Skip to main content

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ५: राजापूर- देवगड (५२ किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 29/10/2018 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
बघता मानस होते दंग ५: राजापूर- देवगड (५२ किमी) १० सप्टेंबरची पहाट. आज छोटाच‌ टप्पा आहे- फक्त ५१ किलोमीटर. पण आज माझं‌ स्वप्न पूर्ण होणार असल्यामुळे फारच उत्साह वाटतोय. तसंच सलग चार दिवसांमध्ये मिळून ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पूर्ण झाल्यामुळे आजचं अंतर फार कमी वाटतं आहे. अर्थात्, वेळ तर लागेल, पण काहीच अडचण नाही. अगदी औपचारिकताच वाटते आहे. जेव्हा सकाळी निघालो तेव्हा मनात फक्त एंजॉय करण्याचा भाव आहे. उजाडलं तेव्हा निघालो. दूरवर आकाश खूप काळं दिसतंय. पावसाची भितीही वाटून गेली. पण लवकरच कळालं की, ते तर धुकं आहे आणि आता पाऊस पडण्याची शक्यता अगदी कमी आहे.

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 29/10/2018 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नखरेल नयना आणि तिचा प्रताप .. नखरेल नयना ...उद्यम वाडीतील झोपडपट्टी मधल्या आपल्या घरातून नेहमीसारखी झोकात बाहेर पडली. आज तिने गुलाबी लहान लहान रंगाची फुले असलेला top घातला होता ...आपली बरीचशी पाठ उघडी राहील असा top तिने मुद्दाम शिवून घेतला होता ,आणि त्या खाली आज तिने निळसर रंगाची घट्ट जीन घातली होती . खांद्यापर्यंत नीट कापलेले केस तिने आज मोकळेच सोडले होते. कपाळावर गुलाबी रंगाची मोठी टिकली आणि ओठावर हलकेसे पण भडक रंगाचे लिपस्टिक. आपली कंबर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशी हलवत ती बाहेरच्या कच्च्या रस्त्यावर आली. आपल्याकडे कोणी बघतंय कि नाही याचा तिने जरा अंदाज घेतला.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ५

लेखक कलम यांनी सोमवार, 29/10/2018 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
रेड लाईट मध्ये रात्री उभ्या असलेल्या बायका जी गोष्ट पैश्यासाठी करतात, लग्न होऊन नवऱ्याबरोबर सुखी असलेल्या बायका जे प्रेमापायी करतात तर सुखी नसलेल्या जबाबदारी म्हणून करतात, लग्न न झालेली एक नवथर तरुणी जी गोष्ट प्रेमात आकंठ बुडाली असल्याने किंवा कमीत कमी प्रेमाचा आभास निर्माण झाल्यानं एखाद्या अनाहूत क्षणी करते; ती गोष्ट आपण काय म्हणून केली असावी?

लुब्री

लेखक गीतांजली टिळक यांनी सोमवार, 29/10/2018 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हो... कुत्रीच होती ती. या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं.. रहायला आल्यावर काही दिवसानी नवीन करुन घेतलेल्या गेटला लागून असलेल्या भिंतीवर, नुकत्याच दिलेल्या पांढर्‍या रंगावर मातीचे घासल्यासारखे डाग दिसू लागले. आणि ते वाढायला लागले. कशाने त्या अडचणीच्या जागेत असं होतय काही कळत नव्हतं. मग एके दिवशी दुपारच्या वामकुक्षीच्या शांत वेळी मी काही कारणाने स्वयंपाकघराचे दार उघडून मागे अंगणात गेले.

एका एस्कीमोची गोष्ट

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 29/10/2018 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
एका एस्कीमोची गोष्ट एका तरुण एस्कीमोने टुंड्रा मेट्री मोनीवर आपले लग्न जुळवले. सध्या सहा महीने रात्र असल्याने लग्नाचा मुहूर्त साखरपुडा आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम सहा महीने नंतर होता. एस्कीमो व्हीडीयो कॉल द्वारे आपल्या भावी वधूच्या संपर्कत होता. पण रात्र असल्याने त्यांना केवळ एक मेकाच्या आवाज ऐकून समाधानी होणे भाग होते. अखेर विरहाचे सहा महीने संपले. प्रेमाचा वसंत ऋतू उगवला. एस्कीमोने बुकीन्ग मध्ये एक इग्लू बुक केले होते. रेरा रजिस्ट्रेशन प्रमाणे त्याचे बांधकाम तीन महिन्याने पूर्ण व्हायचे होते. आतले फर्नीचर त्याने कस्टमाइज करुन घेतले होते.

Cold Blooded - १

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 29/10/2018 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा एक वाजून गेला होता.... रात्रीच्या अंधारात एक कार एनएच ३ वरुन संथगतीने जात होती. एका बाजूला डोंगराचा कडा, दुसरीकडे खोल दरी, अरुंद आणि वळणा-वळणाचा रस्ता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे नॅशनल हायवे असूनही वाहतूक अगदी तुरळकच वाहतूक सुरु होती. परंतु ती कार मात्रं गस्तं घातल्यासारखी त्या परिसरातून फिरत होती. गेल्या अर्ध्या - पाऊण तासात ७ - ८ किमीच्या पट्ट्यात त्या कारच्या दोन चकरा झाल्या होत्या. हायवेवरुन १० - १२ मिनिटं एका दिशेने जावं आणि मग उलट दिशेला वळून पुन्हा मागे यावं असा प्रकार सुरु होता.

सुरक्षा विमा आहे, साहेब?

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/10/2018 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.

धोका

लेखक परशुराम सोंडगे यांनी शनिवार, 27/10/2018 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
"गप्प मरं नुसतं तटा-तटा तोडीत..." पार्थच्या पाठीत जोरात धपाटा घालतं पल्लवी म्हणाली. गोचीड तोडून काढावा अंगावरचा तसा पार्थ तिनं बाजूला केला. ढकलूनच दिलं त्याला. जाम वैतागआला होता तिला. गोचिड अन लेकरू… एक अंगातल रक्त पितं. दुसरं दुध… दुध पण रक्ताच तयार होत असेल ना? तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हतां. पार्थतर सारखाच चिटीत होता. तिनं बाजूला केला पण त्यानं भोकाड पसरलं. लेकराला कसली कळते रात्र अन बित्र? घडयाळात पाहीलं. दोन वाजल्या होत्या. बाहेर सारा अंधारच दिसत होता. इकडं तिकडं पाहिलं. जय जवळ नव्हता. कुठं गेला जय? आता तर इथ होता तो. इथं म्हणजे त्याच्या किठ्ठीतच होती ना ती?