Skip to main content

संगणक व आंतरजालाचा वापर करणार्‍या उपकरणांवरच्या डेटाची चोरी : समज-गैरसमज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 26/10/2018 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
वैयक्तिक, व्यापारी आणि सरकारी स्तरांवर, संगणक आणि आंतरजालाचा वापर करून माहिती संकलन करणे व ती माहिती फायदेशीररीत्या वापरणे, ही गोष्ट आजकाल रोजच्या जेवणाइतकी सामान्य झाली आहे. अर्थातच, साठवलेला डेटा नष्ट होणार नाही हे पाहणे व त्याचे चोरीपासून संरक्षण करणे हे सर्वसामान्य काळजीचे विषय झाल्यास आश्चर्य ते काय? संगणक वापरून बनवलेल्या, विशेषतः चीनी बनावटीच्या उपकरणांवरच्या, (उदा : मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, सर्वर, इ) डेटाची चोरी हा सद्या सर्वसामान्य जनतेत काळजीने व भितीने चर्चिला जाणारा विषय आहे. या विषयाबाबत, लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज आणि भिती आहे.

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 26/10/2018 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
बघता मानस होते दंग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी) ९ सप्टेंबरची पहाट. काल रात्री चांगला आराम झाल्यामुळे अगदी फ्रेश वाटतंय. आज रविवार आहे, त्यामुळे किंचित उशीरा निघायचं आहे. पण पहाटे जाग आली, म्हणून लवकर उठून बाहेर चक्कर मारली तर बाहेर सर्व शांतता आहे. चहाचं हॉटेलही बंद आहे. मग आवरून आरामात सातला बाहेर पडलो. आता हॉटेल सुरू झाली आहेत. नाश्ता करताना माझ्या सायकलीला बघून अनेक बस ड्रायव्हर आणि कंडक्टर्सनी माझी विचारपूस केली! जवळच मलकापूर बस स्टँड आहे. थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलून पावणे आठला मलकापूरमधून निघालो. गेले चार दिवस काय बघायला मिळालं आहे!