघणे मोग-यांचे गजरे केसांत गं माळणे तुझ्या स्पर्शाने तनु रोमांचित होई तुझा आणि माझा श्वास एकरूप होई ||२ || तुझे माझे नाते चिरंतन राहो प्रेमभाव आपुल्या मनी वृद्धिंगत होवो एकमेका साथीने जीवन जगणे शरीरे वेगळी मन एकरूप होणे ||३ || कवी आणि गीतकार : वैभव दातार भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२

द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे..

लेखक मोदक यांनी सोमवार, 18/12/2017 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
द डेक्कन क्लिफहँगर..!! ************

सुमित

. डॉक आणि मी डेक्कन क्लिफहँगर ला जायचं असं बऱ्याच महिन्यांपासून ठरवलं होतं. पुण्यात डॉकचे बरेच सायकलिस्ट मित्र आहेत. डॉकने त्यांना विचारून आमची टीम पक्की केली. माझ्यासाठी गंमत अशी की, त्यांपैकी कुणालाच मी ओळखत नव्हतो आणि भेटण्याचा तर प्रश्नच येत नाही. पण त्यांचा व्हॉटस्अॅप ग्रुप जॉईन केल्यावर एकेकाचे पराक्रम कळायला लागले. आमच्या टीम पैकी एक देशपांडेमामा हा काहीतरी भयंकर प्रकार होता.

राजकारणावर बोलू काही!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 18/12/2017 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..) निकाल लागला !! मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.

भातुकली

लेखक जागु यांनी सोमवार, 18/12/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूबअनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते म्हणूनच तर भातुकलीचा खेळ मुलींसाठी जिव्हाळ्याचा असतो असे मला वाटते. माझी भातुकली आमच्या पडवीत किंवा ओटीवर मांडली जायची त्यामुळे पडवीत खेळत असले तर तिथे असलेल्या दरवाज्याना पडदे लाव, ह्या खुंटी पासून त्या खुंटीपर्यंत घरातील चादरी आणून बांधून खोली बनवायची.

शुल्बसूत्रामधील भूमिति - भाग २.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी सोमवार, 18/12/2017 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
’२’ चे वर्गमूळ.

प्रमाणं तृतीयेन वर्धयेत्तच्च चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन। सविशेष:।बौधायन २.१२.

इतर शुल्बकारांनीहि जवळजवळ ह्याच शब्दांमध्ये ’२’च्या वर्गमूळाचे हे मूल्य दाखविले आहे.

सरळ अर्थ - प्रमाण बाजूमध्ये तिचा तिसरा भाग वाढवावा, त्या तिसर्‍या भागाचा चौथा भाग वाढवावा, त्याचा चौतिसावा भाग कमी करावा. त्यात अजून काही थोडे मिळविले (की इष्ट उत्तर मिळते.)

गूढ अंधारातील जग -४

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 16/12/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -४ पाणबुडीची संरचना -- . तिचे मूळ हेतू हे शत्रूच्या जहाजाच्या नजरेस न पडता त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन त्याच्या वर हल्ला करायचा. त्यामुळे सुरुवातीला पाणबुडी तयार केली ती जहाजासारखी निमुळती होती आणि वरचा भाग पाण्याच्या जरासा खाली गेला तरी चालत होता. जशी जशी विमानांची प्रगती होत गेली तशी पाणबुडीला पाण्याच्या जास्तीत जास्त खाली आणि जास्तीत जास्त वेगाने जाण्याची आवश्यकता निर्माण झाली. यामुळे पाणबुडीचा निमुळता आकार सोडून अश्रूबिंदू (teardrop) सारखा आकार म्हणजे देवमासा किंवा डॉल्फिन सारखा मोठे डोके आणि मागे निमुळता होत गेलेला आकार घेतला गेला.

विडंबन : निरीश्वरवाद, निधर्मी संकल्पना - 'फुल्टू' एंटरटेनमेंट विथ 'टील डेथ' व्हॅलिडिटी.

लेखक रंगीला रतन यांनी शुक्रवार, 15/12/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद आणि निधर्मी नावाच्या संकल्पना कशा अस्तित्वात आल्या आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे. यावर बऱ्याच थेअरीज आहेत. पैकी उत्क्रांतीवादानुसार निरीश्वरवाद आणि निधर्मी यावर बऱ्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत झाल्यावर त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार. अतिमानवाच्या (मंद)बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणाऱ्या अनिश्चिततेवर, त्यातून येणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक, बौद्धिक दरिद्री(दळभद्री) कल्पना विकसित केल्या त्यात निरीश्वरवाद आणि निधर्मी यांचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.

'संस्कृती आणि समाज’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/12/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आज संस्कृती हा शब्द कोणी नुसता उच्चारला तरी आपण त्या व्यक्‍‍तीकडे चमकून पहावे अशी या शब्दाची जादू वा दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येते. देशात किमान ज्या बाबींचे राजकारण होऊ नये असे वाटते त्या गोष्टींचेही राजकारण होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक व्यक्‍तिगत बाबींचे राजकीयकरण होऊन त्यावर राजकारण करणे सोपे झाले आहे. आज संस्कृती या संज्ञेचेही राजकीयकरण अगदी ठरवून होत असल्याचे लक्षात येते, नव्हे संस्कृती हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा होऊ पहातोय की काय अशी शंका येऊ लागते.